agriculture news in marathi, opportunity to join Indian Military | Agrowon

सैन्य दलात अधिकारी होण्याची संधी
वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी पात्र उमेदवारांना एसएसबी प्रशिक्षण वर्ग ठेवण्यात आलेला आहे. सदरच्या प्रशिक्षण वर्गासाठी सैन्य दलातील तज्ज्ञ अधिकारी यांचेकडून प्रशिक्षण मिळणार आहे. कंम्बाईंड डिफेन्स सर्व्हीसेस या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या व स्पेशल एंट्रीद्वारे सैन्य दलात अधिकारी पदासाठी इच्छूक असणाऱ्या तसेच ज्या नवयुवक व युवतींना सशस्त्र सैन्य दलाकडून एम.एस.बी.

मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी पात्र उमेदवारांना एसएसबी प्रशिक्षण वर्ग ठेवण्यात आलेला आहे. सदरच्या प्रशिक्षण वर्गासाठी सैन्य दलातील तज्ज्ञ अधिकारी यांचेकडून प्रशिक्षण मिळणार आहे. कंम्बाईंड डिफेन्स सर्व्हीसेस या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या व स्पेशल एंट्रीद्वारे सैन्य दलात अधिकारी पदासाठी इच्छूक असणाऱ्या तसेच ज्या नवयुवक व युवतींना सशस्त्र सैन्य दलाकडून एम.एस.बी. परिक्षेची मुलाखत पत्रे मिळण्याची शाश्वती आहे अशा उमेदवारांना सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीच्या पूर्व तयारीसाठी महाराष्ट्र शासनामार्फत छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय आयुक्त कार्यालय परिसर, नाशिक रोड, नाशिक येथे प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येणार आहे. प्रशिक्षण कोर्सचा कालावधी 5 जून ते 14 जून 2018 (एकूण 10 दिवस) असा आहे. प्रशिक्षण कोर्सच्या कालावधीत निवासाची, प्रशिक्षणाची व भोजनाची सोय विनामुल्य करण्यात आलेली आहे.

 तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेणेसाठी दि. 01 जून 2018 रोजी  सकाळी 10.30 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर येथे मुलाखतीस हजर रहावे. खालीलप्रमाणे कोणतीही एक पात्रता धारण करीत असतील अशाच उमेदवारांनी शैक्षणिक प्रमाणपत्र व गुणपत्रिकेच्या मूळ प्रतीसह मुलाखतीस उपस्थित रहावे.

(अ) कंम्बाईंड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन (CDSE/UPSC) अथवा नॅशनल डिफेंस ॲकेडमी   एक्झामिनेशन (NDA/UPSC) पास झालेली असावी, व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे.

(ब) एनसीसी (सी) सर्टिफिकेट अे/बी ग्रेडमध्ये पास झालेले असावे व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी.

(क) टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे.

(ड) युनिव्हर्सिटी एन्ट्री स्किमसाठी एसएसबी कॉल लेटर आलेले असावे अथवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय आयुक्त कार्यालय, परिसर, नाशिकरोड, नाशिक,यांचा दुरध्वनी क्र. 0253-2451031 व 2451032 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दुरध्वनीवर संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर यांनी कळविले आहे.

इतर ताज्या घडामोडी
कर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...
योग्य पद्धतीने करा दालचिनी काढणीनोव्हेंबर ते मार्च या कालावधीत दालचिनी काढणीचा...
परभणीत फ्लॅावर प्रतिक्विंटल ४०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
भाजपची राष्ट्रीय परिषद ११ जानेवारीपासूननवी दिल्ली ः भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय...
यंत्रमाग १ तर प्रोसेस, सायझिंगला २...मुंबई  ः महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग...
अटी, शर्ती काढल्या तरच कर्जमाफीचा फायदा नगर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज झाले आहे...
कर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू...मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट...
ग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व...सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत...
प्रतापगडावर शिवप्रताप दिन उत्साहातसातारा : ढोल-ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती...
कांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यानाशिक : कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने...
'प्रकल्पग्रस्त पुनर्वसनात वेळेचा अपव्यय...नाशिक : शासकीय अधिकारी काम कसे करतात, यावरच...
बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘...मुंबई : राज्यातील महिला सक्षमीकरणाशी निगडित...
वीस वाळू घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळाअकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने...
नांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र...नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी...
परभणीत आज शेतकरी सुकाणू समिती बैठकपरभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत,...
सांगली बाजार समितीत हमालांचे आंदोलनसांगली ः कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी...
नगर जिल्ह्यात हमी केंद्रांकडे शेतकरी...नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी...
शिवसेनेकडून जिल्हा परिषदेत नाराजांचे...जळगाव : जिल्हा परिषदेत तीन पंचवार्षिक भाजपसोबत...
शेतकरी मृत्यूप्रकरणी पाथरी बाजारपेठेत...पाथरी, जि. परभणी  : पीककर्जाच्या मागणीसाठी...
अण्णा हजारे यांनी कांदाप्रश्‍नी लक्ष...नगर ः शेतकऱ्यांना एक ते पाच रुपये किलो दराप्रमाणे...