agriculture news in marathi, Organic products from Maharashtra will come under single brand : Sharad Pawar, Pune | Agrowon

सेंद्रिय उत्पादनांचा एकच ब्रँड बनविण्याचा निर्णय
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

पुणे : राज्यातील सेंद्रिय शेती उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनाचा एकच ब्रँड बनविण्याचा निर्णय सेंद्रिय शेती उत्पादक शेतकरी कंपन्या व गट यांच्या बैठकीत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. सेंद्रिय उत्पादनांच्या मार्केटिंगमध्ये सुसूत्रता आणून पुणे शहरात प्रायोगिक तत्त्वावर मार्केटिंगचे मॉडेल तयार करण्यात येणार आहे.

पुणे : राज्यातील सेंद्रिय शेती उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनाचा एकच ब्रँड बनविण्याचा निर्णय सेंद्रिय शेती उत्पादक शेतकरी कंपन्या व गट यांच्या बैठकीत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. सेंद्रिय उत्पादनांच्या मार्केटिंगमध्ये सुसूत्रता आणून पुणे शहरात प्रायोगिक तत्त्वावर मार्केटिंगचे मॉडेल तयार करण्यात येणार आहे.

राज्यातील सेंद्रिय उत्पादक शेतकरी कंपन्या व प्रमुख गटांचे अध्यक्ष यांची बैठक श्री. पवार यांच्या उपस्थितीत मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे मंगळवारी (ता. २४) बैठक घेण्यात आली. या वेळी अंकुश पडवळे, प्रल्हाद वरे, आत्म्याचे प्रकल्प संचालक सुनील बोरकर यांची उपस्थिती होती.

राज्यात अनेक वर्षांपासून शेतकरी सेंद्रिय शेती करीत आहेत. पण मार्केटिंगमध्ये कमी पडत आहेत. शासनानेही सेंद्रिय शेतीचे अनेक गट राज्यात बनविले; परंतु मार्केटिंगची लिंक न झाल्याने सेंद्रिय गटांचे उत्पादनाचे काम थंडावले. याचा विचार करून सेंद्रिय शेती उत्पादनांना चांगले मार्केट मिळवून देण्यासाठी पुणे शहरात प्रायोगिक तत्त्वावर मगरपट्टा, नांदेड सिटी व ॲमेनोरा सिटीमध्ये सेंद्रिय उत्पादने विक्रीसाठी परवानगी मिळावी व कार्यालयास जागा मिळावी, अशी उपस्थित प्रतिनिधींनी श्री. पवार यांच्याकडे मागणी केली. श्री. पवार यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय उत्पादनांची विक्री करण्यासाठी जागा नाममात्र किमतीत मगरपट्टा, नांदेड सिटी व ॲमेनोरा सीटीत उपलब्ध करून देण्याचे संबंधितांना सांगितले. तसेच सेंद्रिय उत्पादन विक्री कार्यालयासाठी निसर्ग मंगल कार्यालयातील जागा स्वतः श्री. पवार यांनी पाहणी करून उपलब्ध करून दिली.

मार्केटमध्ये सेंद्रिय भाजीपाला, कडधान्ये, तृणधान्ये, सर्व प्रकारची फळे, देशी दूध, देशी अंडी, ज्वारी व मक्यापासून गटांनी बनविलेले प्रक्रिया पदार्थ आदी गोष्टींचे गुणवत्तापूर्ण उत्पादने निर्मितीसाठी व सातत्याने शेतकऱ्यांकडून पुरवठा होण्यासाठी शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्याकरिता व त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्यातील सेंद्रिय उत्पादन करणाऱ्या शेतकरी कंपन्या व गट यांचे राज्य पातळीवरील संघटन करणे आणि राज्यातील सर्व सेंद्रिय उत्पादनांच्या मालाचा एकच ब्रँड बनविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

बैठकीस व्हीएसआयचे शिवाजीराव देशमुख, मंगळवेढ्याचे बाळासाहेब यादव, रामचंद्र आलदर, अण्णा माळी, अभिजित सरगर, बापूसाहेब देवकते, दादासाहेब इंगोले, सतीश कानवडे, सौ. स्वाती शिंगाडे, प्रशांत शेंडे, शीतल काटे, वैजिनाथ कराड, बाळासाहेब खेमनार, अमरजित जगताप, बाळासाहेब दरंदले, गिरीश देशपांडे, संतोष राऊत, प्रशांत नायकवडी, रोहिदास साळुंखे आदींसह राज्यातील सेंद्रिय उत्पादक शेतकरी कंपनीचे ५० प्रतिनिधी उपस्थित होते.

इतर अॅग्रो विशेष
कोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज... पुणे : पश्‍चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि...
जपानमधील शहरी शेतीजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित...
कुठे दिलासा, कुठे चिंताराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला...
नाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...
सांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...
अॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे  : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...
अवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे  ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...
दुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई   ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...
गोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...
पिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...
कापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...
दुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...
वादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...
पुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
राज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे  : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...
आयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...
नवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...
पर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...
ऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...