agriculture news in marathi, Otherwise battle statr against government from one June | Agrowon

....अन्यथा एक जूनपासून आर-पारची लढाई
टीम अॅग्रोवन
रविवार, 25 फेब्रुवारी 2018

औरंगाबाद : शेतकरी संपाच्या वेळी मागण्या मान्य करणाऱ्या सरकारने नऊ महिने लोटल्यानंतरदेखील एकाही मागणीची पूर्तता केली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा चार टप्प्यात आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. चौथ्या टप्प्यात जेलभरो केल्यानंतरही सरकारने ठोस पावले न उचलल्यास येत्या १ जूनपासून लोकशाही मार्गाने आरपारची लढाई लढली जाईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिला.

औरंगाबाद : शेतकरी संपाच्या वेळी मागण्या मान्य करणाऱ्या सरकारने नऊ महिने लोटल्यानंतरदेखील एकाही मागणीची पूर्तता केली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा चार टप्प्यात आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. चौथ्या टप्प्यात जेलभरो केल्यानंतरही सरकारने ठोस पावले न उचलल्यास येत्या १ जूनपासून लोकशाही मार्गाने आरपारची लढाई लढली जाईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिला.

शेतकरी सुकाणू समितीच्या आढावा बैठकीसाठी श्री. पाटील व त्यांचे सहकारी शनिवारी (ता.२४) औरंगाबादेत आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. श्री. पाटील म्हणाले, ३१ वर्षांच्या आघाडीच्या राज्यानंतर देशात एका पक्षाचं सरकार आलं. सरकार बदललं पण धोरणं तीच आहेत. २०१४ मध्ये जी आश्वासनं देऊन नरेंद्र मोदीं, देवेंद्र फडणवीस सत्तेत आले त्यांनी एकाही आश्वासनाची पूर्ती केली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारविरोधात असहकार आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यानुसार १९ मार्चला प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नदात्यासाठी अन्नत्याग, २३ मार्चपासून सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरपासून हुतात्मा अभिवादन यात्रेच्या माध्यमातून गावागावात जागर व शेवटच्या टप्प्यात ३० एप्रिलला सत्याग्रह आंदोलनाच्या माध्यमातून जेलभरो आंदोलन करण्यात येईल. त्यानंतरही सरकारने सत्तेत येण्यासाठी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्यास लोकशाही मार्गाने आरपारची लढाई लढली जाईल, असे श्री. पाटील म्हणाले.

दुधातील लूट ४२०० कोटींची
सरकारने दुधाला २७ रुपये हमी भाव जाहीर केला. परंतु दररोज होणाऱ्या तीन कोटी लिटर दुधाला १७ ते २२ च्या दरम्यान दर मिळतो. यासंदर्भात हिशोब केल्यास दर जाहीर केल्यापासून  ४२०० कोटी रुपयांनी दूध उत्पादक लुटल्या गेला. याला जबाबदार कोण, लूट करणाऱ्यावर कारवाई होत नाही आणि दुधाला शासनाने जाहीर केलेला दरही मिळत नाही. याच उत्तरही सरकारला द्यावे लागेल, असे रघुनाथदादा पाटील म्हणाले.

इतर ताज्या घडामोडी
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...
विदर्भात कापूस पोचला प्रतिक्विंटल ५९१५...नागपूर ः शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यापनंतर आता...
पुणे बाजारात घेवडा, मटारच्या भावात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पुणे जिल्ह्यात शेतकरी सन्मान योजनेच्या...पुणे : केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान...
हिंगोलीतील २७ हजार लोकसंख्या पाण्यासाठी...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
खानदेशात चारा प्रश्‍न गंभीरजळगाव ः खानदेशात सद्यःस्थितीत निर्माण झालेल्या...
दुष्काळमुक्त मराठवाड्याचा संकल्प ः...औरंगाबाद: पन्नास टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात...
छपन्न इंचीच्या छातीच्या गप्पा कशाला?ः...चाकण, जि. पुणे: देशाचे पंतप्रधान देश माझ्या मुठीत...
योग्य पद्धतीनेच करा बांबू तोडणीपरिपक्व बांबू हा दरवर्षी तोडला पाहिजे, तरच त्याला...
औरंगाबादला कैरी प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कृषी क्षेत्रात निर्मिती उद्योगाच्या...अकोला : कृषी क्षेत्रात बायोफर्टिलायजर,...
खानदेशात भुईमूग पीक जेमतेमजळगाव : भुईमुगाचे पीक खानदेशात जेमतेम आहे. त्याचे...
सोलापूर जिल्हा बॅंकेतही मिळणार ‘सन्मान...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा...
लाल कांद्याच्या दरात सुधारणाजळगाव : लाल कांद्याची जळगावसह धुळे, साक्री येथील...
प्रस्तावित सुरत-हैदराबाद...नाशिक : केंद्राच्या भारतमाला योजनेंतर्गत...
शेवगाव, पाथर्डीत शेळ्या-मेंढ्यांच्या...शेवगाव, जि. नगर : दुष्काळी परिस्थितीत सरकारने...
सांगलीचा प्रश्‍न दिल्लीदरबारीसांगली ः सांगली लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानीला...