जैविक शेती मिशन राबविण्यास प्रारंभ

जैविक शेती मिशन राबविण्यास प्रारंभ
जैविक शेती मिशन राबविण्यास प्रारंभ

अकोला ः शासनाने गेल्या वर्षी जाहीर केलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे काम अाता प्रत्यक्षात सुरू झाले अाहे. अमरावती विभागातील अात्महत्याग्रस्त पाच जिल्हे व नागपूर विभागातील एक अशा सहा जिल्ह्यांसाठी हे मिशन काम करणार अाहे. या जिल्ह्यांना सेंद्रिय शेती गटांचा लक्ष्यांक देण्यात अाला असून अात्मा यंत्रणेमार्फत गटनिर्मिती करण्याची सूचना स्थानिक यंत्रणांना करण्यात अाली. सेंद्रिय शेती- विषमुक्त शेती या राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत हे मिशन राबविण्याची अाॅक्टोबरमध्ये घोषणा झाली होती. चार वर्षांसाठी असलेल्या या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी १०० कोटी रुपये दिले जाणार अाहेत. अकोला, बुलडाणा, वाशीम, अमरावती, यवतमाळ अाणि वर्धा या सहा जिल्ह्यांत ५०० सेंद्रिय उत्पादक गट तयार करण्याचा लक्ष्यांक ठेवण्यात अाला अाहे. सेंद्रिय शेतीकरून जैविक शेतीपद्धतीद्वारे रसायनांचा वापर थांबवून योग्य उत्पादन घेणे, जमीन अारोग्य सुधारणे, उत्पादक गट, वैयक्तिक शेतकरी यांची क्षमता विकसित करणे, उत्पादित सेंद्रिय उत्पादनांची प्रक्रिया व मूल्यवृद्धी करणे अादी उद्देश या मिशनद्वारे साध्य करण्याचे निश्चित केलेले अाहे.  या योजनेत ५० एकर क्षेत्राचा व किमान २० शेतकऱ्यांचा एक गट/समूह तयार करण्यात येणार अाहे. क्षमता संवर्धन, गटनिर्मिती, सहभाग हमी पद्धत, सेंद्रिय निविष्ठा निर्मिती, सेंद्रिय प्रमाणीकरण, प्रक्रिया युनिटस्थापना या घटकांचा समावेश अाहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय, तसेच जिल्हास्तरीय समिती काम करणार अाहे. या योजनेअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यात १०२, अकोला ५४, वाशीम ४६, अमरावती ११०, यवतमाळ १२६, वर्धा ६२ असे ५०० सेंद्रिय गट तयार केले जाणार अाहेत. गटनिर्मितीसाठी अात्मा यंत्रणांना तातडीने काम करण्यास सांगण्यात अाले. चार वर्षांत १०० कोटी रुपये दिले जाणार अाहेत. पहिल्या वर्षी २० कोटी १० लाख मिळणार अाहेत.   समितीचा अध्यक्ष कोण? हे मिशन राबविण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन या नावाने संस्थेची स्थापना करण्यात अाली. समितीत अध्यक्ष, उपाध्यक्षांसह १३ जणांचा समावेश राहणार अाहे. या मिशनचा अध्यक्ष सेंद्रिय शेतीविषयक तज्ज्ञ असेल एवढेच अातापर्यंत स्पष्ट झालेले अाहे. मात्र ही तज्ज्ञ व्यक्ती कोण, हे जाहीर झालेले नाही. या समितीचे उपाध्यक्ष कृषी अायुक्त असून, सदस्य म्हणून ‘पंदेकृवि’चे कुलगुरू, ‘वनामकृवि’चे कुलगुरू, कृषी संचालक (अात्मा), कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण), विभागीय कृषी सहसंचालक यांच्यासह इतरांचा समावेश अाहे. सदस्य सचिव म्हणून प्रकल्प व्यवस्थापन युनिटमधील कृषी सहसंचालक/अधिक्षक कृषी अधिकारी राहणार अाहे. जिल्हास्तरावरही अशीच समिती काम करेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com