विधान भवनावर विरोधकांचा आज हल्लाबोल मोर्चा

विधान भवनावर विरोधकांचा आज हल्लाबोल मोर्चा
विधान भवनावर विरोधकांचा आज हल्लाबोल मोर्चा

नागपूर : शेतकरी कर्जमाफी, बोंड अळीमुळे कपाशीचे झालेले नुकसान आणि यवतमाळमधील कीटकनाशकांच्या बळींच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला नाकर्तेपणाचा जाब विचारण्यासाठी मंगळवारी (ता. १२) विधानभवनावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह शेकाप, समाजवादी पक्ष, रिपाइं (कवाडे) या पक्षांचा एकत्रित मोर्चा धडकणार आहे.

राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.

सकाळी ११ वाजता काँग्रेसचे कार्यकर्ते दीक्षाभूमीजवळ एकत्र येऊन मोर्चाला सुरवात करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते धनवटे कॉलेजजवळ एकत्र येऊन विधान भवनाच्या दिशेने मार्गस्थ होतील. दोन्ही पक्षांचे मोर्चे लोकमत चौकात येतील आणि तेथून एकत्रितपणे विधान भवनावर धडकणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकार गेल्या तीन वर्षांत सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे, असा विरोधकांचा आरोप आहे.

शेतकरी, कष्टकरी, कामगार, व्यापारी, नोकरदार, दलित, अल्पसंख्याक, महिला, तरुण कोणीही समाधानी नाही. सरकारच्या जनविरोधी धोरणांमुळे जनतेत प्रचंड संताप आहे. या संतापाला वाचा फोडण्याचे काम या जनआक्रोश हल्लाबोल मोर्चाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न होत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख नेते, खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांसह राज्याच्या विविध भागांतून येणारे नागरिक या मोर्चात सहभागी होणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com