agriculture news in marathi, opposition leaders become aggressive on drought and reservation, mumbai, maharashtra | Agrowon

दुष्काळ, आरक्षणाच्या मुद्द्यांवर विधान परिषदेचे कामकाज ठप्प
टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, तसेच मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण जाहीर करावे, या मागण्यांसाठी मंगळवारी (ता. २०) विधान परिषदेतही विरोधक आक्रमक झाले. यामुळे झालेल्या गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करावे लागले.

मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, तसेच मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण जाहीर करावे, या मागण्यांसाठी मंगळवारी (ता. २०) विधान परिषदेतही विरोधक आक्रमक झाले. यामुळे झालेल्या गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करावे लागले.

विधान परिषदेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या संदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला. ते म्हणाले, की १९७२ पेक्षा भयानक दुष्काळ राज्यात पडला आहे. सरकारने दुष्काळ जाहीर करून २२ दिवस उलटले तरी शेतकऱ्यांना मदत किंवा पाणीपुरवठ्यासाठी टॅंकर दिले जात नाहीत. दुष्काळाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. राज्यातील शेतकरी आणि शेतमजुरांच्या हाताला काम नाही. हातचे पीक गेले. शेतकऱ्यांनी जगायचे कसे, असा सवाल करतानाच शेतकरी आत्महत्या करत आहेत. आम्हाला सभागृहात चर्चा नकोय, आधी मदत जाहीर करा, अशी मागणी त्यांनी केली. सरकार दुष्काळप्रश्नी गंभीर नाही, असा आरोपही त्यांनी केला.

१९७२ च्या दुष्काळाऐवजी २०१८-१९ मधील या भंयकर दुष्काळाची इतिहासामध्ये नोंद होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तर फळबागांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत सरकारने जाहीर करावी त्याचप्रमाणे दुष्काळी भागातील वीजबिल आणि शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशा मागण्या मुंडे यांनी केल्या.

कार्यक्रम पत्रिकेत दुष्काळावर नियम २६० अन्वये चर्चा प्रस्तावित असल्यामुळे सभापतींनी स्थगन प्रस्ताव फेटाळून लावला. यावर चर्चा नको तात्काळ मदत जाहीर करा, असा पवित्रा विरोधकांनी घेतला. त्याचप्रमाणे मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण द्यायला सरकार चालढकल करीत आहे असा आरोपही विरोधी पक्षनेत्यांनी केला. मराठा समाजात आरक्षणाबाबत संशयाचे वातावरण आहे, असेही ते म्हणाले.

शासन मराठा समाज आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अहवाल पटलावर ठेवेल, इतर आरक्षणाला धक्का न लावता न्यायालयात टिकेल, असे आरक्षण सरकार देईल, अशी ग्वाही सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली. मात्र विरोधकांचे समाधान झाले नाही. स्थगन प्रस्तावही सभापतींनी फेटाळल्यामुळे विरोधकांनी वेलमध्ये उतरून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे, कामकाज पहिल्यांदा अर्ध्या तासासाठी दोनदा आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करावे लागले.

इतर ताज्या घडामोडी
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...
अठराशेवर गावांमध्ये घेतल्या जाणार २६५२...औरंगाबाद   : येत्या खरीप हंगामात...
खानदेशात बाजरी मळणीचा हंगाम आटोपलाजळगाव  ः खानदेशात बाजरीचा मळणी हंगाम आटोपला...
धुळे, नंदुरबारमध्ये राष्ट्रीयीकृत...धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा बॅंकेने १२ हजारांवर...
कोल्हापुरात ‘पाणीबाणी’ची शक्यताकोल्हापूर : जिल्ह्यात वेळेवर पाऊस सुरू न झाल्यास...
आरग येथे नागिलीच्या पानांचे सौदे सुरूसांगली  ः कधीकाळी खाण्यासाठी वापरण्यात...
अकोला जिल्ह्यात २० टक्क्यांपर्यंत...अकोला :  आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पीक...
नगर जिल्ह्यातील १२४ गावांचे पाणी दूषितनगर  : जिल्ह्यातील २६४५ गावांचे पाणीनमुने...
बुलडाणा जिल्हा कृषी विक्रेता संघटनेच्या...बुलडाणा ः जिल्हा कृषी विक्रेता संघटनेची १४...
निफाड तालुक्यात द्राक्षबागांच्या...नाशिक  : निफाड तालुक्यातील द्राक्षबागांमध्ये...
सोलापूर जिल्हा परिषद करणार ‘रोहयो’ची...सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या वतीने यंदाच्या...
भूगर्भात पाणीसाठा टिकविण्यासाठी भूमिगत...भूमिगत बंधारा बांधण्याचे काम जमिनीखाली असल्याने...
सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांत टाकली...नागपूर ः दुष्काळी मदत नाही, कर्जमाफीच्या...
वडगाव येथील पाटबंधारे कार्यालयासमोर...वडगाव निंबाळकर, जि. पुणे  ः नीरा डावा...
पुणे बाजार समितीवर पुन्हा प्रशासकीय...पुणे : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुणे बाजार...
अळिंबी उत्पादनातून केली संकटांवर मातलोणी (जि. जळगाव) येथील अनिल माळी यांच्याकडे कृषी...