agriculture news in marathi, organic farming status,pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यात दोन हजार शेतकऱ्यांची सेंद्रिय शेतीत वाटचाल
टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 मार्च 2018
सेंद्रिय शेतीसाठी आम्ही शेतकऱ्यांचे दोन गट स्थापन केले आहे. त्याअंतर्गत ऊस, कांदा, गहू, तूर, ज्वारी, हरभरा आणि भाजीपाला पीके घेऊ लागलो आहे. त्यासाठी ब्रॅंन्ड तयार केला असून चांगले दर मिळू लागले आहेत. तसेच सेंद्रिय गुळाचे उत्पादनही आम्ही घेत आहोत. 
- स्वाती शिंगाडे, अध्यक्ष, प्युअर ऑरगॅनिक सेंद्रिय गट, सोनकसवाडी, ता. बारामती, जि. पुणे. 
पुणे : जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून सेंद्रिय शेतीला चालना देण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यात आत्माअंतर्गत ४० गट स्थापन करण्यात आले असून गटांच्या माध्यमातून दोन हजार शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीमध्ये वाटचाल सुरू केली आहे. त्याअंतर्गत सुमारे दोन हजार एकर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आले आहे.त्यामुळे येत्या काळात नागरिकांना सेंद्रिय भाजीपाला मिळण्यास मदत होणार आहे.   
 
गेल्या दोन वर्षापासून सरकारने सेंद्रिय शेतीवर भर देण्यास सुरूवात केली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेतीकडे कल वाढावा, यासाठी शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांचे गट स्थापन करण्यापासून ते त्यांनी उत्पादित केलेल्या शेतीमालाच्या विक्रीपर्यंत व्यवस्था करण्याचे काम आत्माअंतर्गत केले जात आहे. गेल्या वर्षी शेतकऱ्यांचे गट स्थापन करणे, गट मार्गदर्शकांची निवड, प्रशिक्षण, माती नमुने तपासणी करणे, अभ्यासदौरे, शेतकरी नोंदणी करण्यात आली.
 
दुसऱ्या वर्षी निविष्ठा पुरविणे, पीजीएस ग्रीन प्रमाणपत्र देणे, गांडूळ खत युनिट उभारणे आदि बाबी देण्यात आल्या आहेत. त्यासाठी पहिल्यावर्षी एक कोटी ८१ लाख, तर दुसऱ्यावर्षी दोन कोटी १९ लाख रुपयांचा निधी यासाठी मिळाला.
 
सध्या जिल्ह्यातील सुमारे दोन हजार शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळाले आहेत. त्याअंतर्गत सुमारे दोन हजार एकर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आले आहे. त्यामध्ये भाजीपाल्यात कांदा, फ्लॉवर, कोबी, वांगे, टोमॅटो, भेंडी, कडधान्यात तूर, मूग, भात, गहू, ज्वारी, बाजरी, ऊस, फळामध्ये डाळिंब, अंजीर, सीताफळ आदी पिके शेतकरी घेऊ लागले असून काही शेतकऱ्यांचे पीक उत्पादन सुरू झाले आहे.
 
या उत्पादकांच्या सेंद्रिय शेतीमालाचे प्रमाणीकरण तसेच ऑनलाईन नोंदणी झाली असल्यामुळे हा शेतीमाल ग्राहकांना उपलब्ध होऊ लागला आहे. तसेच त्यांना इतर शेतीमालाच्या तुलनेत चांगले दर मिळत आहे. 

इतर ताज्या घडामोडी
पाणीटंचाई निवारणासाठी ३२ कोटीनागपूर : ग्रामीण भागातील पाणीटंचाई...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा अग्रीम...परभणी ः परभणी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १२...नांदेड ः चालू कापूस खरेदी हंगामामध्ये नांदेड,...
बेदाणानिर्मिती शेडवर बसू लागली यंत्रेसांगली ः जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, मिरज...
उन्हाळी भुईमुगावरील कीड नियंत्रणउन्हाळी भुईमुगावर खालील विविध अळ्यांचा...
जातपडताळणीचा ‘ऑफलाइन’ छळ पुणे  : शासनानेच वाटलेल्या जातप्रमाणपत्रांची...
लागवड उन्हाळी तिळाची...उन्हाळी हंगामात लागवडीसाठी एकेटी १०१, पीकेव्ही एन...
सांगलीत शनिवारपासून सेंद्रिय परिषद,...सांगली ः रेसीड्यू फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया...
उन्हाळी भुईमुगावरील पानेे खाणारी अळी या अळीला तंबाूखूवरील पाने खाणारी अळी म्हणूनही...
लोहाच्या कमतरतेवरील वनस्पतींची...हेन्रिच हेईन विद्यापीठ डस्सेलडॉर्प आणि...
नेरच्या नदी पात्रातील भराव काढादेऊर, ता.धुळे : पांझरा नदी पात्रातील नव्या...
सौर कृषिपंप योजनेसाठी पुणे जिल्ह्यातून...पुणे : शेतकऱ्यांना दिवसा व सौरऊर्जेद्वारे शाश्वत...
अपारंपरिक ऊर्जा काळाची गरज : बावनकुळेभंडारा : पारंपरिक ऊर्जेची मर्यादा लक्षात घेऊन...
नांदेड जिल्ह्यामध्ये १८ टॅंकरद्वारे...नांदेड ः जिल्ह्यातील तीव्र पाणीटंचाई उद्भवलेली ११...
परभणी, नांदेड जिल्ह्यात २ लाख खात्यांवर...परभणी ः परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील दुष्काळामुळे...
टेंभूच्या नेवरी वितरिकेची कामे २२...सांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेच्या नेवरी वितरिका...
पाणीटंचाईमुळे कांदा लागवडीच्या...पुणे ः वाढत असलेल्या पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यामध्ये तुरीचे उत्पादन...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती...
अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत १२ कोटी...कोल्हापूर : शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास...
कचारगडला `अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा...गोंदिया ः कचारगड हे देशभरातील भाविकांचे...