agriculture news in marathi, opportunity to export soyameal to china | Agrowon

चीनमध्ये सोयापेंड निर्यातीला संधी
कोजेन्सिस वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

नवी दिल्ली : अलीकडच्या काळात जागतिक दोन आर्थिक महासत्ता चीन आणि अमेरिका या दोन देशांमध्ये व्यापारयुद्ध सुरू आहे. चीनने अमेरिकेतून आयात होणाऱ्या सोयाबीनवर २५ टक्के शुल्क लावले आहे. त्यामुळे चीनमध्ये भारताच्या सोयापेंड निर्यातीला संधी आहे. तसेच अमेरिकेतून काही काळासाठी कमी दरात सोयातेल आयात करण्याची संधी आहे. 

नवी दिल्ली : अलीकडच्या काळात जागतिक दोन आर्थिक महासत्ता चीन आणि अमेरिका या दोन देशांमध्ये व्यापारयुद्ध सुरू आहे. चीनने अमेरिकेतून आयात होणाऱ्या सोयाबीनवर २५ टक्के शुल्क लावले आहे. त्यामुळे चीनमध्ये भारताच्या सोयापेंड निर्यातीला संधी आहे. तसेच अमेरिकेतून काही काळासाठी कमी दरात सोयातेल आयात करण्याची संधी आहे. 

जागतिक सोयाबीन व्यापाराचा विचार करता चीन हा सर्वांत मोठा सोयाबीन आयातदार आहे, तर अमेरिका हा सर्वांत मोठा उत्पादक देश आहे. ‘‘चीनची २०१७-१८ मधील सोयाबीन आयात ९७ दशलक्ष टन झाली होती. या आयातीपैकी ४० टक्के आयात ही अमेरिकेतून झाली होती. मात्र सध्याच्या अमेरिका आणि चीनच्या संबंधामुळे चीनने अमेरिकेतून सोयाबीन आयातीवर कर लावून निर्बंध लावला आहे. त्यामुळे देशांतर्गत पोल्ट्री उद्योगाची खाद्याची गरज भागविण्यासाठी चीन भारतातून सोयाबीन आयात करण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतातून सोयापेंड निर्यातीला संधी आहे,’’ अशी माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.

‘‘चीनने २०१२ मध्ये गुणवत्तेच्या कारणावरून भारतून सोयापेंड आयातीला निर्बंध घातले होते. परंतु भारतीय व्यापाऱ्यांनी ‘‘जूट बॅंग रंगविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ग्रीन मेलाकाइट केमिकलमुळे ही समस्या निर्माण झाली आहे,’’ असा दावा केला आहे. भारतातून सोयापेंड आयात गुणवत्तेच्या कारणावरून बंद केल्यानंतर चीनने अमेरिकेतून सोयाबीन आयातीला सुरवात केली. या सोयाबीनचे गाळप करून त्याचा पुरवठा देशातील पोल्ट्री उद्योग आणि शेजारच्या देशात निर्यात केली जाऊ लागली,’’ असे सॉल्व्हेंट एक्स्ट्राक्टर असोसिएशनचे भारतातील कार्यकारी संचालक बी. व्ही. मेहता यांनी सांगितले. 

तसेच केवळ चीनच नाही तर चीन ज्या देशांना सोयातेल निर्यात करत होता ते देशही आता भारताकडे वळतील. सोयापेंडचे भारतीय पोर्टवर सध्याचे दर ४८५ डॉलर प्रतिटन आहेत. हे अमेरिकेच्या सोयापेंडच्या तुलनेत ५० ते ६० डॉलरने जास्त आहेत. भारतातून सोयापेंड निर्यात २०१४-१५ मध्ये ४ दशलक्ष टन झाली होती. त्यात घट होऊन २०१६-१७ मध्ये २ दशलक्ष टनांपर्यंत कमी झाली. भारतीय उत्पादनाच्या उच्च किंमती आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कमी दरात उपलब्धतेमुळे निर्यात कमी झाली होती. 

