agriculture news in Marathi, Only six machines available for sugarcane cutting in Sangli District, Maharashtra | Agrowon

सांगली जिल्ह्यात ऊसतोडणीची केवळ सहाच यंत्रे
अभिजित डाके
मंगळवार, 2 जानेवारी 2018

भविष्यात साखर कारखान्यांना यांत्रिकीकरणाची गरज आहे. कारखान्यांमध्ये यांत्रिकीकरणाचा विचार करत असताना, ५० टक्के यांत्रिकीकरण आणि ५० टक्के मजुरांच्याद्वारे कारखान्याचा हंगाम सुरू ठेवला पाहिजे. परंतु यांत्रिकीकरणाकडे जात असताना दोन्ही गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. 
- मोहनराव कदम, चेअरमन, सोनहिरा साखर कारखाना, वांगी, जि. सांगली.

सांगली ः सांगली जिल्ह्यात ७८ हजार हेक्टरवर ऊस असून, १५ कारखाने आहेत. मात्र सद्यःस्थितीला जिल्ह्यात केवळ सहा ऊस तोडणीसाठी यंत्रेच वापरली जात आहेत. त्यातच शासनाकडून यांत्रिकरणासाठी कारखान्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ठोस अश्या उपयायजोना केल्या जात नाहीत. जी सहा यंत्रे वापरात आहेत ती केवळ मोठ्या क्षेत्रासाठी आहेत. लहान क्षेत्रासाठी म्हणजे, एक ते चार एकरांपर्यंत यंत्रांचे संशोधनच झाले नाही. लहान यंत्रे असल्याच नक्कीच फायदा होईल, असे मत कारखानदारांनी व्यक्त केले.

दरवर्षी गाळप हंगामात कारखान्यांना मजुरांची भासणारी टंचाई, टोळ्यांकडून होणारी फसवणूक यामुळे कारखान्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. त्यामुळे शासनाने यांत्रिकीकरणासाठी कारखान्यांना प्रोत्साहित केले पाहिजे. साखर कारखानेदेखील ऊस तोडणीसाठी यांत्रिकीकरणाचा विस्तार करू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळपाला जातो. ही यंत्रे दिवसाकाठी १५० टन उसाची तोडणी करतात. मात्र, यंत्रे मोठी असल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांचा ऊस तोडणीसाठी या यंत्राचा वापर करता येत नसल्याने लहान क्षेत्रासाठी यंत्र विकसित करणे गरजेचे   आहे.

यंत्रे दुरुस्ती सुविधेचा अभाव
ऊसतोडणी यंत्रामध्ये कधीही बिघाड होऊ शकतो. मात्र, ही यंत्रे दुरुस्त करण्यासाठी सर्व्हिस स्टेशनच नाहीत. यामुळे कारखान्यांचे आर्थिक नुकसानही होते. परिणामी यंत्राने तोडणीसाठी घेतलेले क्षेत्र तसेच ठेवावे लागते. ही यंत्रे दुरुस्त करण्यासाठी संबंधित कंपनीशी संपर्क करून दुरुस्त करणाऱ्यांना बोलवावे लागते.

संशोधनासाठी पुढाकार घ्यावा
ऊसतोडणी यंत्रे दहा एकरांपासून उपयुक्त आहेत. उसाच्या लहान शेतीमध्ये याचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे लहान यंत्रे विकसित करण्यासाठी ऊस संशोधन केंद्र आणि वसंतदादा इन्स्टिट्यूट शुगरने पुढाकार घ्यावा, असे कारखानदारांनी व्यक्त केले. यामुळे कामगारांच्यावर अवलंबून राहावे लागणार नाही.

प्रतिक्रिया
लहान क्षेत्रावरील ऊसतोडणीसाठी यंत्राची आवश्‍यकता आहे. यासाठी केंद्र व राज्य शासनासह व्हीएसआय यांनी यंत्रे विकसित करणे गजरेचे आहे. हे यंत्र विकसित करताना योग्य किमतीचा विचार केला पाहिजे. तरच साखर कारखान्याला अशा यंत्राचा वापर करणे सोयीस्कर होईल.
- वैभव नायकवडी, अध्यक्ष, हुतात्मा साखर कारखाना वाळवा, जि. सांगली.

 

इतर अॅग्रो विशेष
आरोग्यदायी आहार हेच हवे लक्ष्य!पहिले आणि दुसरे महायुद्ध संपले, यामध्ये...
तापलेलं ‘दूध’अनिश्‍चित अशा शेतीला शाश्वत मिळकतीची जोड म्हणून...
खडकवासला, कलमोडी धरण भरलेपुणे  : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाने...
दुधाचा भडका; सरकारची कोंडी पुणे  : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या...
दुधाचे टँकर बंदोबस्तात मुंबईकडे रवानानाशिक : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या...
कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात...पुणे: कोकण, मध्य महाराष्ट्राला सोमवारी (ता. १६)...
दूध आंदोलनाचे विधिमंडळातही पडसादनागपूर: दुधाला लिटरमागे प्रतिलिटर पाच रुपये...
बाजारपेठ ओळखून केळी बागेचे आदर्श नियोजनकठोरा (ता. जि. जळगाव) येथील पांडुरंग मोहन पाटील व...
एकात्मीक शेतीतून खुल्या झाल्या...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिह्यातील...
दूधदर प्रश्नी विधिमंडळ दणाणले; सभेत...नागपूर : राज्यात सुरु असलेल्या दूध दर आंदोलनाचे...
दूध आंदोलन तापले, बहुतांश जिल्ह्यात...पुणे : शेतकऱ्यांना प्रति लिटर थेट पाच रुपये...
कोल्हापूरात दूध संकलन १०० टक्के बंद ! कोल्हापूर- गायीच्या दूधाला प्रतिलिटर पाच...
आंतरराष्ट्रीय सुबाभूळ परिषदेच्या...पोषण हा पशुपालनातील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे....
चिंब झाली रान माती...कमी पाऊसमानानंतर उद्भवणारी पाणीटंचाई आणि दुष्काळी...
आंदोलन होणारचकोल्हापूर/ पुणे : अनेक दूध संघ अगोदरच गायीच्या...
काेकण, विदर्भात तुरळक ठिकाणी...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र...
साखर कारखान्यांकडे १२ हजार कोटींची...लखनौ ः उत्तर प्रदेशात २०१७-१८ च्या हंगामात...
संघांकडून दूध दरात तीन रुपयांची वाढपुणे ः दूध दरावर ताेडगा काढण्यासाठी राज्य सरकारने...
पीककर्ज वितरण केवळ ३० टक्केचपुणे : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपात दिरंगाई...
सेंद्रिय भातशेतीसोबतच राबविली थेट...पुणे जिल्ह्यातील भोयरे (ता. मावळ) येथील रोहिदास...