agriculture news in marathi, opposition strikes on farmers loan waiver scheme | Agrowon

शेतकरी कर्जमाफीवरुन विरोधक आक्रमक
टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

दोन्ही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब
मुंबई : शेतकरी कर्जमाफीवरुन विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंगळवारी (ता. २७) राज्य सरकारला विरोधकांच्या आक्रमक टीकेचा सामना करावा लागला. याच मुद्‌द्यावर विधानसभा आणि विधान परिषदेचे कामकाज दुपारपूर्वीच तहकूब झाले.

दोन्ही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब
मुंबई : शेतकरी कर्जमाफीवरुन विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंगळवारी (ता. २७) राज्य सरकारला विरोधकांच्या आक्रमक टीकेचा सामना करावा लागला. याच मुद्‌द्यावर विधानसभा आणि विधान परिषदेचे कामकाज दुपारपूर्वीच तहकूब झाले.

विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला. राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे, या योजनेचे लाभ शेतकऱ्यांना मिळत नाहीत. कर्जमाफीची घोषणा केल्यानंतरही राज्यात सुमारे दोन हजारहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे स्थगन प्रस्तावाद्वारे या विषयावर चर्चा करण्याची मागणी विखे यांनी केली.

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांची यादी देतो असे आश्वासन दिले होते. अजूनही मुख्यमंत्र्यांनी लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर केलेली नाही. त्यामुळे विरोधकांचा प्रस्ताव स्वीकारुन त्यावर चर्चा करण्याची आग्रही मागणी त्यांनीसुद्धा केली. विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी हा प्रस्ताव नाकारल्याचे सांगितले. तसेच हा विषय वेगळ्या माध्यमातून चर्चेला आणावा अशी सूचना विरोधकांना केली. मात्र, चर्चेचा आग्रह धरत विरोधक अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत आले.

सरकार विरोधात घोषणाबाजी करीत विरोधकांनी सरकारचा निषेध नोंदवला. विरोधकांच्या गोंधळातच सभागृहात मुंबईतील कमला मिलमधील पबमध्ये लागलेल्या आगीवरील लक्षवेधीवर चर्चा सुरू झाली. ही चर्चा संपल्यानंतर अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दुपारी एकपर्यंत तहकूब केले. त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब केल्याची घोषणा केली.

विधान परिषदेतही कर्जमाफीचा मुद्दा गाजला. राज्य सरकारच्या कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नसून सरकार शेतकऱ्यांना तुघलकी वागणूक देत असल्याचा आरोप करत विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे विधान परिषदेचे कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हा मुद्दा उपस्थित करत स्थगन प्रस्ताव मांडला. १७ जिल्ह्यांमध्ये फिरल्यानंतर एकाही शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याचे निदर्शनाला आल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली. हा स्थगन प्रस्ताव सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी फेटाळून लावला. त्यामुळे विरोधकांनी वेलमध्ये येऊन सरकार विरोधात घोषणाबाजी केली. गदारोळ कायम राहिल्याने कामकाज पहिल्यांदा २० मिनिटे आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. 

इतर अॅग्रो विशेष
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...
राज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...
'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...
दहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना...पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे...
शेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...
कसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष? अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...
'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर  : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...
पंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...
विविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
किमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...
जन्मोजन्मी दास । व्हावे हेचि माझी आस ।।जन्मोजन्मी दास । व्हावे हेचि माझी आस ।। पंढरीचा...
शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी...तासगाव, जि. सांगली ः छत्रपती शिवाजी महाराज, डॉ....