जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (ज्वारी) आवक सुरू झाली असून, मागील आठवड्यात
ताज्या घडामोडी
नागपुर : दमनगंगा-पिंजाळ आणि पार-तापी-नर्मदा नदीजोड प्रकल्प पूर्ण करण्याबाबत सरकारच्या उत्तराने विरोधकांचे समाधान न झाल्याने विरोधकांनी वेलमध्ये येऊन सरकारच्या विरोधात घोषणाबाजी दिली. प्रकल्पाचे पाणी गुजरातला नेण्याचा सरकारचा डाव असल्याचा विरोधकांनी सरकारवर आरोप केला. 'भाजपवाले पाणीचोर' अशी घोषणाबाजीकरुन सभागृहात गदारोळ उठला होता. सरकारने नरेंद्र मोदी यांच्या दबावाला बळी पडू नये आणि एक थेंब सुद्धा पाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दबावाने गुजरातला जाणार नाही, याची दखल सरकारने घ्यावी असे अजित पवार यांनी सरकारला बजावले.
नागपुर : दमनगंगा-पिंजाळ आणि पार-तापी-नर्मदा नदीजोड प्रकल्प पूर्ण करण्याबाबत सरकारच्या उत्तराने विरोधकांचे समाधान न झाल्याने विरोधकांनी वेलमध्ये येऊन सरकारच्या विरोधात घोषणाबाजी दिली. प्रकल्पाचे पाणी गुजरातला नेण्याचा सरकारचा डाव असल्याचा विरोधकांनी सरकारवर आरोप केला. 'भाजपवाले पाणीचोर' अशी घोषणाबाजीकरुन सभागृहात गदारोळ उठला होता. सरकारने नरेंद्र मोदी यांच्या दबावाला बळी पडू नये आणि एक थेंब सुद्धा पाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दबावाने गुजरातला जाणार नाही, याची दखल सरकारने घ्यावी असे अजित पवार यांनी सरकारला बजावले. यावर उगाच राजकारणासाठी राजकारण करू नये, असे मंत्री गिरीष महाजन यांनी वक्तव्य केले.
आज (ता. २१) ही नागपुर विधानसभा अधिवेशन चांगलेच तापले. सभागृहातील विरोधकांचा गदारोळ कायम राहीला. मंत्री सभागृहाची दिशाभूल करतात, असा आरोप चक्क भाजप आमदार अनिल गोटे यांनीच केला.
पुणे जिल्ह्याच्या निगडे पाझर तलावाचे निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने फुटून शेतीचे नुकसान झालेल्या प्रश्नावर मंत्री राम शिंदे यांनी हे अंशतः खरे आहे असे उत्तर दिले. यावर हो किंवा नाही असं उत्तर सरकारकडून अपेक्षित आहे, मात्र सरकार अंशतः असे सांगून दिशाभूल करत असल्याचा आरोप भाजप आमदार अनिल गोटे यांनी केला. संबंधित ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट आणि शाखा अभियंत्याला आणि उपभियंत्याला आजच निलंबित करणार अशी राम शिंदे यांनी ग्वाही दिली.
आमदार दीपिका चव्हाण यांनी दीड वर्षांपूर्वी नाशिकच्या बागलान येथील तहसीलदार सुनील सौदाने यांच्याविरुद्ध हक्कभंगाची नोटीस दिली होती. मात्र दीड वर्षापासून कारवाई नाही, उलट या संदर्भात विशेषाधिकार भंग समितीने अहवाल सादर करण्यास मुदत वाढवून मागितली. यावर आक्षेप घेत विरोधकांनी गदारोळ करीत वेलमध्ये येऊन घोषणाबाजी केली. त्यानंतर मात्र सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
- 1 of 348
- ››