agriculture news in Marathi, Osmanabad at 9.4 Celsius, Maharashtra | Agrowon

उस्मानाबाद ९.४ अंशांवर
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 जानेवारी 2018

पुणे ः उत्तरेकडून थंड वारे कमी-अधिक प्रमाणात वाहत आहेत. त्यामुळे राज्यातील किमान तापमानात चढ-उतार होत आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मंगळवारी (ता. २३) सकाळी आठ वाजेपर्यंत मराठवाड्यातील उस्मानाबाद येथे ९.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

पुणे ः उत्तरेकडून थंड वारे कमी-अधिक प्रमाणात वाहत आहेत. त्यामुळे राज्यातील किमान तापमानात चढ-उतार होत आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मंगळवारी (ता. २३) सकाळी आठ वाजेपर्यंत मराठवाड्यातील उस्मानाबाद येथे ९.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

राज्यातील अनेक भागांत समुद्रावर बाष्प आले आहे. त्यामुळे कमी-अधिक प्रमाणात धुके पडत आहे. गेल्या आठवड्यातही समुद्रावरून बाष्प आले होते. त्यामुळे काही प्रमाणात थंडी कमी झाली होती. सोमवार (ता. २२)पासून राज्यातील अनेक भागांत पाण्याची वाफ आली आहे. तसेच उत्तरेकडून महाराष्ट्राकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यातील बऱ्याच भागात धुके कमी जास्त प्रमाणात पडेल. 

सध्या आॅस्ट्रेलियाजवळ चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. येत्या काळात ही स्थिती वादळ तयार करण्याची शक्यता आहे. या वादळामुळे भारताच्या किंबहुना महाराष्ट्राच्या वातावरणावरही थोडासा परिणाम करेल. हे वादळ बऱ्याच प्रमाणात वाऱ्यांच्या दिशेमध्ये बदल करण्याची शक्यता असून, या चक्राकार स्थितीमुळे ढग व पाण्याची वाफ ओढून घेण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.

राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. येत्या शनिवार (ता. २७) पर्यंत गोव्यासह, संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. पुणे परिसरातही सोमवार (ता. २९) पर्यंत आकाश मुख्यत निरभ्र राहण्याची शक्यता आहे. 

मंगळवारी (ता. २३) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रूझ) १९.०, अलिबाग १९.४ (२), रत्नागिरी २०.६ (२), भिरा १६.०(१), डहाणू १७.९ (१), पुणे १२.२ (१), नगर ११.१ (-१), जळगाव १२.४, कोल्हापूर १७.१ (२), महाबळेश्वर १२.१(-१), मालेगाव १४.२ (३), नाशिक १२.६ (२), निफाड १०.२, सांगली १४.०, सातारा १३.५, सोलापूर १५.५(-१), औरंगाबाद १३.८ (२), बीड १४.० (१), परभणी (कृषी विद्यापीठ) १०.०, परभणी शहर ११.५ (-३), नांदेड १५.० (१), उस्मानाबाद ९.४, अकोला १५.१ (१),  अमरावती १४.४, बुलडाणा १५.२, चंद्रपूर १३.२ (-२), गोंदिया १०.२ (-३), नागपूर ११.९ (-२), वर्धा १२.१(-२), यवतमाळ १६.०

इतर अॅग्रो विशेष
फेरवाटपातून वाढतोय जलसंघर्षमहाराष्ट्र देशी जलसंघर्षांच्या संख्येत व तीव्रतेत...
शेतकरी सक्षमतेचा ‘करार’भारतीय शेतकऱ्यांसमोर आजची सर्वांत मोठी अडचण कोणती...
शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या...
‘त्या’ कृषी पर्यवेक्षकांना ‘मॅट’चा...अकोला ः अमरावती विभागीय कृषी सहसंचालकाकडून सन...
भुईमुगालाही हमीभाव मिळेनाअकोला ः या हंगामात लागवड झालेल्या भुईमुगाची काढणी...
जैन इरिगेशनला विदर्भातील सूक्ष्म सिंचन...जळगाव : जगातील अग्रगण्य सिंचन कंपनी जैन इरिगेशन...
कडधान्याचा पेरा वाढण्याची शक्यतानवी दिल्ली ः भारतीय हवामान खत्याने यंदा मॉन्सून...
माॅन्सून उद्या अंदमानातपुणे : माॅन्सूनसाठी अंदमानाच्या दक्षिण भागात...
ढगाळ हवामानामुळे पारा घसरला पुणे : मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात व परिसरात...
‘राष्ट्रीय गोकूळ मिशन’मध्ये पश्चिम...मुंबई :  केंद्र पुरस्कृत‘राष्ट्रीय...
राज्यात कांदा १०० ते ९०० रुपये...नाशिकला ३०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल नाशिक...
धुळे जिल्ह्यात तृणधान्यासह कापूस...धुळे : जिल्ह्यात सुमारे चार लाख ४० हजार हेक्‍टरवर...
पीक लागवडीची अचूक वेळ साधणे महत्त्वाचेअशोक बारहाते यांची ९ एकर शेती. मात्र खरीपात...
तूर, उडीद लागवडीवर सर्वाधिक भरआमच्या भागात खरिपात सहसा पिके घेत नाहीत, रब्बी हा...
बियाणे, लागवड तंत्रात केला बदलसातारा जिल्ह्यातील उडतरे (ता. वाई) येथील सुनील...
‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅग्री...पुणे ः ॲग्रिकल्चर सेक्टरमधील खते, बी - बियाणे,...
उत्पादकांना मिळावा उत्पादनवाढीचा लाभदेशातील काही भागांत विशेषत: कर्नाटक, तमिळनाडू व...
सेसवसुली नव्हे; सर्रास लूटजळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे आवाराबाहेर...
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी कुमारस्वामी...बंगळूर : जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी...
पाणलोट गैरव्यवहार; चौघांचे निलंबन शक्यपुणे : पाणलोट खात्यातील भ्रष्टाचारप्रकरणी कृषी...