सेंद्रीय उत्पादने, सेंद्रीय शेतीला बचतगटांच्या माध्यमातून प्रोत्साहन

सेंद्रीय उत्पादने, सेंद्रीय शेतीला बचतगटांच्या माध्यमातून प्रोत्साहन
सेंद्रीय उत्पादने, सेंद्रीय शेतीला बचतगटांच्या माध्यमातून प्रोत्साहन

मुंबई : सेंद्रीय अन्नाची उपलब्धता आणि सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन व्यापक प्रयत्न करीत आहे. केंद्रीय महिला – बालविकास विभाग आणि महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळामार्फत आयोजित सेंद्रीय उत्पादनांच्या प्रदर्शनातून या चळवळीला निश्चितच नवी दिशा आणि गती मिळेल, असे राज्याच्या महिला – बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे सांगितले. 

आजपासून २० मार्चपर्यंत वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.१६) उद्घाटन झाले, त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी राज्याच्या महिला – बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, आमदार तृप्ती सावंत, सेंद्रीय उत्पादन मोहीमेच्या ब्रँण्ड अॅम्बॅसिडर चित्रपट अभिनेत्री जुही चावला, केंद्रीय महिला – बालविकास विभागाच्या सहसचिव नंदिता मिश्रा, माविमच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक इंद्रा मालो, ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री तनुजा, अभिनेते जॅकी श्रॉफ, अभिनेत्री मधू, तनिशा मुखर्जी आदी मान्यवर उपस्थित होते.

मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, रसायनयुक्त अन्नाचे अनेक दुष्परिणाम आपण भोगत असून कॅन्सरसारख्या आजाराने मोठा विळका घातला आहे. हे सर्व दुष्परिणाम रोखण्यासाठी आपल्याला सेंद्रीय अन्न, सेंद्रीय उत्पादने, सेंद्रीय शेती यांच्याकडे वळावेच लागेल. शासनस्तरावर याला प्रोत्साहन देण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात येत आहेत. आपण स्वत: यापुढील काळात मोहीम म्हणून सेंद्रीय उत्पादनांच्या प्रसारासाठी व्यपक प्रयत्न करु, असे त्या म्हणाल्या. 

रासायनिक खतांवरील उत्पादने रोखणे गरजेचे : जुही चावला या मोहीमेच्या ब्रँण्ड अॅम्बॅसिडर चित्रपट अभिनेत्री जुही चावला म्हणाल्या की, रासायनिक खते, त्यापासून उत्पादीत होणारे अन्न रोखणे ही काळाची गरज आहे. अन्यथा येणाऱ्या पिढ्यांचा काळ हा अंधकारमय असेल. सर्वच स्तरावर सेंद्रीय उत्पादनांचा वापर वाढवणे गरजेचे असून शेतीला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या. 

महिला उद्योजक आणि बचतगटांमधील महिलांमार्फत उत्पादीत सेंद्रीय उत्पादनांचे हे प्रदर्शन वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे दि. १६ ते २० मार्च दरम्यान असेल. यात देशभरातील साधारण ४०० महिला सहभागी झाल्या आहेत. सेंद्रीय उत्पदनांमध्ये डाळी, कडधान्ये, मसाले, सौंदर्यप्रसाधने, तेल, मध, लोणचे आणि प्रतिरक्षित, चहा, सेंद्रीय बियाणे, कंपोस्टर्स याशिवाय इतर बायो उत्पादनांचा या प्रदर्शनात समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com