agriculture news in Marathi, orange farming affected by water scarcity, Maharashtra | Agrowon

पाणीटंचाईने संत्राबागांची होरपळ
टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

पाणी असेल तर झाडावर फळे अधिक काळ टिकतात. परंतु सद्या उन्हाची तीव्रता वाढत असल्याने फळावर एका बाजूने सूर्याची किरणे पडून फळे चांदणी (डागाळतात) पडून खराब होतात. त्यासोबतच फळांना लवकरच रंगधारणा होऊन ती परिपक्‍व होत असल्याने विक्रीसाठी काढण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्याचा दरावर परिणाम होतो.
- शेषराव घोडेराव, संत्रा उत्पादक, गव्हाणकुंड, ता. वरुड, जि. अमरावती

अमरावती ः विदर्भाचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या संत्रा उत्पादक वरुड तालुक्‍यातील सिंचन प्रकल्प निम्म्यावर आल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. संत्रा बागा जगविण्यासाठी पाण्याची उपलब्धतेचे आव्हान असतानाच आता विजेच्या समस्येने देखील शेतकरी हवालदिल झाले आहेत.

वरुड तालुक्‍यात नऊ प्रकल्प असून यावर्षी पावसाळ्यात सरासरी ४० टक्‍केच जलसाठा संचयित झाला. एकेकाळी जानेवारीपर्यंत वाहत्या राहणाऱ्या नदीला एकही पूर गेला नाही. ऑक्‍टोबर महिन्यात ९ सिंचन प्रकल्पांपैकी जामगाव प्रकल्पात ७८.८४ व वाईमध्ये ६८.२५ टक्‍के जलसाठा उरला आहे. उर्वरित प्रकल्पांमध्ये ५० टक्‍क्‍यांपेक्षा कमी जलसाठा असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढीस लागली आहे.

शेकदरी प्रकल्पात १० ऑक्‍टोबरपर्यंत १९.८९ टक्‍के, पुसली प्रकल्पात १७.२४ टक्‍के, सातनूर प्रकल्पात ३०.४१ टक्‍के, पांढरी प्रकल्पात ५७.२४ टक्‍के, नागठाणा प्रकल्पात ४५.३१ टक्‍के जलसाठा आहे. जमालपूर व बेलसावंगी प्रकल्प कोरडे पडले आहेत. तालुक्‍यात दहा ऑक्‍टोबरपर्यंत केवळ ५४० मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी याच तारखेपर्यंत ७६७.९० मि.मि. पावसाची नोंद झाली होती. पाऊस कमी झाल्याने यावर्षी जलसंकट अधिक गडद होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

सिंचनाची गैरसोय
वरुड तालुक्‍यात सुमारे २३ हजार ५०० हेक्‍टर क्षेत्रावर संत्रा लागवड आहे. सद्या आंबीया बहारातील संत्राफळे झाडावर आहेत. पाण्याची उपलब्धता असलेले शेतकरी मृग बहाराची फळे घेतात. परंतु भुजल पातळी खालावल्याच्या परिणामी अनेक ठिकाणी बोअरवेल आणि विहिरी कोरड्या पडण्यास सुरवात झाली आहे. त्यातच कृषिपंपांना दिवसाऐवजी रात्री ११ किंवा १२ वाजतानंतर वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. 

 

इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात रब्बीची केवळ १९ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा दुष्काळाची छाया किती...
केळीच्या आगारातून आखातात जाणार ४००...जळगाव ः केळीचे आगार असलेल्या जळगाव जिल्ह्यातून...
महाकॉट ब्रॅण्डची चमक पडली फिकीजळगाव ः पूर्व विदर्भ, उत्तर मराठवाडा व खानदेशातील...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथअंबाणी (जि. सातारा) येथील सौ. सुरेखा पांडुरंग...
दक्षिण कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात आज...पुणे : दक्षिण भारतामध्ये असलेल्या ‘गज’...
अभ्यास अन् नियोजनातून शेती देते समाधाननाशिक शहरातील प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध...
‘सीसीआय’ची कापूस खरेदी मंगळवारपासून...जळगाव : कापूस खरेदीसंबंधी जिनिंगमध्ये केंद्र...
दुष्काळ, मराठा आरक्षण अधिवेशनात गाजणारमुंबई : उद्यापासून (ता. १९) मुंबईत सुरू होत...
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...
बा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे!‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली,  पूर...
विना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...
राज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे   : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...
महाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा  ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...
दुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...
ओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...
सोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...
राज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....
कापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...
चारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...
दुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...