agriculture news in marathi, orange crop specialist of spain visit farmes, nagpur, maharashtra | Agrowon

लिंबूवर्गीय झाडांच्या पानांचे परीक्षण महत्त्वाचे ः रॅमॉन नेव्हिया
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

नागपूर   ः लिंबूवर्गीय पीक उत्पादनामध्ये पानांची भूमिका महत्त्‍वाची आहे. त्यामुळे माती, पाण्यासोबतच पानांचे देखील परिक्षण तितकेच महत्त्वाचे ठरते. संत्रा उत्पादकांनी सर्वप्रथम पानांचे परिक्षण करून घ्यावे, त्यानुसार पीक व्यवस्थापन करावे, असा सल्ला स्पेन येथील आंतरराष्ट्रीय संत्रा सल्लागार रॅमॉन नेव्हिया यांनी दिला.

नागपूर   ः लिंबूवर्गीय पीक उत्पादनामध्ये पानांची भूमिका महत्त्‍वाची आहे. त्यामुळे माती, पाण्यासोबतच पानांचे देखील परिक्षण तितकेच महत्त्वाचे ठरते. संत्रा उत्पादकांनी सर्वप्रथम पानांचे परिक्षण करून घ्यावे, त्यानुसार पीक व्यवस्थापन करावे, असा सल्ला स्पेन येथील आंतरराष्ट्रीय संत्रा सल्लागार रॅमॉन नेव्हिया यांनी दिला.

हातला (ता. काटोल) येथील धीरज जुनघरे यांच्या सघन संत्रा बागेला रॅमॉन नेव्हिया यांनी भेट दिली. महाऑरेंजच्या माध्यमातून संत्रा उत्पादकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेला स्पेन येथील बीयाट्रीझ, शॉव, महाआॅरेंजचे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे, राहूल ठाकरे, सुधीर जगताप, मनोज जवंजाळ, महेश दामोदरे, चंद्रशेखर बोंडे, देवेन बडोला, महेश दामोदरे यांची उपस्थिती होती.

रॅमॉन नेव्हिया म्हणाले, की पानात होणारे बदल फळांच्या अवस्थेच्या बदलास पूरक ठरतात. त्याकरिता पानांचे परिक्षण हा महत्त्वाचा टप्पा आहे. प्रयोगशाळेतील पृथ्थकरणाअंती पानांमध्ये नेमक्‍या कोणत्या घटकांची कमतरता आहे, हे लक्षात येते. नवती फुटत असताना पाने परिक्षणाकरिता पाठवू नये. परिक्षणाकरिता पाठविण्यात येणारी पाने एकसारखीच असावी. एका झाडापासून सरासरी चार पाने याप्रमाणे एकरातून ४० ते ५० पाने परिक्षणाकरिता पाठवावी.

राहूल ठाकरे यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका मांडली. संत्रा उत्पादकांनी यापुढील काळात उत्पादकता वाढीसाठी शास्त्रोक्‍त व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन श्रीधर ठाकरे यांनी या वेळी केले. सूत्रसंचालन मनोज जवंजाळ यांनी केले.

इतर ताज्या घडामोडी
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा...अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१...मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व...
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍...पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक...
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता...मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने...
सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घटसातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम...
दक्षिण महाराष्ट्रात पक्षांपेक्षा ‘...कोल्हापूर: राज्याच्या इतर भागांप्रमाणे दक्षिण...
पिनाकीचंद्र घोष लोकपालपदीनवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह नवे नौदलप्रमुखनवी दिल्ली: व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह यांची भारतीय...
हरभरा चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांचा पोलिस...बुलडाणा : गेल्या वर्षात हमीभावाने विक्री केलेल्या...
कमाल, किमान तापमानात चढउतारमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध...सध्या हवामान बदलाचा परिणाम शेतीवर दुष्काळ, गारपीट...
सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींची...सोलापूर : लोकसभेच्या आधी जिल्ह्यातील आठ...
पीकविम्याचा योग्य मोबदला द्यावा : ‘...अकोला : संग्रामपूर तालुक्यात भीषण दुष्काळी...
नांदेड जिल्ह्यात पिकांना गारपिटीचा तडाखाकिनवट, जि. नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बोधडी बु (...
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...