agriculture news in marathi, opposition on fire on Marathi speech issue | Agrowon

मराठीच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांच्या माफीनाम्याने अधिवेशनाला प्रारंभ
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला सोमवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. मात्र, राज्यपालांचे अभिभाषण मराठीत अनुवादित करून ऐकविले जात नसल्याने सरकारने मराठी भाषेचा अवमान केला असल्याचे सांगत विरोधकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकत सोमवारी (ता.२६) सभात्याग केला. राज्यपालांच्या भाषणादरम्यान सभात्याग करण्याची ही दुर्मिळ घटना असल्याचे सांगितले जात आहे. 

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला सोमवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. मात्र, राज्यपालांचे अभिभाषण मराठीत अनुवादित करून ऐकविले जात नसल्याने सरकारने मराठी भाषेचा अवमान केला असल्याचे सांगत विरोधकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकत सोमवारी (ता.२६) सभात्याग केला. राज्यपालांच्या भाषणादरम्यान सभात्याग करण्याची ही दुर्मिळ घटना असल्याचे सांगितले जात आहे. 
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या चुकीसाठी माफी मागितली असून, ही बाब गंभीर असल्याचे सांगत संध्याकाळपर्यंत दोषींना घरी पाठविण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली. 

अभिभाषणाची सुरुवात राज्यपालांनी मराठी भाषेतच केली. सुरुवातीला ४ ते ५ मिनिटे मराठीत भाषण केल्यानंतर राज्यपालांनी इंग्रजीमध्ये भाषण करण्यास सुरुवात  केली. इंग्रजी भाषणाचा मराठी अनुवाद वाचण्याची सभागृहाची परंपरा आहे. मात्र, अनुवाद मराठीत होत नसल्याने विरोधक आक्रमक झाले. विरोधकांनी घोषणाबाजी करूनही अनुवाद मराठीमध्ये होत नसल्याने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अनुवादक कक्षामध्ये जाऊन संपूर्ण भाषण स्वत: मराठीत वाचून दाखवत कमान सांभाळली. मात्र, विरोधकांनी मराठीविरोधी सरकार असल्याची घोषणाबाजी करीत सभात्याग केला. 

अभिभाषणाचा मराठी अनुवाद होत नसल्याने विरोधकांसह शिवसेनेच्या तीन-चार सदस्य आणि भाजपचे आमदार आशिष शेलार यांनीही आक्षेप घेतला. विधानभवनातील शिवरायांच्या प्रतिमेजवळ सरकारविरोधी घोषणा देऊन सरकारचा धिक्कार करीत विरोधकांनी आंदोलन केले. 

भाषेचा अपमान : अजित पवार
राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये मराठी भाषांतर नसल्यामुळे भाजपने १२ कोटी मराठी भाषकांचा अपमान केल्याने आम्ही राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार घातला असल्याची माहिती विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी दिली. आमच्या सरकारच्या काळात विधानसभेच्या २८८ व विधान परिषदेच्या ७८ मराठी आमदारांसाठी मराठीमध्ये भाषांतर व्हायचे. मात्र, या वेळी भाषण सुरू होऊन १५ मिनिटे होऊनही भाषांतर केले गेले नाही. आम्ही वारंवार सूचना केली, तरीही भाषांतर झाले नाही. उद्या मराठी भाषा दिन आहे. त्याच्या पूर्वसंध्येलाच मराठीचा अपमान केला गेला आहे. शिवसेनाही या वेळी गप्प बसली होती. त्यामुळेच आम्ही राज्यपालांच्या भाषणावर नाइलाजाने बहिष्कार टाकला.

अनुवाद गुजराती भाषेत : मुंडे     
राज्यपालांच्या भाषणाचा अनुवाद गुजराती भाषेत होत असल्याचा दावा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी त्यांनी केली. मराठी भाषेच्या पूर्वसंध्येलाच भाजपने अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यपालांचे अभिभाषण मराठीत न केल्यामुळे मराठी भाषेचा अवमान झाला असून, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. 

इतर अॅग्रो विशेष
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...
सीताफळाच्या योग्य जातींची करा लागवडमहाराष्ट्रात सीताफळाच्या झाडांचे काही नैसर्गिक...
उत्पादकांसाठी बेदाणा गोडसांगली ः यंदाच्या बेदाणा हंगामात बेदाण्याच्या...
केळी दरात किंचित सुधारणाजळगाव ः रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली...
मका चार वर्षांतील नीचांकी पातळीवरनवी दिल्ली ः बजारात मका आवक वाढल्यांतर मागणी कमी...
कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पणन संचालक...पुणे ः पणन संचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती असताना...
​​राज्य सरकार राबविणार मधुमक्षिका मित्र...पुणे : शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते...
ग्रामस्वच्छता अभियानात प्रभाग, गटातून...नगर ः ग्रामीण भागात स्वच्छतेची व्यापी...
केसर आंबा पाडाला आलाय...औरंगाबाद : आपली चव, गंध आणि रूपाने ग्राहकांना...
बदल्या समुपदेशनानेच...पुणे : राज्याच्या कृषी विभागात समुपदेशनाने बदल्या...
अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेतपुणे : ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात...
पाणलोट, मृदसंधारण घोटाळ्याचा पर्दाफाशपुणे : कृषी खात्यातील पाणलोट व मृदसंधारण...
ब्राझील, थायलंडचा यंदा इथेनॉलकडे वाढता...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वत्रच...
बारमाही भाजीपाला शेतीला नर्सरी...ब्राह्मणगाव (जि. नाशिक) येथील केवळ वाघ पूर्वी...
सुधारित तंत्राची मिळाली गुरुकिल्लीअकोला जिल्ह्याचे मुख्य उन्हाळी पीक कांद्याची...
भाराभर चिंध्या राज्यात १२७ वा पशुसंवर्धन दिन नुकताच साजरा...
मथुरेचं दूध का नासलं?राज्यात मे महिन्याचे तापमान यंदा नैसर्गिक आणि...
चिमुरड्याच्या कॅमेऱ्यात कैद आनंदी शेतकरीआपल्याकडील शेतकरी आनंदी असू शकतो का? उत्तर...
‘अ’तंत्र निकेतनपुरेसा अभ्यास आणि तयारीअभावी, यंत्रणेचा विरोध...