agriculture news in marathi, Opposition to the redevelopment of market committee | Agrowon

बाजार समितीच्या पुनर्विकासाला विरोध
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळे, भाजीपाला, कांदा, बटाटा विभागाच्या पुनर्विकासाला अडत्यांनी एकमुखी विराेध केला आहे. पुनर्विकास करताना बाजार आवाराच्या हाेणारे स्थलांतर, निर्धारित वेळेची साशंकता, अतिरिक्त द्यावयाची रक्कम आदी कारणांमुळे बाजारपेठ उद्धवस्त हाेण्याची भीती असल्याने अडते असाेसिएशनने पुनर्विकासाला विराेध केला आहे.

मात्र एक दाेन बैठकांमध्ये हा निर्णय हाेणारा नसून, सर्व घटकांशी सकारात्मक चर्चा करून प्रकल्प मार्गी लावू, असा विश्‍वास बाजार समितीचे मुख्य प्रशासक दिलीप खैरे यांनी व्यक्त केला. 

पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळे, भाजीपाला, कांदा, बटाटा विभागाच्या पुनर्विकासाला अडत्यांनी एकमुखी विराेध केला आहे. पुनर्विकास करताना बाजार आवाराच्या हाेणारे स्थलांतर, निर्धारित वेळेची साशंकता, अतिरिक्त द्यावयाची रक्कम आदी कारणांमुळे बाजारपेठ उद्धवस्त हाेण्याची भीती असल्याने अडते असाेसिएशनने पुनर्विकासाला विराेध केला आहे.

मात्र एक दाेन बैठकांमध्ये हा निर्णय हाेणारा नसून, सर्व घटकांशी सकारात्मक चर्चा करून प्रकल्प मार्गी लावू, असा विश्‍वास बाजार समितीचे मुख्य प्रशासक दिलीप खैरे यांनी व्यक्त केला. 

पुणे बाजार समितीच्या पुनर्विकासासाबाबतच्या आराखड्याचे सादरीकरण गुरुवारी (ता. ९) बाजार समिती प्रशासनाच्या वतीने अडते असाेसिएशनच्या सर्वसाधारण बैठकीत केले. या वेळी बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळाचे मुख्य प्रशासक दिलीप खैरे, उपमुख्य प्रशासक भूषण तुपे, सदस्य अनिल देवढे, राजेंद्र काेरपे, सचिव पी. एल. खंडागळे अडते असाेसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांच्यासह बाजार आवारातील अडते माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.

या वेळी बाेलताना अडते असाेसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ म्हणाले, ‘‘बाजार समितीच्या वतीने फळे, भाजीपाला, कांदा, बटाटा विभागाच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू आहे. याबाबतच्या आराखड्याचे सचित्र सादरीकरण सर्व अडत्यांना करण्यात आले. मात्र पुनर्विकासादरम्यान बाजाराचे हाेणारे स्थलांतर, पुर्नविकास वेळेवर पूर्ण हाेईल का? याबाबतची साशंकता, गाळ्यांचे अतिरिक्त द्यावयाच्या शुल्काबाबत आडत्यांमध्ये साशंकता आणि भीतीचे वातावरण आहे.

वेळेत पुनर्विकास न झाल्यास आणि बाजार आवाराच्या हाेणाऱ्या स्थलांतरामुळे व्यवसायावर विपरित परिणाम हाेण्याची भीती व्यापाऱ्यांमध्ये आहे. यामुळे सर्व आडत्यांनी पुनर्विकासाला विराेध केला आहे. त्याच परिस्थितीत आणि जागेवर पुनर्विकास करणार असाल तरच पुढे चर्चा करू, अशी भूमिका घेतली आहे.

प्रशासकीय मंडळाचे मुख्य प्रशासक दिलीप खैरे म्हणाले, ‘‘स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये सर्व गाळे धाेकादायक झाले असल्याचे स्पष्ट आहे. ३५ वर्षांपूर्वी निर्माण केलेल्या पायाभूत सुविधांवर आता अतिरिक्त ताण येत असल्याने पुनर्विकास करणे आवश्‍यक आहे. यासाठी विविध घटकांशी सकारात्मक चर्चा सुरू आहे. अडते असाेसिएशनच्या शिष्टमंडळाची सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री गिरीष बापट यांच्या साेबत बैठक घेऊन पुढील निर्णय घेऊ.

 

इतर बातम्या
मॉन्सूनने अलिबाग, मालेगावपर्यंतचा भाग...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी...
‘म्हैसाळ’पासून जतचा पूर्व भाग वंचितसांगली : जत तालुक्याच्या पूर्व भागातील ६४ गावाला...
विकासकामांचे सूक्ष्म नियोजन करा :...परभणी : जिल्ह्यतील विविध विकास कामांचे सूक्ष्म...
पूर्व विदर्भात दमदार पाऊसनागपूर : पश्चिम आणि दक्षिणेकडून मॉन्सून येणे...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...
ऊस बिलावरून शेतकरी आक्रमकनाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना...
येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यात...नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) पावसाला सुरवात...
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे...देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री...
कोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पाऊसकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली...कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार...
अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी...अकोला  ः आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
नगर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात...नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने...
मराठवाड्यातील ५८ तालुक्यांत पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यामध्ये रविवारी (...
शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना...नगर   ः विमा योजनेत घोटाळा झाला...
पीकविम्यातील हलगर्जीपणा; कृषी...पुणे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेची कामे करताना...
मॉन्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यतापुणे : राज्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने आगमन...
औरंगाबाद, कोपरगाव, येवल्यात धोधो पाऊसपुणे : कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील...
`गुणनियंत्रण`चा चेंडू आता ‘एसीबी’च्या...पुणे : राज्याच्या कृषी विभागातील गुणनियंत्रण...
फिरत्या पशुचिकित्सालयामार्फत पशूंवर...बुलडाणा  : महाराष्ट्र विधानसभेत काल सादर...