agriculture news in marathi, Order of purchase of goods to agricultural laborers, utensils for appliances | Agrowon

कृषी साहित्य, अवजारांसाठी लाभार्थ्यांना वस्तू खरेदीचे आदेश
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

पुणे : जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनेअंतर्गत कृषी विभागाकडून यंदा ८ हजार ७२० लाभार्थ्यांची निवड करण्यात आली अाहे. पात्र लाभार्थ्यांची यादी पंचायत समिती कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहे. कृषी साहित्य व अवजारांसाठी ७५ टक्के अनुदानावर वस्तू खरेदीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती कृषी व पशुसंवर्धन सभापती सुजाता पवार यांनी दिली.

पुणे : जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनेअंतर्गत कृषी विभागाकडून यंदा ८ हजार ७२० लाभार्थ्यांची निवड करण्यात आली अाहे. पात्र लाभार्थ्यांची यादी पंचायत समिती कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहे. कृषी साहित्य व अवजारांसाठी ७५ टक्के अनुदानावर वस्तू खरेदीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती कृषी व पशुसंवर्धन सभापती सुजाता पवार यांनी दिली.

कृषी विभागाकडून यंदा ७५ टक्के अनुदानावर थेट लाभ हस्तांतरण धोरणानुसार विविध वस्तूंचा लाभ देण्यात येत अाहे. कृषी विभागाच्या अनुदानावर साहित्यवाटप योजनेसाठी ५ कोटी ५३ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. एचटीपी स्प्रेपंप इंजिनसह, प्लॅस्टिक क्रेट्‌स, प्लॅस्टिक ताडपत्री, सुधारित अवजारांमध्ये सायकल कोळपे, ट्रॅक्‍टरचलित दोन फाळी सरी रिजर, दोन एचपी इलेक्‍ट्रिक कडबाकुट्टी यंत्र आणि गांडूळ खतनिर्मिती सयंत्र या वस्तूंचा योजनेत समावेश आहे.

या याजेनेसाठी जिल्ह्यातून २८ हजारांहून अधिक व्यक्तींनी अर्ज केले होते. त्यातील कागदपत्रांची पडताळणी आणि उपलब्ध निधीनुसार ८ हजार ७२० लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार करण्यात आली.  दोन एचपी इलेक्‍ट्रिक कडबाकुट्टी यंत्राला सर्वाधिक मागणी असून, ६६२ शेतकऱ्यांना त्याचा लाभ देण्यात येणार आहे. एचटीपी स्प्रेपंप इंजिनसाठी १०० लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. प्लॅस्टिक क्रेट्‌ससाठी ७२६, प्लॅस्टिक ताडपत्री २ हजार ६५०, सुधारित अवजारांमध्ये सायकल कोळपेसाठी ३२२ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. ट्रॅक्‍टरचलित दोन फाळी सरी रिजरसाठी १२१, दोन एचपी इलेक्‍ट्रिक कडबाकुट्टी यंत्र ६६२ आणि गांडूळ खतनिर्मिती संयंत्रासाठी ७२ लाभार्थ्यांचा समावेश आहे. तर तीन, पाच, साडेसात एचपी पंप संच आणि पाइपसाठी एकूण ३ हजार ८१ असे एकूण ८ हजार ७२० लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

कृषी विभागाच्या अनुदानावर साहित्यवाटप योजनेसाठी लाभार्थ्यांची यादी पंचायत समितीकडे पाठविण्यात आली अाहे. गटविकास अधिकाऱ्यांमार्फत संबंधित लाभार्थ्यांना वस्तू खरेदीबाबत पत्र देण्यात येत आहे. अन्य विभागाच्या याद्याही अंतिम टप्प्यात असून, थेट लाभाच्या योजना यंदा वेळेत पूर्ण होतील.
- विश्‍वास देवकाते, अध्यक्ष, जिल्हा परिषद पुणे

इतर ताज्या घडामोडी
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...