agriculture news in Marathi, orders to action on project manager, Maharashtra | Agrowon

प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेश
पीटीआय
मंगळवार, 19 मार्च 2019

पुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत आलेला लक्षावधी रुपयांचा निधी उस्मानाबाद जिल्ह्यात हडप करण्यात आल्याचे उघड झाले आहे. याबाबत अतिरिक्त प्रकल्प व्यवस्थापक व पाणलोट पथक प्रमुखावर कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत. 
 

पुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत आलेला लक्षावधी रुपयांचा निधी उस्मानाबाद जिल्ह्यात हडप करण्यात आल्याचे उघड झाले आहे. याबाबत अतिरिक्त प्रकल्प व्यवस्थापक व पाणलोट पथक प्रमुखावर कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत. 
 

राज्याच्या वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी उस्मानाबादच्या पाणलोट प्रकल्प व्यवस्थापकाला चौकशी आदेश दिले आहेत. राज्यातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हेच पाणलोटात प्रकल्प व्यवस्थापक म्हणून कामकाज पहात असून अनेक जिल्ह्यांमध्ये पाणलोट समितीची बोगस कागदपत्रे तयार करून रकमा लाटल्याचा संशय आहे.

तुळजापूरमधील अप्पाबापू रवळे यांनी तक्रार केल्यानंतरही या प्रकरणाकडे सुरवातीला दुर्लक्ष करण्यात आले. मात्र, उपोषणाचा इशारा दिल्यानंतर कारवाईसाठी हालचाली करण्यात आल्या. यापूर्वी गोविंद देशपांडे यांनी राज्य शासनाने तक्रार करून कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी १७ गावांमधील पाणलोट समित्यांच्या खात्यात जमा झालेल्या ५ कोटी ५६ लाख रुपयांचा हिशेब ठेवलेला नाही, अशी तक्रार केली होती.

डॉ. वसेकर यांनी लातूरच्या विभागीय कृषी सहसंचालकांना या प्रकरणात कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. तथापि, दोन महिन्यानंतर देखील हालचाली झालेल्या नाहीत. दरम्यान, धोत्री येथे झालेल्या पाणलोट घोटाळ्याबाबत देखील सहसंचालकांनी अहवाल दिलेला नाही. “धोत्री घोटाळ्यातील जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम १९७९ अन्वये दोषारोपपत्रे योग्य त्या दस्तावेज, सेवा तपशीलासह कृषी आयुक्तांकडे पाठविण्याच्या सूचना डॉ. वसेकर यांनी दिलेल्या आहेत.

अपहार झाल्याचे उघड
पाणलोट समितीला हाताशी धरून सरकारी रकमांचा अपहार करण्याचा प्रकार उघड झालेला आहे. याबाबत पोलिसांकडे गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. निवडणुकांच्या कामामुळे काही प्रकरणांमध्ये उशीर होतो. तथापि, प्रशासनाने कुणालाही पाठीशी घातलेले नाही, असा दावा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

खोटी कामे दाखविली
पाणलोट समितीला न विचाराताच खोटी कामे दाखवून निधी काढून घेण्यात आले, बोगस सचिव व ठेकेदार उभे करून रकमा उचलण्याचे प्रकारदेखील झाले आहेत. 
बोगस ग्रामसभा तयार करून पाणलोट सचिवांच्या बेकायदा निवडी करायच्या व त्यानंतर ठेकेदारांना हाताशी धरून निधी खर्च झाल्याचे दाखवायचे, असे सूत्र कृषी विभागाकडून वापरले जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

 

इतर अॅग्रो विशेष
असाही एक छुपा करनव्वदच्या दशकापासून राबवल्या जात असलेल्या आर्थिक...
शेततळे की गळके भांडेमा  गेल त्याला शेततळे योजनेची सांगड रोजगार हमी...
इक्रीसॅट पद्धतीतून वाढविले भुईमूग...सोहाळे (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील प्रयोगशील...
गौरीनंदन ने ठेवले दर्जेदार, भेसळमुक्त...शनी शिंगणापूर (ता. नेवासा, जि. नगर) येथील...
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी पाच दिवसांत...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
गतवर्षी नष्ट झाल्या ४० टक्के मधमाशी...गेल्या वर्षी एप्रिल २०१८ ते एप्रिल २०१९ या...
तुरळक ठिकाणीच जोरदार पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती...
एचटीबीटी बियाणे विक्रीप्रकरणी सहा अटकेतवणी, जि. यवतमाळ  : चंद्रपूर जिल्ह्यातील...
राज्यात मध्यम ते हलक्या सरी पुणे ः मॉन्सून दाखल झाल्यानंतर राज्याच्या...
मराठवाड्यात पिककर्जवाटप केवळ १३...औरंगाबाद : कर्जपुरवठ्याबाबत पुन्हा एकदा ...
‘एचटीबीटी’ लागवडप्रकरणी शेतकरी...अकोला ः जिल्ह्यात एचटीबीटी कापूस बियाणे लागवड...
नाशिक येथे आज पाणी व्यवस्थापन परिषदनाशिक: दर्जेदार पीक उत्पादनासाठी सुपीक जमिनीच्या...
मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
उत्पन्नवाढीचे गणित चुकते कुठे?साधारणपणे एप्रिल महिन्याच्या आरंभास विविध...
पीकविम्याचे कवित्वप तप्रधान पीकविमा योजनेची देशपातळीवर अंमलबजावणी...
‘वैद्यकीय' प्रवेशास मराठा आरक्षण लागू...नवी दिल्ली : वैद्यकीय आणि दंतवैद्यकीयच्या...
राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी पुणे : राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर सर्वदूर...
तीव्र दुष्काळाच्या प्रदेशात ११० एकरांवर...आटपाडी (जि. सांगली) येथील राजेश सातारकर यांची...
आठवडाभराच्या खंडानंतर पुन्हा चांगला...पुणे: राज्याच्या बहुतांशी भागात मॉन्सूनचे आगमन...
मालेगाव बाजार समितीत ‘इतर’च्या नावाखाली...नाशिक: मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘इतर...