agriculture news in marathi, Opposition calm in Zilla Parishad; More complaints of power | Agrowon

जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत; सत्ताधाऱ्यांच्याच अधिक तक्रारी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा परिषदेतील सत्तेत असलेल्या भाजपच्या सदस्य पल्लवी सावकारे यांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. अलीकडेच त्यांनी भुसावळ तालुक्‍यात अंगणवाड्यांमध्ये पाहणी केली. त्यात वांजोळा गावातील अंगणवाडीतील आहार निकृष्ट असल्याचे त्यांना दिसून आले. परंतु, बाल कल्याण विभागाचे कार्यवाहीकडे दुर्लक्ष आहे. जिल्हा परिषदेत विरोधक शांत आणि सत्ताधाऱ्यांच्या तक्रारी अधिक, अशी स्थिती आहे.

जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा परिषदेतील सत्तेत असलेल्या भाजपच्या सदस्य पल्लवी सावकारे यांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. अलीकडेच त्यांनी भुसावळ तालुक्‍यात अंगणवाड्यांमध्ये पाहणी केली. त्यात वांजोळा गावातील अंगणवाडीतील आहार निकृष्ट असल्याचे त्यांना दिसून आले. परंतु, बाल कल्याण विभागाचे कार्यवाहीकडे दुर्लक्ष आहे. जिल्हा परिषदेत विरोधक शांत आणि सत्ताधाऱ्यांच्या तक्रारी अधिक, अशी स्थिती आहे.

काही दिवसांपूर्वी छापखाना समितीची बैठक झाली. जिल्हा परिषदेचा स्वमालकीचा छापखाना सुरू व्हावा, यासाठी ही समिती असून, या समितीच्या बैठकाच होत नव्हत्या. कारण सत्तेतील पदाधिकारी मंडळीच छापखान्याबाबत उदासीन होती. परंतु, प्रसिद्धी माध्यमांनी टीका केल्यानंतर समितीची बैठक झाली. या समितीने ७० लाख रुपये खर्च लागेल, त्याची तरतूद छापखान्यासाठी केली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांच्या मागणीसंबंधीदेखील प्रशासन सकारात्मक नाही. शाळांमध्ये बाक खरेदी, भजनी मंडळांसाठी साहित्याच्या पुरवठा या विषयांवरूनही सत्ताधाऱ्यांमध्ये एकमत नाही. यामुळे यासंदर्भातील निविदा व इतर प्रक्रिया हव्या त्या गतीने सुरू नसल्याची कुरबूर जिल्हा परिषदेतील सत्ताधारी सदस्यांमध्ये आहे.

मध्यंतरी जिल्हा परिषदेतील प्रशासनाची मनमानी व काही अधिकाऱ्यांकडून होणारी दिरंगाई याबाबत पदाधिकाऱ्यांनी थेट जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रारी केल्या. परंतु, अजून कोणतीही कारवाई संबंधित अधिकाऱ्यांवर झालेली नाही. परिषदेत विरोधकांमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य फक्त सभांमध्ये आवाज उठवितात. मात्र, नंतर ते शांत दिसत असल्याचे चित्र आहे.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...