agriculture news in marathi, opposition leader criticize state government on farmers death | Agrowon

कर्जासाठी शेतकऱ्याचा बॅंकेसमोर मृत्यू होणे लांच्छनास्पद : विखे पाटील
टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 डिसेंबर 2018

मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट बॅंकेसमोर उपोषणाला बसावे लागते आणि आंदोलनादरम्यान एका शेतकऱ्याचा मृत्यू होतो, हा प्रकार सरकारसाठी लांच्छनास्पद असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षऩेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

मुंबई : कर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना स्टेट बॅंकेसमोर उपोषणाला बसावे लागते आणि आंदोलनादरम्यान एका शेतकऱ्याचा मृत्यू होतो, हा प्रकार सरकारसाठी लांच्छनास्पद असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षऩेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

पाथरी येथे नवीन कर्जाच्या मागणीसाठी स्टेट बॅंकेसमोर सुरू असलेल्या आंदोलनात तुकाराम वैजनाथ काळे नामक शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते. सरकारच्या धोरणांमुळे दिल्लीपासून गल्लीपर्यंत नैराश्य निर्माण झाले आहे. सरकारच्या उदासीन व नकारात्मक धोरणांमुळे हतबल होऊन तिकडे नवी दिल्लीत रिझर्व्ह बॅंकेच्या चेअरमनला देखील राजीनामा द्यावा लागत असून, पाथरीत शेतकऱ्यांना आंदोलन करून हौतात्म्य पत्करावे लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

सरकारकडून भरीव मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये कमालीचे नैराश्य निर्माण झाले आहे. कर्जमाफी, दीडपट हमीभाव आणि जलयुक्त शिवारसारख्या घोषणा दिलासादायक ठरल्या असत्या, तर शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी होताना दिसले असते. पण दुर्दैवाने आजची परिस्थिती तशी नाही. सरकारने या गंभीर घटनेची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना कर्जासाठी आंदोलनास करण्यास भाग पाडणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, संबंधित शेतकऱ्यांना तातडीने कर्ज उपलब्ध करून द्यावे आणि तुकाराम वैजनाथ काळे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी, अशीही मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली.

इतर ताज्या घडामोडी
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा...अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१...मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व...
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍...पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक...
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता...मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने...
सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घटसातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम...
दक्षिण महाराष्ट्रात पक्षांपेक्षा ‘...कोल्हापूर: राज्याच्या इतर भागांप्रमाणे दक्षिण...
पिनाकीचंद्र घोष लोकपालपदीनवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह नवे नौदलप्रमुखनवी दिल्ली: व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह यांची भारतीय...
हरभरा चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांचा पोलिस...बुलडाणा : गेल्या वर्षात हमीभावाने विक्री केलेल्या...
कमाल, किमान तापमानात चढउतारमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध...सध्या हवामान बदलाचा परिणाम शेतीवर दुष्काळ, गारपीट...
सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींची...सोलापूर : लोकसभेच्या आधी जिल्ह्यातील आठ...
पीकविम्याचा योग्य मोबदला द्यावा : ‘...अकोला : संग्रामपूर तालुक्यात भीषण दुष्काळी...
नांदेड जिल्ह्यात पिकांना गारपिटीचा तडाखाकिनवट, जि. नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बोधडी बु (...
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...