agriculture news in marathi, opposition questions government on co-operative milk unions | Agrowon

दूध संघांच्या प्रश्नांवर विरोधक आक्रमक
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 डिसेंबर 2017

नागपूर : राज्यात सध्या अडचणीत आलेल्या सहकारी दूध संघांची परिस्थिती आणि सरकारकडून दरावरून करण्यात येणाऱ्या कारवाईवरून विरोधकांनी बुधवारी (ता. १३) लक्षवेधी सूचनेवरील चर्चेवेळी पशुसंवर्धन मंत्र्यांना चांगलेच धारेवर धरले. अखेर मुख्यमंत्र्यांनी याप्रश्नी बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर विरोधक शांत झाले.

नागपूर : राज्यात सध्या अडचणीत आलेल्या सहकारी दूध संघांची परिस्थिती आणि सरकारकडून दरावरून करण्यात येणाऱ्या कारवाईवरून विरोधकांनी बुधवारी (ता. १३) लक्षवेधी सूचनेवरील चर्चेवेळी पशुसंवर्धन मंत्र्यांना चांगलेच धारेवर धरले. अखेर मुख्यमंत्र्यांनी याप्रश्नी बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर विरोधक शांत झाले.

विरोधकांनी दूध संघांना भेडसावत असलेल्या मुद्यावर लक्षवेधी सूचना मांडली होती. दैनिक अॅग्रोवनने यासंदर्भातील घडामोडींचा सातत्याने पाठपुरावा केला होता. दूध संघ आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना सहन कराव्या लागत असलेल्या नुकसानीकडे वृत्ताच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले होते. 

जागतिक बाजारात दूध भुकटीचे दर कोसळल्याचा मोठा फटका राज्यातील सहकारी दूध संघांना सहन करावा लागत आहे. सध्या दूध उत्पादन वाढीचा काळ (पृष्ठकाळ) असल्याने संघांसमोर अतिरिक्त दुधाची समस्या आवासून उभी आहे. राज्य सरकारच्या धोरणानुसार २७ रुपये प्रति लिटर दराने गायीचे दूध खरेदी करताना संघांना प्रतिलिटर सुमारे ९ रुपयांहून अधिकचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे हंगामात दूध संघांना सुमारे ४५० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागण्याची शक्यता आहे. दूध दराबाबत सहकारी दूध संघांवर दबाव आणणाऱ्या राज्य सरकारकडून गुजरातचा अमूल आणि राज्यातील इतर खासगी दूध संघांकडून कमी दर देऊनही बोटचेपे धोरण राबवले जात आहे, असा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला होता. राज्य सरकारच्या १९ जूनच्या शासन निर्णयानुसार ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफ असलेल्या गायीच्या दुधाला २७ रुपये दर देणे संघांवर बंधनकारक आहे. तसेच दूध विक्रीचे दरही वाढवण्यात येऊ नयेत असे म्हटले आहे. 

दरम्यान, राज्य सरकारच्या धोरणामुळे सहकारी दूध संघांना दर देणे परवडत नसल्याची बाब राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी या वेळी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच सहकारी संस्था, दूध संस्था उभी करायला अक्कल लागले पण उद्‌ध्वस्त करायला अक्कल लागत नाही अशा कठोर शब्दात पदूममंत्री महादेव जानकर यांचा समाचार घेत जानकर दूध संघ संपवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा गंभीर आरोप केला. 

या वेळी मंत्री महादेव जानकर म्हणाले, की हा निर्णय शेतकऱ्यांसाठीच घेतलेला असल्याने जे दूध संघ हा दर देणार नाहीत. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटल्याने सरकार आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. मंत्री जानकर यांच्या या उत्तराने समाधान न झाल्याने श्री. पवार यांनी राज्य सरकारने ठरविलेला दर कोणत्या संघाला परवडत आहे? अशी विचारणा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना केली. या वेळी अध्यक्ष बागडे यांनीही राज्य सरकारने ठरविलेला दर आमच्या दूध संघाला परवडतच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना २१ ते २२ रुपये प्रति लिटर दराने पैसे दिले जात असल्याचे सांगितले. त्यामुळे दूध दराच्या बाबत आग्रही भूमिका घेणाऱ्या मंत्री जानकरांची अडचण झाली.

