agriculture news in marathi, opposition strikes on Ballworm issue in assembly | Agrowon

बोंड अळी लक्षवेधीवरून विरोधक भडकले
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 डिसेंबर 2017

नागपूर : विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील कापूस पट्ट्यात गुलाबी बोंड अळीने घातलेल्या थैमानाचे तीव्र पडसाद विधानसभेत (ता. १३) बुधवारी उमटले. या संदर्भातील लक्षवेधीवर उत्तर न आल्याने सरकारने ही लक्षवेधी पुढे ढकलली. त्यावर काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते राज्य सरकारवर भडकले. शेतकरी अडचणीत असताना सरकार कुणाला पाठिशी घालते आहे, असा आरोप करीत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले.

नागपूर : विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील कापूस पट्ट्यात गुलाबी बोंड अळीने घातलेल्या थैमानाचे तीव्र पडसाद विधानसभेत (ता. १३) बुधवारी उमटले. या संदर्भातील लक्षवेधीवर उत्तर न आल्याने सरकारने ही लक्षवेधी पुढे ढकलली. त्यावर काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते राज्य सरकारवर भडकले. शेतकरी अडचणीत असताना सरकार कुणाला पाठिशी घालते आहे, असा आरोप करीत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले.

गुलाबी बोंड अळीने कापूस पट्ट्यातील शेतकऱ्यांचे सुमारे १५ हजार कोटींचे नुकसान झाले आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी या मागणीसाठी विरोधी पक्षाच्या आमदारांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. मात्र, यावर उत्तर न आल्याने सरकारने ही लक्षवेधी पुढे ढकलली. मात्र, या लक्षवेधीवर तातडीने चर्चा करा, अशी मागणी करीत विरोधक अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत धावून आले.

विरोधकांनी घोषणाबाजी करीत गोंधळ घातल्याने कामकाज दहा मिनिटे तहकूब करण्यात आले. त्यानंतर अजित पवार यांनी सरकारचे वाभाडे काढले. ते म्हणाले, राज्यात शेतकरी अडचणीत असताना सरकार कुणाला पाठिशी घालत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार पळवाट काढत आहे. लक्षवेधीवर सरकारला माहिती कशी मिळत नाही. बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीला सरकारने तातडीने भरपाई जाहीर करावी आणि यावर तातडीने चर्चा सुरू करावी, अशी मागणीही त्यांनी केली. 

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, शेतकऱ्यांप्रश्नी सरकार गंभीर नाही. सरकार वेळकाढूपणाचे धोरण राबवीत आहे. कामकाजात ही लक्षवेधी दाखवली असताना आता ती पुढे ढकलण्याचे कारण काय, अशी विचारणाही त्यांनी केली. दिलीप वळसे-पाटील म्हणाले, सरकार या सभागृहाला गांभीर्याने घेत नाही. गेल्या तीन वर्षांपासून हे चित्र दिसते आहे. ही महत्त्वाची लक्षवेधी सरकारने पुढे का ढकलली, याचे उत्तर सरकारने द्यावे आणि त्याबद्दल सरकारने दिलगिरी व्यक्त करावी. 

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा करू नये असे आवाहन केले. बोंड अळीच्या प्रश्नावर सरकारकडून उत्तर येईल, सरकार चर्चेला तयार आहे. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी मांडलेल्या २९३ अन्वये चर्चेच्या प्रस्तावात हा मुद्दा समाविष्ठ केला जाईल, असे आश्वासन देऊन चर्चेवर पडदा टाकला.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...