agriculture news in marathi, Order to close the pump in the dam | Agrowon

धरणातील शेतीपंप बंद करण्याचे आदेश
टीम अॅग्रोवन
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018

नांदगाव, जि. नाशिक : नजीकच्या काळात दुष्काळाला सामोरे जावे लागण्याची स्थिती असून, पिण्याच्या पाण्याची अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणातील पंप तत्काळ बंद करण्याचे आदेश प्रांताधिकारी भीमराज दराडे यांनी दिले आहेत.

नांदगाव तालुक्यात यंदा नद्या-नाले कोरडेच राहिले. गिरणा धरणातून काही गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. माणिकपुंज धरण ७० टक्केच भरले आहे. नाग्यासाक्या धरणाच्या गढूळ असलेल्या मृत पाणीसाठ्यातून ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाऊस येईपर्यंत ‘माणिकपुंज’वर अवलंबून राहावे लागणार आहे.

नांदगाव, जि. नाशिक : नजीकच्या काळात दुष्काळाला सामोरे जावे लागण्याची स्थिती असून, पिण्याच्या पाण्याची अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणातील पंप तत्काळ बंद करण्याचे आदेश प्रांताधिकारी भीमराज दराडे यांनी दिले आहेत.

नांदगाव तालुक्यात यंदा नद्या-नाले कोरडेच राहिले. गिरणा धरणातून काही गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. माणिकपुंज धरण ७० टक्केच भरले आहे. नाग्यासाक्या धरणाच्या गढूळ असलेल्या मृत पाणीसाठ्यातून ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाऊस येईपर्यंत ‘माणिकपुंज’वर अवलंबून राहावे लागणार आहे.

प्रांत भीमराज दराडे, तहसीलदार भारती सागरे व गटविकास अधिकारी जगन सूर्यवंशी यांनी गुरुवारी (ता. ४) माणिकपुंज धरणाला भेट देऊन तेथील विजेचे शेतीपंप बंद करण्याच्या सूचना दिल्या. ‘आम्ही पंप बंद करू; परंतु नदीतून पाणी सोडले जाणार असल्यास ते सहन करणार नाही,’ असा सूर शेतकऱ्यांमधून उमटला. माणिकपुंजचे पाणी हा वादाचा विषय होऊ नये. त्याकडे तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचा साठा म्हणून बघावे, अशी सामंजस्याची भूमिका सर्वांनी घ्यावी, असे आवाहन ग्रामस्थांनी केले.

दराडे म्हणाले, ‘‘तालुक्यात पृष्ठभागावरचे पाणी स्रोत आटले आहेत. विहिरींनी आॅक्टोबर महिन्यातच तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. गिरणा धरणाचे पाणी अल्पावधीत सगळीकडे उपलब्ध करून देणे कठीण आहे. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले
जावे. कासारीच्या दोन धरणांत पाणी आहे. याशिवाय तालुक्यात इतरत्र पाणीसाठे नाहीत. माणिकपुंज धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा करू नये. वीजचोरी करणाऱ्यांवर कारवाई करावी.``

इतर ताज्या घडामोडी
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...
नगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...
तासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली  ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...
विसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद   : येथे रविवारी (ता....
वऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला  ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर  ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...
‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर  : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...
पीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा   ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...
इंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे  : सरकारने आता तांत्रिक...
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...