agriculture news in marathi, Otherwise, we will bring cotton plant to the office of the District Collector | Agrowon

...अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पऱ्हाट्या आणून टाकू
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 नोव्हेंबर 2017

हिमायतनगर, जि. नांदेड : राज्यात बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या कपाशीच्या पिकांचे सर्वेक्षण येत्या सात डिसेंबरपर्यंत पू्र्ण करावे; अन्यथा सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात प्रहार जनशक्तीतर्फे पऱ्हाट्या आणून टाकण्याचे आंदोलन केले जाईल, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला.

रविवारी (ता. २६) सायंकाळी हिमायतनगर शेतकरी आसूड सभेत आमदार बच्चू कडू बोलत होते. या वेळी अध्यक्षस्थानी प्रमोद कुदळे होते. उमाकांत तिडके, गजानन जाधव, दिलीप देशमुख, बंडु देशमुख, बालूभाऊ जवंजाळ, बालाजी बलपेवाड, अनिल कदम, प्रभू कल्याणकर, रामराव पवार, मारोती वानखेडे आदी उपस्थित होते.

आमदार कडू पुढे म्हणाले, राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांविषयी उदासीन धोरण अवलंबित आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. या आत्महत्या नसून व्यवस्थेने पूर्व नियोजित केलेल्या हत्या आहेत. शासनाच्या चुकीच्या धोरणांचा बळी शेतकरी ठरत आहे. शेतकरी, शेतमजूर आॅनलाइनच्या कचाट्यात सापडले आहेत.

येत्या सात डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करावा. बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या कपाशीच्या पिकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात यावे; अन्यथा प्रहार जनशक्तीतर्फे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पऱ्हाटी आणून टाकली जाईल, असा इशारा आमदार कडू यांनी या वेळी दिला.

इतर ताज्या घडामोडी
पीक सल्ला१६ जुलै ते ३१ जुलैपर्यंत पेरणी लांबल्यास संकरीत...
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसादजळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप...
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात...सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात...
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेधसांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी...
दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलननागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनपुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी...
दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलनअकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंदऔरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या...
नगर जिल्ह्यात दूध संकलन बंदनगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या...केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय...
सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला...
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत...तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे...
नागपूर, गडचिरोलीत संततधारनागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (...
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिपऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास...
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊसपुणे   : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली...
अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायमनगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६...नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६...
सातारा जिल्ह्यातील पश्‍चिम भागात दमदार...सातारा : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील महाबळेश्वर,...
कोल्हापुरात पंधरा लाख लिटर दुधाचे संकलन...कोल्हापूर ः गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये...
बीड जिल्ह्यात दुधाचे संकलन ठप्पबीड : दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...