Agriculture News in Marathi, opposition raised farmer loan waiver issue, legislative council adjourned, maharashtra | Agrowon

कर्जमाफीवरून विधिमंडळ ठप्प
टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 डिसेंबर 2017

नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता. १२) विरोधकांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर विधानसभा आणि विधान परिषद सभागृहात राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गदारोळ वाढल्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारपूर्वीच दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

मंगळवारी दिवसाच्या कामकाजाला सुरवात होण्यापूर्वी विधान भवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी सरकार विरोधात आंदोलन केले. गली गली में शोर है, सरकार चोर है, “शेतकऱ्यांना न्याय देता येत नसेल तर सत्तेतून खाली या, अशा घोषणांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला.

नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता. १२) विरोधकांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर विधानसभा आणि विधान परिषद सभागृहात राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गदारोळ वाढल्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारपूर्वीच दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

मंगळवारी दिवसाच्या कामकाजाला सुरवात होण्यापूर्वी विधान भवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी सरकार विरोधात आंदोलन केले. गली गली में शोर है, सरकार चोर है, “शेतकऱ्यांना न्याय देता येत नसेल तर सत्तेतून खाली या, अशा घोषणांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला.

त्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरू होताच अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर विरोधक सभागृहातही आक्रमक राहिले. विरोधकांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत धाव घेत राज्य सरकारचा निषेध नोंदवला. परिणामी सभागृहाचे कामकाज आधी तीन वेळा तहकूब झाले. गदारोळ सुरूच राहिल्याने बाराच्या सुमाराला कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे. या गदारोळात सरकारने काही शासकीय कामकाज उरकून घेतले.

तिकडे विधान परिषदेतही शेतकरी कर्जमाफीसह शेतीच्या इतर प्रश्नांवर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. सभागृहाचे कामकाज सुरू होताच सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला मात्र विरोधक आक्रमक पवित्र्यात होते. विरोधीपक्षाच्या आमदारांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली.

या गदारोळातच संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी सभागृहाचे कामकाज लोकशाही मार्गाने चालले पाहिजे असे सांगत कामकाज सुरू करण्याचे आवाहन सभापतींना केले. मात्र, गदारोळामुळे कामकाज पहिल्यांदा एक वाजेपर्यंत दोनदा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान या कर्जमाफीच्या योजनेसाठी १५ हजार कोटी रुपयांची तरतूद असलेल्या २०१७-१८ च्या २६ हजार ४०२ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या आणि इतर कागदपत्रे सभागृहासमोर मांडण्यात आली.

इतर अॅग्रो विशेष
मुद्रा योजनेच्या १० लाखांपर्यंतच्या...कोल्हापूर : तरुणांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर...
रब्बीचा ६१.८ दशलक्ष हेक्टरवर पेरानवी दिल्ली ः भारतातील रब्बी क्षेत्रात यंदा गेल्या...
प्रशिक्षणांना दांड्या मारणाऱ्या...अकोला : अधिकारी, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता...
ठिबक अनुदानासाठी ७६४ कोटींचा निधीपुणे: राज्यात ठिबक संच बसविलेल्या शेतकऱ्यांना...
मराठवाड्यात ४३ टक्‍के जमीन चुनखडऔरंगाबाद : मराठवाड्यातील जमिनीचा पोत दिवसेंदिवस...
दशकातील सर्वांत मोठ्या कापूस आयातीचे...जळगाव ः महाराष्ट्रासह काही प्रमुख कापूस उत्पादक...
कांदा निर्यात मूल्यात १५० डॉलरने कपातनवी दिल्ली : केंद्र सरकारने कांद्यावरील...
जमीन आरोग्यपत्रिकांसाठी एप्रिलपासून '...पुणे ः महाराष्ट्रात सुरू असलेल्या जमीन...
फक्त फळ तुमचे, बाकी सारे मातीचे..! नैसर्गिक शेतीचे प्रणेते म्हणून संपूर्ण...
असा घ्यावा मातीचा नमुना मातीचा नमुना तीन ते चार वर्षांनंतर एकदा घेतला...
हिरवळीच्या खतांवर भर द्या : सुभाष शर्मायवतमाळ येथील सुभाष शर्मा यांच्याकडे वीस एकर शेती...
कापूस आयात शुल्कवाढीचा विचारमुंबई ः केंद्र सरकारने देशांतर्गत शेतमालाचे दर...
कृषी संजीवनी प्रकल्पाचे एक पाऊल पुढेमुंबई : विदर्भ, मराठवाडा आणि खारपाण पट्ट्यातील ५,...
कृषी, घरगुती पाणी वापर दरात १७ टक्के...मुंबई: महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने...
फळबागेचे फुलले स्वप्न‘माळरानात मळा फुलला पाहिजे` हे वडिलांचे वाक्‍य...
नांदूरमध्यमेश्वरच्या पक्षी महोत्सवास...नाशिक : महाराष्ट्रातील भरतपूर म्हणून ओळखले जाणारे...
रसायन विरहित फायद्याची शेती शक्य भारतात आज नेमकी सेंद्रिय व नैसर्गिक शेती...
राज्यातील जमिनीत जस्त, लोह, गंधक,...डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मृद...
केवळ जमीन आरोग्यपत्रिकेचा उपयोग नाही :...परभणी :जमीन आरोग्यपत्रिकेतील शिफारशीनुसार...
विदर्भात किमान तापमानात सरासरीच्या...पुणे : विदर्भाच्या काही भागांत थंडीत वाढ झाली आहे...