agriculture news in marathi, Only six percent sown in Pune division | Agrowon

पुणे विभागात अवघ्या सहा टक्के पेरण्या
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

पुणे ः पावसाळ्यात पडलेल्या पावसाच्या खंडाचा परिणाम रब्बी पेरण्यावर झाला आहे. पुणे विभागातील अनेक भागात पुरेशी ओल नसल्याने रब्बीच्या खोळंबल्या आहेत. आत्तापर्यंत सरासरीच्या १७ लाख ८१ हजार ३५ हेक्टरपैकी अवघ्या एक लाख २ हजार ३९० हेक्टर (सहा टक्के) पेरणी झाली असल्याचे चित्र आहे.

सध्या पुरेसा पाऊस न पडल्याने जमिनीत ओलाव्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचा परिणाम रब्बी हंगामातील पेरणीवर होत असल्याने पेरणीचे क्षेत्र काही प्रमाणात घट होणार असल्याची स्थिती आहे. पाण्याची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी हंगामात गहू, ज्वारी, बाजरी पेरणीचे नियोजन केले आहे.

पुणे ः पावसाळ्यात पडलेल्या पावसाच्या खंडाचा परिणाम रब्बी पेरण्यावर झाला आहे. पुणे विभागातील अनेक भागात पुरेशी ओल नसल्याने रब्बीच्या खोळंबल्या आहेत. आत्तापर्यंत सरासरीच्या १७ लाख ८१ हजार ३५ हेक्टरपैकी अवघ्या एक लाख २ हजार ३९० हेक्टर (सहा टक्के) पेरणी झाली असल्याचे चित्र आहे.

सध्या पुरेसा पाऊस न पडल्याने जमिनीत ओलाव्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचा परिणाम रब्बी हंगामातील पेरणीवर होत असल्याने पेरणीचे क्षेत्र काही प्रमाणात घट होणार असल्याची स्थिती आहे. पाण्याची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी हंगामात गहू, ज्वारी, बाजरी पेरणीचे नियोजन केले आहे.

यामध्ये सर्वाधिक क्षेत्र रब्बी ज्वारीचे आहे. विभागात रब्बी ज्वारीचे सरासरी १३ लाख ५ हजार ४१० हेक्टर क्षेत्र आहे. गव्हाचे एक लाख ५४ हजार ८४० हेक्टर क्षेत्र आहे. त्यापाठोपाठ हरभरा पिकांचे दोन लाख १७ हजार २२० हेक्टर क्षेत्र आहे. मक्याचे ७८ हजार ९५० हेक्टर क्षेत्र आहे.

विभागातील नगर जिल्ह्यात रब्बी हंगामातील ज्वारी पिकांची ५९ हजार ११८ हेक्टर, हरभरा ३ हजार ९४८ हेक्टर व मका १६६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. जिल्ह्यामध्ये पुरेसा पाऊस न झाल्यामुळे उर्वरित पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. पुणे जिल्ह्यात खरिपातील भात पिके दाणे भरण्याच्या अवस्थेत असून कडा, करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. पूर्व पट्यातील तालुक्यात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे जमिनीत ओलाव्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे रब्बी ज्वारीची अवघ्या १२ हजार ७१५ हेक्टर, मका ४०४, हरभरा ४०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. करडई, सूर्यफूल, गहू या पिकांच्या पेरण्या खोळंबल्याचे चित्र आहे.

सोलापूर जिल्ह्यात खरिपातील मूग, उडीद पिकांची काढणी झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणी तयारी केली आहे. मात्र, पुरेशा ओलीअभावी पेरण्या खोळंबल्या असून, ज्वारी पिकांची अवघ्या २३ हजार ३९१ हेक्टर, मका २०५० व सूर्यफूल पिकाची १०७ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

इतर ताज्या घडामोडी
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...