काँग्रेसचे सुनील केदार यांनी याच अनुषंगाने प्रश्न उपस्थित करत अध्यक्षांच्या दूध संघावर काय कारवाई करणार असा उपप्रश्न उपस्थित केला. त्यावर जानकर यांनी याबाबत अधिकाऱ्यांची समिती जे दूध संघ शासनाने निर्धारीत केलेला दूध दर देत नाहीत त्याची माहिती घेत आहेत. त्यासंदर्भात लवकरच एक अहवाल सादर केला जाणार असून त्यानंतरच निर्णय घेणार असल्याचे गुळमुळीत उत्तर दिले. शेवटी सभागृहात उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांना अजित पवार यांनी मध्यस्थी करण्याची विनंती केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी दूध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि प्रमुखांच्या उपस्थितीत अध्यक्षांच्या दालनात बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

इतर अॅग्रो विशेष
कांदाप्रश्नी हवे दीर्घकालीन धोरणसध्या कांद्याचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा बनला...
‘बीटी’ला पर्याय सेंद्रिय कापूसजागतिक पातळीवर काही कंपन्या आणि फॅशन ब्रॅंडने...
देशातील कृषी क्षेत्राचे २०१९ मध्ये...पुणे : देशातील शेती, जमीन, पशुधन धारणा, शेतकरी...
स्थानिकीकरणातही मका टिकवून आहे काही मूळ...जंगली मका प्रजातीपासून स्थानिकीकरण होण्याच्या...
कर्नाटकसाठीची ऊसतोडणी मंदावलीकोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रात उसाची रक्कम...
उजनी धरणातील पाणी प्रदूषितच :...सोलापूर  : उजनी धरणामुळे सोलापूर, पुणे आणि...
बाजारात डाळिंबाचे दर दबावातसांगली ः देशात डाळिंबाच्या उत्पादनात अंदाजे २० ते...
अवैध एचटीबीटी बियाणे एसआयटीला मुदतवाढमुंबई: परवानगी नसलेले तणनाशकाला सहनशील जनूक...
विदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्राला...पुणे : बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘पेथाई’...
समृद्धी महामार्ग : साडेतीनशे कोटींच्या...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम...
साखर संघाची दोन हजार कोटींच्या पॅकेजची...पुणे: राज्यातील साखर कारखाने आर्थिक अडचणीतून...
कॅल्शिअम, लोहाचा उत्तम स्त्रोत ः नाचणीआहारच्या दृष्टीने नाचणी एक अत्यंत महत्त्वाचे...
पिकातील लोह, जस्त, बोरॉन कमतरतेवरील...लोह (Fe) कार्ये ः हरितद्रव्ये निर्मितीचे (...
‘रेसिड्यू फ्री’ शेतमालासाठी उभारली थेट...सध्या रासायनिक अवशेषमुक्त (‘रेसिड्यू फ्री’) किंवा...
पूर्व विदर्भासह नागपूरपर्यंत रिमझिम...नागपूर : आंध्रप्रदेशात चक्रीवादळ दाखल झाल्याचा...
दुष्काळीशी सामना करण्यासाठी...पंढरपूर, जि. सोलापूर :  राज्यात यंदा...
पेथाई चक्रीवादळ आंध्रच्या किनारपट्टीला... किनारपट्टीय भागात जनजीवन विस्कळीत जमीन खचून...
उसाला पूरक शर्कराकंदसाखरेचा वाढलेला उत्पादन खर्च, वाढलेले उत्पादन,...
राजकीय अन् आर्थिक उत्पाताची नांदीअखेर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल ...
कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये...