agriculture news in marathi, opposition strikes on government on loanwaiver scheme | Agrowon

कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत गोंधळ
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 डिसेंबर 2017

नागपूर : कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी बुधवारी (ता. १३) पुन्हा गोंधळ घातल्याने विधान परिषदेचे कामकाज गुरुवार (ता. १४)पर्यंत तहकूब करण्यात आले. गुरुवारी दुपारी बारा वाजता विधान परिषदेच्या कामकाजास सुरवात होईल.

नागपूर : कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी बुधवारी (ता. १३) पुन्हा गोंधळ घातल्याने विधान परिषदेचे कामकाज गुरुवार (ता. १४)पर्यंत तहकूब करण्यात आले. गुरुवारी दुपारी बारा वाजता विधान परिषदेच्या कामकाजास सुरवात होईल.

सत्ताधाऱ्यांनी केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे सदस्य सुनील तटकरे यांनी केला. सरकारने केवळ जाहिरातीपुरतीच माफी दिली. प्रत्यक्षात एकाही शेतकऱ्याच्या खात्यात आजवर एक रुपयाही जमा झाला नाही, असे तटकरे म्हणाले. दिवाळीत सरकार कर्जमाफी देत शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार होते. त्यानंतर वारंवार कर्जमाफीच्या तारखा जाहीर झाल्या. परंतु शेतकऱ्यांच्या हातात काहीच आले नाही, असा आरोप करीत वेलमध्ये जात सुनील तटकरे आणि विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे यांनी घोषणाबाजी केली. 

सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी या वेळी सरकार म्हणून आम्ही या प्रश्‍नावर चर्चेसाठी तयार असून, विरोधकांनी विरोधाला विरोध करू नये, असे सांगितले. चर्चेतून या समस्येचे समाधान शोधता येईल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. परंतु विरोधकांचे समाधान न झाल्याने त्यांची घोषणाबाजी सुरूच होती. गोंधळ थांबत नसल्याचे पाहून दिवसभरासाठी विधान परिषदेचे कामकाज तहकूब करण्यात आले. 

इतर ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...
शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे विदर्भ,... पुणे ः पश्चिम महाराष्ट्रातील दूध व ऊस...
औरंगाबादेत बटाटा प्रतिक्‍विंटल १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
धुळीतील जिवाणूंना रोखण्यासाठी हवे...खिडक्यातून आत येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे धुळीमध्ये...
हळदीमध्ये भरणी, खत व्यवस्थापन...हळदीची उगवण आणि शाकीय वाढ यांनतर पुढील दोन...