agriculture news in marathi, Organic farm product fair starts in mumbai | Agrowon

सेंद्रिय शेती उत्पादनांना मोठी बाजार संधी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

मुंबई : जगात सेंद्रिय शेती उत्पादनांच्या बाजारवाढीला मोठा वाव आहे. सेंद्रिय शेती करताना छोट्या शेतकऱ्यांना एकत्र करून उत्पादित शेतीमालाचे प्रमाणीकरण करता आले, तर मोठे सेंद्रिय मार्केट उभे करता येईल, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय मार्केटतज्ज्ञ हिरोईकी ओनिशी (जपान) यांनी बुधवारी (ता. ७) केले. 

मुंबई : जगात सेंद्रिय शेती उत्पादनांच्या बाजारवाढीला मोठा वाव आहे. सेंद्रिय शेती करताना छोट्या शेतकऱ्यांना एकत्र करून उत्पादित शेतीमालाचे प्रमाणीकरण करता आले, तर मोठे सेंद्रिय मार्केट उभे करता येईल, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय मार्केटतज्ज्ञ हिरोईकी ओनिशी (जपान) यांनी बुधवारी (ता. ७) केले. 

येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये आयोजित नैसर्गिक व सेंद्रिय शेती उत्पादने प्रदर्शन आणि विक्री परिषदेच्या उद्‌घाटनावेळी ते बोलत होते. या वेळी आंतरराष्ट्रीय मार्केटतज्ज्ञ (कॅनडा) पॅट हॉवेस, महाराष्ट स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाचे नियंत्रण व मूल्यमापन विशेषज्ञ डॉ. संजय पांढरे, देवनंदनी शेतकरी उत्पादक संघाचे संचालक माउली तुपे आदी उपस्थित होते. ही परिषद तीन दिवस चालणार आहे. 

श्री. ओनिशी म्हणाले, सध्या जगभरातून सेंद्रिय शेती उत्पादनांना मोठी मागणी येत आहे. सेंद्रिय बाजाराच्या वाढीसाठी मोठी संधी असून, त्याचा लाभ शेतकऱ्यांना शक्य आहे. सध्या शेतीमध्ये रसायनांचा वापर वाढला आहे. अशा रासायनिक शेतीच्या काळात सेंद्रिय शेती करताना उत्पादनांचे प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. 

छोट्या शेतकऱ्यांना वैयक्तिकपणे प्रमाणीकरण करताना अडचणी येतात. त्यासाठी अशा शेतकऱ्यांना एकत्र करून सेंद्रिय शेती उत्पादनांचे मोठे मार्केट उभे करता येईल. यात शेतकरी आणि ग्राहकांचेही हित साधणे शक्य आहे. 

या वेळी डॉ. पांढरे म्हणाले, की आतापर्यंत हे प्रदर्शन फक्त व्यापारी कंपन्यांपुरतेच मर्यादित होते. सोळा वर्षांत प्रथमच सेंद्रिय उत्पादक गट, कंपन्या यात सहभागी झाल्या आहेत. राज्यात आजवर शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या आहेत. तर एक लाखाहून अधिक शेतकरी गट कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांत पारंपरिक कृषी विकास योजनेअंतर्गत सेंद्रिय शेती उत्पादन घेणाऱ्या एक हजार शेतकरी गटांची निर्मिती झाली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर एनपीओपी, एनओपी, ईयू प्रमाणीकरण करणारे शेतकरी आहेत. 

येत्या काळात सेंद्रिय शेती शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न देणारी शेती ठरणार आहे. त्यामुळे शेती उत्पादनांचे प्रमाणीकरण आणि शेतकऱ्यांना बाजार सुविधा उपलब्ध करून दिल्यास सेंद्रिय शेती किफायतशीर करता येईल. राज्यात कृषी यांत्रिकीकरणाच्या अनेक योजना सुरू आहेत. याद्वारे शेतकऱ्यांना मार्केटशी जोडण्याचा प्रयत्न या परिषदेद्वारे करण्यात येत असल्याचे डॉ. पांढरे यांनी सांगितले. परिषदेत राज्यातील सुमारे दीडशे शेतकरी उत्पादक गट, कंपन्यांचे प्रतिनिधींसोबत परदेशी व्यापाऱ्यांचे खरेदी-विक्रीचे करार होतील असे सांगण्यात आले.

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...