agriculture news in Marathi, Organic food festival in Sangali, Maharashtra | Agrowon

सांगलीत शनिवारपासून सेंद्रिय परिषद, धान्य महोत्सव
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

सांगली ः रेसीड्यू फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया फेडरेशन ( रोमिफ ) या संस्थेतर्फे राज्यस्तरीय सेंद्रिय धान्य महोत्सव व सेंद्रिय शेती परिषद सांगलीत होणार आहे. जैन कच्छी भवनमध्ये शनिवारी व रविवारी (ता.२३ व २४ ) होईल. या वेळी ‘ॲग्रोवन'चे संपादक आदिनाथ चव्हाण यांच्यासह पाच जणांचा कृषिक्षेत्रातील पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेच्या उपाध्यक्षा मनीषा पाटील यांनी दिली.

देशी वाणांच्या बियाण्यांची बॅंक बनवणाऱ्या राहीबाई पोपेरे, कृषी संशोधन परिषदेचे संचालक डॉ. हरिहर कौसाडीकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील या वेळी उपस्थित राहतील. 

सांगली ः रेसीड्यू फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया फेडरेशन ( रोमिफ ) या संस्थेतर्फे राज्यस्तरीय सेंद्रिय धान्य महोत्सव व सेंद्रिय शेती परिषद सांगलीत होणार आहे. जैन कच्छी भवनमध्ये शनिवारी व रविवारी (ता.२३ व २४ ) होईल. या वेळी ‘ॲग्रोवन'चे संपादक आदिनाथ चव्हाण यांच्यासह पाच जणांचा कृषिक्षेत्रातील पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेच्या उपाध्यक्षा मनीषा पाटील यांनी दिली.

देशी वाणांच्या बियाण्यांची बॅंक बनवणाऱ्या राहीबाई पोपेरे, कृषी संशोधन परिषदेचे संचालक डॉ. हरिहर कौसाडीकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील या वेळी उपस्थित राहतील. 

मनीषा पाटील म्हणाल्या, की रसायनमुक्त शेती करणारे शेतकरी आणि शेतीतज्ज्ञांनी ‘रोमिफ'ची स्थापना केली आहे. शेतीत रसायनांचा बेसुमार वापर वाढल्याने मानवी जीवन धोक्‍यात आले आहे. त्यावर उपाय म्हणून सेंद्रिय शेतीचा प्रसार आवश्‍यक आहे. सांगलीत प्रथमच या अनुषंगाने सेंद्रिय शेती परिषद होत आहे. शनिवारी उद्‌घाटन व डॉ. कौसाडीकर, राहीबाई पोपेरे, प्रदीप कोठावदे, संजय देशमुख, प्रशांत नाईकवडी, संजय अदाटे या कृषितज्ज्ञांची व्याख्याने होतील. रविवारी शेतकरी व खरेदीदारांचे संमेलन होईल. तत्पूर्वी कृषीप्रक्रिया उद्योगांविषयी संशोधक व शासकीय अधिकारी माहिती देतील. सेंद्रिय धान्य महोत्सवात ग्राहकांना रसायनमुक्त उत्पादने मिळतील. 

महोत्सवात याचा समावेश 
मेळघाटातील आदिवासींचा हातसडीचा तांदूळ, नैसर्गिक गहू व खपली, सोलापूरची मालदांडी ज्वारी, पॉलिश न केलेल्या डाळी व कडधान्ये, डोंगराळ भागातील जोंधळा, दोडका व जिरगा तांदूळ, सेंद्रिय प्रमाणित धान्ये, लाकडी घाण्यातून उत्पादित तेले, रसायनमुक्त बेदाणा, सेंद्रिय शेंगदाणे व नैसर्गिक मध, सेंद्रिय भाज्या इत्यादी.

पुरस्काराचे मानकरी

  •  रचेल कार्सन सेंद्रिय/विषमुक्त शेती साहित्य, पत्रकारिता पुरस्कार ः दैनिक ॲग्रोवन, पुणे
  •  स्टेनर सेंद्रिय/विषमुक्त शेती अभियान पुरस्कारः संजय देशमुख, व्यवस्थापकीय संचालक, नोका सेंद्रिय शेती प्रमाणीकरण संस्था पुणे
  •  जस्टीन वोन लीबिग तंत्रज्ञान पुरस्कारः प्रदीप कोठावदे व्यवस्थापकीय संचालक ॲग्रीसर्च इंडिया प्रा. लि. नाशिक
  •  सर अल्बर्ट हावर्ड सेंद्रिय/विषमुक्त शेतीसामाजिक पुरस्कारः जतीन साठे विभागीय अधिकारी नाशिक, बायफ संस्था पुणे
  •  ऋषीकृषी भास्कर सावे गुरुजी सेंद्रिय/विषमुक्त युवा शेतकरी पुरस्कारः सौ. व श्री. वर्षा सचिन येवले
  •  रोडाले सेंद्रिय/विषमुक्त शेतीसंवर्धन पुरस्कारः हृषिकेश जयसिंग ढाणे

इतर ताज्या घडामोडी
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...
अठराशेवर गावांमध्ये घेतल्या जाणार २६५२...औरंगाबाद   : येत्या खरीप हंगामात...
खानदेशात बाजरी मळणीचा हंगाम आटोपलाजळगाव  ः खानदेशात बाजरीचा मळणी हंगाम आटोपला...
धुळे, नंदुरबारमध्ये राष्ट्रीयीकृत...धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा बॅंकेने १२ हजारांवर...
कोल्हापुरात ‘पाणीबाणी’ची शक्यताकोल्हापूर : जिल्ह्यात वेळेवर पाऊस सुरू न झाल्यास...
आरग येथे नागिलीच्या पानांचे सौदे सुरूसांगली  ः कधीकाळी खाण्यासाठी वापरण्यात...
अकोला जिल्ह्यात २० टक्क्यांपर्यंत...अकोला :  आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पीक...
नगर जिल्ह्यातील १२४ गावांचे पाणी दूषितनगर  : जिल्ह्यातील २६४५ गावांचे पाणीनमुने...
बुलडाणा जिल्हा कृषी विक्रेता संघटनेच्या...बुलडाणा ः जिल्हा कृषी विक्रेता संघटनेची १४...
निफाड तालुक्यात द्राक्षबागांच्या...नाशिक  : निफाड तालुक्यातील द्राक्षबागांमध्ये...
सोलापूर जिल्हा परिषद करणार ‘रोहयो’ची...सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या वतीने यंदाच्या...
भूगर्भात पाणीसाठा टिकविण्यासाठी भूमिगत...भूमिगत बंधारा बांधण्याचे काम जमिनीखाली असल्याने...
सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांत टाकली...नागपूर ः दुष्काळी मदत नाही, कर्जमाफीच्या...
वडगाव येथील पाटबंधारे कार्यालयासमोर...वडगाव निंबाळकर, जि. पुणे  ः नीरा डावा...
पुणे बाजार समितीवर पुन्हा प्रशासकीय...पुणे : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुणे बाजार...
अळिंबी उत्पादनातून केली संकटांवर मातलोणी (जि. जळगाव) येथील अनिल माळी यांच्याकडे कृषी...