agriculture news in marathi, The opposition to the education committee of the school buys | Agrowon

शाळांतील बाक खरेदीस शिक्षण समितीचा विरोध
टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

जळगाव : जिल्हा परिषदेच्या पाचवी ते आठवीच्या वर्गांसाठी मानव विकास विभागांतर्गत पॉलिमर बाक पुरविण्यात येत असून, संबंधित ठेकेदाराकडून ५ हजार ८०० रुपये इतक्‍या जादा दराने बाक खरेदी होत असल्याचा आरोप जिल्हा परिषद शिक्षण समितीमधील सदस्य रवींद्र पाटील यांनी केला आहे. जादा दराने होत असलेल्या खरेदी प्रक्रियेस समितीने देखील विरोध दर्शविला असून, दर कमी करण्याबाबत ठेकेदारास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यास बोलाविण्यात येणार असल्याचा निर्णय शिक्षण समिती सभेत घेण्यात आला.

जळगाव : जिल्हा परिषदेच्या पाचवी ते आठवीच्या वर्गांसाठी मानव विकास विभागांतर्गत पॉलिमर बाक पुरविण्यात येत असून, संबंधित ठेकेदाराकडून ५ हजार ८०० रुपये इतक्‍या जादा दराने बाक खरेदी होत असल्याचा आरोप जिल्हा परिषद शिक्षण समितीमधील सदस्य रवींद्र पाटील यांनी केला आहे. जादा दराने होत असलेल्या खरेदी प्रक्रियेस समितीने देखील विरोध दर्शविला असून, दर कमी करण्याबाबत ठेकेदारास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यास बोलाविण्यात येणार असल्याचा निर्णय शिक्षण समिती सभेत घेण्यात आला.

सभापती पोपट भोळे, समितीचे सदस्य गजेंद्र सोनवणे, विजया पाटील, नंदा पाटील, रवींद्र पाटील, प्रमिला पाटील, शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील आदी उपस्थित होते.
शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पुरवठा होत असलेल्या शालेय पोषण आहाराच्या मालाबाबत गटशिक्षणाधिकारी, अधीक्षकांनी धान्याचा नमुना कार्यालयात ठेवण्याच्या सूचना देण्यात दिल्या.

मानव विकास कार्यक्रमांतर्गत सात तालुक्‍यांतील ३८ अभ्यासिका सुरू आहेत किंवा नाही, याचा लेखाजोखा पुढील सभेत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे सौरऊर्जा प्रकल्पांतर्गत प्रत्येक गटातून दोन शाळांचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. वादळाने शाळेत नुकसान झालेल्या १८ शाळांच्या दुरुस्तीबाबत इस्टिमेट आले असून, त्या शाळांना प्राधान्य देण्याचे निश्‍चित करण्यात आले.

गटशिक्षणाधिकाऱ्यांची चौकशी
जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्यानंतर चोपडा गटशिक्षणाधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे समायोजन झाले नसल्याचे गजेंद्र सोनवणे यांनी सभेत सांगितले. यावरून गटशिक्षणाधिकारी गजरे यांची विभागीय चौकशी लावण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी पाटील यांनी सभेत सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
खानदेशातील प्रकल्पांतील पाणीसाठा होतोय...जळगाव : खानदेशातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमधील...
पाण्याचे आर्थिक मूल्य तपासण्याची गरज ः...औरंगाबाद : निसर्गाने दिलंय आणि आपण वापरतोय अशी...
गहू पिकावरील मावा, तुडतुडे किडींचे...गहू पिकावरील मावा आणि तुडतुडे या किडींवर वेळीच...
साताऱ्यात टोमॅटो २५० ते ३५० रुपये प्रति...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
भुरी नियंत्रणासाठी सावधपणेच करा...सर्व द्राक्ष विभागामध्ये येत्या आठवड्यात वातावरण...
विदर्भात थंडीचा कडाका वाढला  पुणे  : उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड...
राज्य सहकारी बँकेला  १०० कोटींचे...मुंबई  : राज्य शासनाने राज्य सहकारी...
‘कृषी’ला ना पूर्णवेळ मंत्री, ना सचिवमुंबई  : राज्याच्या कृषी खात्याच्या...
शिवसेना विमा कंपन्यांना जाब विचारणार ः...परभणी : मी शहरी भागातील आहे. मला पिकांमधले...
किसान क्रांतीच्या आंदोलनाला पुणतांबा...पुणतांबा, जि. नगर : शेतकरीप्रश्‍नी किसान...
कृषिक प्रदर्शनास आजपासून बारामती येथे...बारामती, जि. पुणे  : येथील अॅग्रिकल्चरल...
गाजराच्या शिल्प दुनियेत...उत्तर चीन येथील हेबेई प्रांतातील हॅन्डन येथील...
जळगावातील १२० कोटींच्या कामांना...जळगाव : जिल्हा परिषदेत मागील महिन्यात १२० कोटी...
सूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार...परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
परभणीत रब्बीची ६२.२४ टक्के क्षेत्रावर...परभणी : जिल्ह्यात यंदा कमी पावसामुळे उद्भवलेल्या...
'निर्यातदार व्यापाऱ्यांनी साखळी करुन दर...आटपाडी, जि. सांगली : आटपाडी तालुक्‍यात...
शेततळ्याचे मुख्यमंत्र्यांनी केले ‘...सोलापूर ः बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील...
अकोल्यात सोयाबीन प्रतिक्विंटल ३२०० ते...अकोला ः अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत...
सूक्ष्म सिंचनाचा परिणामकारक वापर शक्‍य...औरंगाबाद : सूक्ष्म सिंचनाची समज व गरज, त्यामधील...
भावांनो घाबरू नका, आम्ही वाऱ्यावर...खोजेवाडी जि. नगर ः ‘‘दुष्काळ जाहीर होऊन अडीच...