आयातीचीही संधी
चीनने अमेरिकेच्या सोयाबीन आयातीवर शुल्क लावल्याने भारताला केवळ चीनमध्ये निर्यातीची संधीच मिळाली नाही, तर सोबतच अमेरिकेतून कमी दरात सोयातेल आयीतीचीही संधी आहे. चीनने आपली गरज भागविण्यासाठी ब्राझिलकडे मोर्चा वळविल्यास भारताला सोयातेल जास्त दराने आयात कराव लागेल. ब्राझील हा जगात दुसऱ्या क्रमांकाचा सोयाबीन उत्पादक देश आहे. चीनने येथून आयात केल्यास सोयातेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे, असे व्यापारी सूत्रांनी सांगितले.     

भारतीय सोयाबीन प्रक्रिया कंपन्यांना चीनमध्ये सोयापेंड निर्यातीची ही सर्वात मोठी संधी आहे. सोबतच चीन सोयापेंड निर्यात करत असलेल्या जपान, दक्षिण कोरिया आणि व्हिएतनाम या देशातही भारतीय सोयापेंडला मार्केट उपलब्ध होऊ शकते. 
- दाविश जैन,
अध्यक्ष, भारतीय सोयाबीन प्रक्रियादार आसोसिएशन

इतर अॅग्रोमनी
बांबू व्यापाराला चांगली संधीयेत्या काळात राज्यातील बांबूचा व्यापार वाढवायचा...
भारतातील पाच कडधान्यांच्या हमीभावावर...वॉशिंग्टन : भारतात पाच कडधान्यांना दिल्या...
भारतीय चवीच्या चॉकलेटची वाढती बाजारपेठकार्तिकेयन पलानीसामी आणि हरीश मनोज कुमार या दोघा...
सुधारित पट्टापेर पद्धतीने वाढले एकरी ३१...पारंपरिक पद्धतीने सोयाबीन तूर हे आंतरपीक अनेक...
चीन, अमेरिकेचे कापूस उत्पादन पुढील...जळगाव : देशात ३१ जानेवारीअखेर सुमारे १८० लाख...
कापूस, गवार बी आणि हरभऱ्याचे भाववाढीचे...या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने साखर वगळता...
हरभरा निर्यात, स्थानिक मागणीत वाढ या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने मका व गहू...
सीताफळाच्या मूल्यवर्धनातून घेतला...`उद्योगाच्या घरी, रिद्धीसिद्धी पाणी भरी`, अशी...
कापसाच्या भावात घसरणया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू वगळता...
हलव्याच्या कार्यक्रमाने अर्थसंकल्पाची...नवी दिल्ली : नवीन वर्षाची सुरवात झाली की...
आयटीसीचे ‘ई चौपाल’ आता येणार मोबाईलवरग्रामीण भागाला डिजिटल करण्याच्या उद्देशाने दोन...
कृषिमालाच्या मूल्यवर्धनालाच खरे भविष्य...२०१८ मध्ये डॅनफॉस इंडिया या कंपनीने उत्तम असा...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...
हरभऱ्याला वाढती मागणी या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस, गहू...
भात निर्यातीसाठी मागणीबरोबरच भूराजकीय...भारतीय भात निर्यातदारांच्या वाढीसाठी जागतिक...
मका, साखर, हळदीच्या भावात घसरणया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन...
अर्थमंत्री जेटली १ फेब्रुवारीला...नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार त्यांच्या...
कापूस उद्योगाचे अमेरिका-चीनच्या...जळगाव : चीन व अमेरिकेत मागील नऊ महिन्यांपासून...
सातत्याने ताळेबंद तपासत शेती राखली...जळगाव जिल्ह्यातील नायगाव (ता. मुक्ताईनगर) येथील...
हळदीच्या निर्यात मागणीत वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सर्वच शेती...