agriculture news in marathi, Opposite farmer of leaving the water from the roots | Agrowon

मुळा धरणातून पाणी सोडण्याला शेतकऱ्यांचा विरोध
टीम अॅग्रोवन
शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

नगर : मुळातून पाणी सोडण्याला राहुरी, नेवाशातील शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला. गुरुवारी सकाळी अकरा वाजता सोनईत शेतकरी जमा झाले. त्यानंतर शेतकरी मुळा धरण परिसरात जाताना बारागाव नांदुर येथे शेतकऱ्यांना अडवले. शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला.

दरम्यान ‘मराठवाड्यातील पुढारी नगर जिल्ह्यातील धरणातून पाणी मिळविण्यासाठी पोटतिडकीने जोर लावत असताना जिल्ह्यातील पुढारी भविष्यातील राजकारणाचे गणित डोळ्यासमोर ठेवून पाणी सोडण्याला विरोध करत नाहीत. शेतकऱ्यांचा बळी देण्याचेच पाप केले जात आहे.’ अशी टीका माजी आमदार शंकरराव गडाख यांनी केली.

नगर : मुळातून पाणी सोडण्याला राहुरी, नेवाशातील शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला. गुरुवारी सकाळी अकरा वाजता सोनईत शेतकरी जमा झाले. त्यानंतर शेतकरी मुळा धरण परिसरात जाताना बारागाव नांदुर येथे शेतकऱ्यांना अडवले. शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला.

दरम्यान ‘मराठवाड्यातील पुढारी नगर जिल्ह्यातील धरणातून पाणी मिळविण्यासाठी पोटतिडकीने जोर लावत असताना जिल्ह्यातील पुढारी भविष्यातील राजकारणाचे गणित डोळ्यासमोर ठेवून पाणी सोडण्याला विरोध करत नाहीत. शेतकऱ्यांचा बळी देण्याचेच पाप केले जात आहे.’ अशी टीका माजी आमदार शंकरराव गडाख यांनी केली.

समन्यायी पाणी धोरणानुसार जायकवाडीला मुळा धरणातून दोन टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यास विरोध म्हणून व पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी सोनईतील आमराई येथे शेतकरी जमा झाले होते.

या वेळी शेतकऱ्यांनी पाणी सोडण्यासाठी भूमिका मांडली. ‘मुळातून जायकवाडीला पाणी सोडल्यानंतर लाभक्षेत्रातील पाच तालुके ओसाड होतील. हक्काच्या पाण्यावर कुणी गदा आणणार असेल तर नेवासे तालुक्यातील शेतकरी जिवाची पर्वा न करता लढा देण्यास सज्ज आहेत’ असे सांगितले.

त्यानंतर उपस्थित सर्व शेतकरी घोषणा देत मुळा धरणाकडे पाणी सोडण्याला विरोध करण्यासाठी शेतकरी मुळा धरणाकडे गेले. मात्र, प्रशासनाने पोलिसांनी गाड्या बारागाव नांदुर येथे अडवले. त्यानंतर शेतकरी पायी मुळा धरणाकडे गेले. तेथेही माजी आमदार शंकरराव गडाख यांनी भाषण केले. उशिरापर्यंत शेतकरी धरणावर होते.

इतर ताज्या घडामोडी
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...
नगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...
सांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...
केंद्र आणि राज्याच्या मंत्र्यांना कांदे...नाशिक  : अगोदरच मागील कांदा विक्रीचे अनुदान...
सहलींच्या बचत निधीतून होणार आंबा फवारणी...रत्नागिरी : ग्रास कटर, आंबा फवारणी मशिनला...
मराठवाड्यात चार दिवसांत लाखभर लोक...औरंगाबाद : लांबलेला पाऊस, भूपृष्ठावरील जलसाठ्यांत...
पणन सुधारणा विधेयक पावसाळी अधिवेशनात...पुणे  ः शेतीमाल पणन सुधारणांमधील...
पुणे बाजार समिती पुनर्विकासाला गतीपुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांना ‘सहवीज’मधून १०४१ कोटींचे...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी सहवीज...
खानदेशात उष्णतेचा कहर; पावसाची...जळगाव  ः खानदेशात वादळी पाऊस वगळता कुठेही...
शकूबाईंच्या लढ्याला आले यश;  वनजमीन...वणी, जि. नाशिक  : शेतकरी व आदिवासींच्या...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद  ः दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...
उन्नत शेती अभियानात १५ दिवसांत १९ लाख...मुंबई : राज्यात उन्नत शेती - समृद्ध शेतकरी...
पाणी जिरविण्यासाठी नदीपात्र नांगरण्याचा...अमरावती  ः भूगर्भात पाणी मुरून पातळी वाढावी...
काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी...मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने...
राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार मुंबई : होणार होणार म्हणून गेले काही...
मोठ्या गटांसाठी व्यवस्थापन समितीची...शेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने...
पीकविमा न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत...मुंबई : राज्यातील अनेक शेतकऱ्यांना...