agriculture news in Marathi, Organic wheat production in Buldana District, Buldana | Agrowon

रब्बी हंगामात बुलडाण्यात पिकणार सेंद्रिय गहू
गोपाल हागे
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

सेंद्रिय उत्पादक गटांच्या माध्यमातून हे वाण या वर्षी ३०० एकरांवर पेरण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यातील ३० सेंद्रिय उत्पादक गटांची कंपनी स्थापण्यात आलेली असून, खरिपात या गटांनी मूग, उडदाचे पीकसुद्धा घेतले आहे.
- नरेंद्र नाईक, प्रकल्प संचालक, आत्मा, बुलडाणा
 

बुलडाणा ः जिल्ह्यात आगामी रब्बी हंगामात सेंद्रिय पद्धतीने सुमारे ३०० एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावर गव्हाचे उत्पादन घेतले जाणार आहे. यादृष्टीने ‘आत्मा’ व शेतकरी गटांकडून नियोजन केले जात आहे. मागील हंगामात जिल्ह्यात सेंद्रिय उत्पादक गटांनी मिळून शंभर एकरांवर पारंपरिक वाण असलेला ‘बन्सीपाला’ हा गहू पेरला होता.

शासनाने सेंद्रिय शेतीला पूरक धोरण मागील हंगामापासून राबविणे सुरू केले, तरी काही शेतकरी स्वतंत्रपणे यामध्ये काम करत आहेत. बुलडाणा जिल्ह्यात वडी येथील वसंतराव पाटील हे अनेक वर्षांपासून सेंद्रिय शेती करीत आहेत. मूग, उडीद, तूर या डाळवर्गीय पिकांसोबतच ते गव्हाचेही उत्पादन घेतात. त्यांनी जाणीवपूर्वक ‘बन्सीपाला’ या गव्हाचे वाण जोपासले व त्याचे बियाणे तयार करून शेतकऱ्यांमध्ये प्रसार केला. 

गेल्या हंगामात त्यांना ‘आत्मा’ विभागाचे सहकार्य मिळाले. आत्मामार्फत या हंगामात १०० एकरांत सेंद्रिय पद्धतीने गहू पेरण्यात आला होता. या गव्हाची पेरणी टोकण पद्धतीने केली जात असून, एकरी अवघे पाच किलो बियाणे वापरले जाते. कमी पाण्यावरही हा गहू येतो. साडेचार ते पाच फुटांपर्यंत वाढ होते. शिवाय वादळ-वाऱ्यामध्ये टिकाव धरतो. शेतकऱ्यांना गेल्यावर्षी १२ ते १७ क्विंटलदरम्यान एकरी उत्पादन आले. शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च एकरी तीन ते साडेतीन हजारांच्या आत राहला. या गव्हाला मागणी चांगली असून, सध्याच्या प्रचलित वाणापेक्षा दरसुद्धा अधिक मिळत असल्याचे श्री. पाटील म्हणाले.

प्रतिक्रिया

कमी पाण्यावर येणारा हा गहू असून, खाण्यास चविष्ट व औषधी गुणधर्मयुक्त आहे. याची ओंबी छोटी व गच्च राहत असल्याने पाण्याने खराब होत नाही. आंतरपीक म्हणून मेथीसारखे पीकही घेता येते. आता इतरही शेतकरी त्याकडे वळत असल्याचे मोठे समाधान वाटते.
- वसंत बळीराम पाटील, सेंद्रिय उत्पादक, वडी, ता. नांदुरा, जि. बुलडाणा

रब्बीत गावातील ५० जणांचा समावेश असलेल्या शेतकरी गटाने या वाणाची लागवड केली होती. यासाठी गांडूळखत व तरल खताचाच वापर केला. २५ पासून तर ७० पर्यंत गव्हाला फुटवे आले होते. मंगरूळ इसरूळ गावात या वर्षी गटाशिवाय इतरही शेतकरी या गव्हाची लागवड करीत आहेत. 
- प्रल्हाद संपत गवते, गटप्रमुख, जय किसान सेंद्रिय शेतकरी गट, मंगरूळ (इसरूळ), ता. चिखली, जि. बुलडाणा 
 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...
कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
सांगली जिल्ह्यात बेदाणा उत्पादनात वाढ,...सांगली ः बेदाणा निर्मितीसाठी प्रतिकूल वातावरण...
तिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाणसिंधुदुर्ग : वायुवादळामुळे समुद्राला आलेले...
खरीप हंगामासाठी भेंडीची नवी जातचिपळूण ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
कोकणात बरसणार पूर्वमोसमीच्या सरीपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात...
दुष्काळ सांगतो ‘जपून वापरा पाणी’हवामानाच्या नुकत्याच व्यक्‍त झालेल्या अंदाजानुसार...
‘असर’दार शिक्षणासाठी...कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी...
मॉन्सूनची दक्षिण कर्नाटकपर्यंत चालपुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
गुजरातवरील ‘वायू' संकट तूर्त टळलेअहमदाबाद/ नवी दिल्ली : गुजरात किनाऱ्याच्या दिशेने...
मोगरा शेतीतून दरवळला यशाचा सुगंध...ॲग्रोवनमध्ये मोगरा शेतीची यशकथा वाचून कवठेमहांकाळ...
‘राजवाडी पॅटर्न’द्वारे शंभर एकर जमीन...पावसाळ्यात भरपूर पाऊस, उन्हाळ्यात पाण्याचे...
छत्रपती शाहू महाराज यांनी...कागल, जि. कोल्हापूर ः महाराष्ट्रात राजर्षी शाहू...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज पुणे ः अरबी समुद्रात धुमाकूळ घालणाऱ्या वायू...
'पशुसंवर्धन'मध्ये अखेर नव्याने बदल्यानागपूर ः विश्‍वासात न घेताच बदल्या केल्याचा ठपका...