agriculture news in marathi, order to sugarfactries for paid frp with interest, pune, maharashtra | Agrowon

व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय कारखान्यांना गाळप परवाने नाहीत
टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत एफआरपी व्याजासहित दिल्याशिवाय गाळप परवाने दिले जाणार नाहीत, असे साखर आयुक्तालयाने पुन्हा स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे नगर जिल्ह्यातील साईकृपा शुगर फॅक्टरीला परवाना न देण्याचे आदेश साखर संचालकांनी दिले आहेत.

३८ कोटी रुपये थकविणाऱ्या ‘साईकृपा’ला परवाना न देण्याची ठाम भूमिका ऊसदर नियंत्रण मंडळाचे सदस्य भानुदास शिंदे व रयत शेतकरी संघटनेचे नेते भाऊसाहेब मांडे यांनी घेतली आहे. ‘साईकृपा’ला गाळप परवाना देण्याच्या हालचाली होत असल्याचे पाहून आंदोलनाचा इशारा दिल्याने साखर संचालकांनीदेखील कायदेशीर बाजूने कौल दिला आहे.

पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत एफआरपी व्याजासहित दिल्याशिवाय गाळप परवाने दिले जाणार नाहीत, असे साखर आयुक्तालयाने पुन्हा स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे नगर जिल्ह्यातील साईकृपा शुगर फॅक्टरीला परवाना न देण्याचे आदेश साखर संचालकांनी दिले आहेत.

३८ कोटी रुपये थकविणाऱ्या ‘साईकृपा’ला परवाना न देण्याची ठाम भूमिका ऊसदर नियंत्रण मंडळाचे सदस्य भानुदास शिंदे व रयत शेतकरी संघटनेचे नेते भाऊसाहेब मांडे यांनी घेतली आहे. ‘साईकृपा’ला गाळप परवाना देण्याच्या हालचाली होत असल्याचे पाहून आंदोलनाचा इशारा दिल्याने साखर संचालकांनीदेखील कायदेशीर बाजूने कौल दिला आहे.

आरआरसीचे आदेश दिलेल्या कारखान्यांना गाळप परवाने कायद्यानुसार देता येणार नाही. आम्ही अद्याप तरी तीच भूमिका ठेवली आहे. मात्र, राज्य सरकारने विशेष बाब म्हणून सूचना दिल्यास कारखाने सुरू होऊ शकतात, अशी माहिती साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.

आरआरसीच्या आदेशानुसार थकीत एफआरपीची असलेल्या कारखान्यांमधील मालमत्ता विकण्याची कार्यवाही जिल्हाधिकाऱ्यांनी करणे अत्यावश्यक ठरते. साखर, मोलॅसिस, बगॅस उत्पादनाची विक्री करून शेतकऱ्यांना एफआरपी देण्याची तरतूद ऊस नियंत्रण आदेश १९६६ मध्ये आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आरआरसीचे आदेश दिल्यानंतर साखर आयुक्तालयाला नव्हे, तर महसूल विभागाने शेतकऱ्यांसाठी पाठपुरावा करणे अपेक्षित आहेत, असेही आयुक्तालयाचे म्हणणे आहे.

दरम्यान, ‘साईकृपा’ प्रकरणाची चौकशी विशेष लेखापरीक्षकांनी असे आदेश साखर संचालकांनी नगरच्या सहसंचालकांना दिले आहेत. ‘साईकृपा’सह आरएसएफ थकविणाऱ्या कोणत्याही कारखान्याला गाळप परवाना दिल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा ऊसदर नियंत्रण मंडळाचे सदस्य श्री. शिंदे यांनी दिला आहे.

इतर ताज्या घडामोडी
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...
लोकसभेसाठी माढ्यातून तुल्यबळ उमेदवारकऱ्हाड : लोकसभेसाठी माढा मतदारसंघात भारतीय जनता...
उपोषणासाठी बाजार समित्यांच्या...नाशिक : नियमनमुक्तीमुळे बाजार समित्यांचे...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर : परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
युवकांच्या सहकारी संस्था स्थापणार :...कऱ्हाड : राज्यातील सहकारी संस्थांचे सभासद हे ६०...
बाजार समित्यांमधील...नाशिक : तेलंगण, तमिळनाडू व कर्नाटकच्या धर्तीवर...
पुलवामातील हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्याचे...बुलडाणा : पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी ...
हल्ल्या मागे जे आहेत त्यांना शिक्षा...नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा...
आम्ही विसरणार नाही.. माफही करणार नाही...नवी दिल्ली- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात...
काश्‍मीरमधील शेतकऱ्याला थकबाकीची रक्कम...पुणे : काश्‍मीरमधील शेतकऱ्याला सफरचंदाचे पैसे...
बिबट्याच्या दहशतीखाली चोरट्यांकडून...आंबेठाण, जि. पुणे : शिंदे गाव (ता. खेड) येथे दोन...
‘डिंभे’चे पाणी जोड बोगद्याद्वारे ‘...मुंबई : डिंभे डाव्या तीर कालव्यातील गळती...
विदर्भात आज गारपीट, हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पोषक हवामानामुळे आज (ता. १४) विदर्भात...
कापसासाठी ‘एमसीएक्‍स’कडून गोदामांची...मुंबई : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना समृद्ध...
कर्ज देण्याच्या नावाखाली ७३ शेतकऱ्यांची...गोंदिया : कर्ज देण्याच्या नावाखाली ७३...