agriculture news in marathi, orange export to dubai from nagpur, maharashtra | Agrowon

नागपुरी संत्र्यांची प्रथमच हवाईमार्गे दुबईला निर्यात
टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 मार्च 2018
नागपूर ः रंग आणि चवीच्या बाबतीत वेगळेपण जपणाऱ्या नागपुरी संत्र्यांची बहरीन आणि कुवैतला निर्यात झाल्यानंतर प्रथमच दुबई येथूनदेखील त्यास मागणी नोंदवण्यात आली. त्यानुसार दुबईला तब्बल दोन हजार किलो संत्र्यांची निर्यात नुकतीच (ता. १६) हवाईमार्गे करण्यात आली. महाऑरेंजने यासाठी पुढाकार घेतला.
 
नागपूर ः रंग आणि चवीच्या बाबतीत वेगळेपण जपणाऱ्या नागपुरी संत्र्यांची बहरीन आणि कुवैतला निर्यात झाल्यानंतर प्रथमच दुबई येथूनदेखील त्यास मागणी नोंदवण्यात आली. त्यानुसार दुबईला तब्बल दोन हजार किलो संत्र्यांची निर्यात नुकतीच (ता. १६) हवाईमार्गे करण्यात आली. महाऑरेंजने यासाठी पुढाकार घेतला.
 
विदर्भाचे मुख्य पीक असलेल्या संत्र्याच्या निर्यातीला चालना मिळावी, याकरिता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रयत्नशील आहेत. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून त्यांनी महाऑरेंजला थेट विमानतळावर संत्रा विकण्याकरिता आउटलेट उपलब्ध करून दिले आहे. विमानमार्गे भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांना या आउटलेच्या माध्यमातून नागपुरी संत्र्यांची चव चाखता येणार आहे. लवकरच हे आउटलेट सुरू होईल, अशी माहिती आहे. 
 
दरम्यान बहरीन आणि कुवैतला नागपुरी संत्र्यांची निर्यात आठवडाभरापूर्वी करण्यात आली होती. याकरिता विमानसेवेचा उपयोग करण्यात आला. दीड हजार किलो संत्रा या दोन्ही देशांत पाठविण्यात आला. त्यानंतर गुरुवारी (ता. १५) रात्री कतार एअरवेजच्या माध्यमातून दोन हजार किलो संत्रा शारजा मार्गे दुबईला पाठविण्यात आला. शुक्रवारी (ता. १६) सकाळी तो दुबईत दाखल झाला. तेथील मॉलमध्ये हा संत्रा विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे.
 
महाऑरेंजने या फळपिकाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्याचाच परिपाक म्हणून कुवैत आणि बहरीन यांनी पुन्हा एका कंटेनरची मागणी नोंदविली आहे. 

१५० ते २०० ग्रॅम वजनाचा ए ग्रेड अर्थात स्थानिक भाषेत ९६ दाणा संत्रा येथे पाठविण्यात आला. एका बॉक्‍समध्ये १२ संत्रा फळे ठेवून त्याचे पॅकिंग करण्यात आले. संत्रा फळांना खास नेट लावण्यात आली होती. या हंगामातील सर्वांत उच्चांकी ४८ हजार रुपये प्रतिटन असा दर संत्रा उत्पादकाला यासाठी देण्यात आला, अशी माहिती महाऑरेंजचे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे यांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...
सभा मोदींची; प्रशासनाने घेतली...नाशिक : लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल...
नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर...नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत....
सौर कृषिपंप योजना खोळंबलीजळगाव : सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकरऔरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे होणारी...
नत्र ऱ्हास रोखण्यासोबत वाढवता येईल...शेतकरी आपल्या मक्याच्या उत्पादनांचा अंदाज...
खानदेशात पाणंद रस्त्यांची कामे ठप्पजळगाव : खानदेशात जानेवारीत मंजुरी मिळालेल्या,...
म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार...जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला...
पुणे विभागात रब्बी कांद्याचे ३६ लाख टन...पुणे   ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी...
गारपीट, वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला...पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या...
जळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ६५००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
अवकाळी पावसाने वऱ्हाडात दाणादाणअकोला   ः वऱ्हाडातील अनेक भागात...
नगर जिल्ह्यातील १२८ गावांत दूषित पाणीनगर  : ‘सर्वांना शुद्ध पाणी’ यासाठी सरकार...
आमच्या काळात एकही घोटाळा नाही :...सोलापूर : काँग्रेस आघाडी देशाला मजबूत करू...
सातारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी...सातारा : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून ढगाळ...
बहुपयोगी नत्रयुक्त खत `कॅल्शिअम...सावकाश उपलब्ध होण्याच्या क्षमतेमुळे कॅल्शियम...
जल, मृद्‌संधारणासाठी पूर्वमशागत...जमिनीमध्ये चांगले पीक उत्पादन येण्याकरिता भौतिक,...
कृषी सल्ला : भुईमूग, आंबा पीक भुईमूग शेंगा अवस्था भुईमूग पीक आऱ्या...