agriculture news in marathi, orange crop loan insurance deposited in debt account, akola | Agrowon

संत्र्याचा पीकविमा कर्जखात्यात केला जमा
गोपाल हागे
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

अकोला : संत्रा पिकाच्या नुकसानीसाठी मिळालेली पीकविम्याची रक्कम राष्ट्रीयीकृत बॅंकांनी थेट कर्जखात्यात वळती केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बॅंकांनी हा पैसा बचत खात्यात जमा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

अकोला : संत्रा पिकाच्या नुकसानीसाठी मिळालेली पीकविम्याची रक्कम राष्ट्रीयीकृत बॅंकांनी थेट कर्जखात्यात वळती केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बॅंकांनी हा पैसा बचत खात्यात जमा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

मागील वर्षी आंबिया बहारात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई म्हणून विमा कंपनीकडून हेक्‍टरी 17 हजार 500 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे; मात्र आलेली ही रक्कम काही राष्ट्रीयीकृत बॅंकांनी थेट कर्ज खात्यात जमा करण्याचा प्रताप केला आहे. आपल्याच गावातील इतर शेतकऱ्यांना इतर बॅंकांकडून पीकविम्याची रक्तम मिळाली; मात्र आपल्याला का मिळत नाही हे जाणण्यासाठी शेतकरी बॅंकेत गेले असता त्यांच्या कर्ज खात्यात पैसे जमा केल्याचे बॅंकेच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. याबाबत आपणास वरिष्ठांकडून आदेश असल्याचेही त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले.

याबाबत अकोट तालुक्‍यातील बोर्डी येथील अनेक संत्रा उत्पादकांनी तर अकोट येथील स्टेट बॅंकेच्या शाखाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागणीच केली. सुभाष तळोकार, नागोराव कठाळे, दीपक आतकड, अनिल आतकड, रमेश उगले, गजानन शेळके, उमेश भालतिलक, राजेश भालतिलक, श्रीराम भालतिलक, रंजना कठाळे, गजानन भालतिलक, सुनील ताडे, वैभव आतकड, दिलीप तळोकार, गोपाल भालतिलक यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी निवेदन दिले आहे. यावर अद्याप कुठलाच तोडगा बॅंकेकडून काढला गेला नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांची उडाली झोप
या वर्षी खरीप हंगाम चांगला आलेला नसल्याने शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे. ऐन दिवाळीच्या काळात हे पैसे हातात पडले असते. पीकविम्याची रक्कम कर्जखात्यात वळविल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. या सर्व बाबींचा विचार करताना बॅंकेने सेव्हिंग (बचत) खात्यात पैसे वळती करावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

 

इतर अॅग्रो विशेष
आषाढीच्या महापूजेचा मान हिंगोलीतील जाधव...सोलापूर  : आषाढी सोहळ्यातील शासकीय...
लाभार्थी निवडीसाठी ग्रामसभेत सोडतराहुरी, जि. नगर : चिंचविहिरे येथे कृषी विभागाच्या...
तालुका कृषी कार्यालयाचा कारभार हाकतात...गडचिरोली ः दुर्गम, आदिवासीप्रवण भागात कृषी...
देशातील जलाशयांमध्ये ३२ टक्के पाणीसाठानवी दिल्ली ः देशातील महत्त्वाच्या ९१ जलशयांमध्ये...
विदर्भात अतिवृष्टीचा इशारापुणे : बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाच्या...
आज आषाढी एकादशीपंढरपूर :  त्रिविध तापांची झाली बोळवण ।...
शासकीय महापूजेला मुख्यमंत्री जाणार नाहीतपुणे - आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांना...
तेल्हारा तालुक्यात बीटीवर बोंड अळीअकोला ः यंदाच्या हंगामात प्री-मॉन्सून लागवड...
साखरेसाठी दुहेरी दर योजना अव्यवहार्यनवी दिल्ली ः साखरेचे दर घसरल्याने उद्योगात वापर...
आता होणार पीक पेऱ्याची अचूक नोंद लातूर  : पेरणीचे सूक्ष्म नियोजन व अचूक संकलन...
पावसाचा जोर वाढण्याचा अंदाजपुणे : बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाचे...
बनावट संवर्धके, कीटकनाशकांचा २९ लाखांचा...परभणी: विनापरवाना बनावट पीकवाढ संवर्धके (...
दूध दराबाबतचे हमीपत्र देणे बंधनकारकपुणे  ः दूधदरप्रश्‍नी शासनाने जाहीर केलेल्या...
पुणे दूध संघाला ‘एनडीडीबी’चे मानांकनपुणे ः भेसळयुक्त दूध विक्रीला आळा घालण्यासाठी...
पालख्या पंढरपूरच्या उंबरठ्यावर...भाग गेला, शीण गेला । अवघा झाला आनंद ।। ...
शेतीला दिली शेळीपालनाची जोडपाटबंधारे खात्यातील नोकरी सांभाळून राम चंदर...
बचत गटातून वाढली रोजगाराची संधीशेडगाव (ता. श्रीगोंदा, जि. नगर) येथील महिलांनी...
दूध दरवाढ निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत...कोल्हापूर: दूध संघांनी गायीच्या दुधास २५ रुपये...
विदर्भ, मराठवाडा विकासासाठी २२ हजार...नागपूर (विशेष प्रतिनिधी) ः विदर्भ, मराठवाडा आणि...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारापुणे : बंगालच्या उपसागरात शुक्रवारी (ता. २०...