agriculture news in marathi, Order for pomiculture crops | Agrowon

हुमणीबाधित उसाचे पंचनामे करण्याचे आदेश
टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

सोलापूर : पावसाने हुलकावणी दिल्याने आधीच हैराण असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर आता ऊसावरील हुमणीच्या आक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत. गेल्या काही दिवसांपासून शेतकरी संघटनांसह काही पक्षांनी सातत्याने याबाबत मागणी लावून धरली आहे. पण अद्यापही काहीच कार्यवाही होत नव्हती. दस्तुरखुद्द कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यापर्यंत हे प्रकरण गेले. अखेरीस त्यांनी हुमणीबाधित उसाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

सोलापूर : पावसाने हुलकावणी दिल्याने आधीच हैराण असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर आता ऊसावरील हुमणीच्या आक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत. गेल्या काही दिवसांपासून शेतकरी संघटनांसह काही पक्षांनी सातत्याने याबाबत मागणी लावून धरली आहे. पण अद्यापही काहीच कार्यवाही होत नव्हती. दस्तुरखुद्द कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यापर्यंत हे प्रकरण गेले. अखेरीस त्यांनी हुमणीबाधित उसाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्ह्यातील पंढरपूर, माढा, माळशिरस, मोहोळ, मंगळवेढा या ऊस पट्ट्यात प्रामुख्याने हुमणीचा मोठा प्रार्दुभाव झाला आहे. या वाढत्या अतिक्रमणाने जिल्ह्यातील ऊस शेती संकटात आली आहे. सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून सोलापूरची ओळख आहे. जिल्ह्यात यंदाही जवळपास दीड लाख एकरवर उसाची लागवड आहे. जिल्ह्यातील उसाला हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने जिल्ह्यातील हजारो हेक्‍टरवरचे पीक वाया चालले आहे. हुमणी अळीमुळे बाधित झालेल्या ऊस क्षेत्राचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

माळशिरस, पंढरपूर, मोहोळ तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात या अळीचा प्रादुर्भाव बघायला मिळत आहे. संबंधित तालुक्‍यातील कृषी विभाग व महसूल यंत्रणा यांच्या माध्यमातून हे पंचनामे केले जाणार आहेत. तालुका स्तरावरून अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत राज्य सरकारकडे सोलापूर जिल्ह्याच्या वतीने प्रस्ताव पाठविला जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सध्या तरी पंचनामे आणि अहवाल इथपर्यंत ही प्रक्रिया थांबली आहे. मदतीबाबत अद्याप काहीच हालचाली नाहीत.

इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये डॉ. सुजय विखे, शिर्डीत...नगर  : विसाव्या फेरीअखेर नगर लोकसभा...
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...
‘कृष्णामाई’चा कर्नाटकातील काठ तहानला;...कोल्हापूर : कृष्णा नदीवर अवलंबून असणाऱ्या कर्नाटक...
जळगावात लिंबू २२०० ते ५००० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
देशभरात ७२४ महिला उमेदवारांचे भवितव्य...नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा...
गारपिटीनंतर द्राक्ष बागेची अधिक काळजी...द्राक्ष बागेमध्ये वाढीच्या विविध अवस्थेमध्ये...
अमरावती : नाफेडने अचानक केली तूरखरेदी...अमरावती : ऑनलाइन नोंदणी केलेल्या दहा टक्‍के...
बुलडाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईबुलडाणा ः गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच...
दुष्काळात संत्रा बागेला टँकरच्या...अकोला ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्याला चौफेर...
खानदेशात सौर कृषिपंप योजनेतून लवकरच पंप...जळगाव ः सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मिरज, तासगावसह सिंधुदुर्गात पाऊससिंधुदुर्ग, सांगली : विजांच्या कडकडाटांसह...
मराठवाड्यात नवीन खासदारांबाबत उत्कंठानांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील...
कोल्हापूर, सांगलीत निकालाची उत्सुकता...सांगली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता....
सोलापूर, माढ्याच्या निकालाकडे देशाचे...सोलापूर : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७५...परभणी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे...
यसनी तोडून पुढे या : रमेश घोलपसोलापूर  : "परिस्थितीने बांधलेल्या यसनी तोडत...
पुणे विभागासाठी साडेपाच कोटींवर वृक्ष...पुणे  ः पर्यावरणाचे संतुलन अबाधित...
सोयाबीन उत्पादकांना पीकविम्याची रक्कम...मुंबई  : शासनाच्या विशेषतः कृषी विभागाच्या...
आमदार निधीतून दुष्काळग्रस्त भागासाठी...मुंबई  ः दुष्काळग्रस्त भागातील जनतेला आमदार...