agriculture news in marathi, Otherwise, we will request to the center for purchase the secondary commodities | Agrowon

दुय्यम शेतमालही खरेदी करण्याची केंद्राला विनंती करणार
सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 नोव्हेंबर 2017

माजलगाव, जि. बीड : शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्रावर निवडक, चांगल्या शेतमालाचीच खरेदी करण्यात येत असून दुय्यम,  खराब माल घेतला जात नाही. शेतकऱ्यांचा दुय्यम शेतमाल थोड्या कमी दराने का होईना; पण तो खरेदी करावा, अशी विनंती करून पणन मंत्रालयामार्फत केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती पणनमंत्री सुभाष देशमुख यांचे विशेष कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी दिली.

माजलगाव, जि. बीड : शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्रावर निवडक, चांगल्या शेतमालाचीच खरेदी करण्यात येत असून दुय्यम,  खराब माल घेतला जात नाही. शेतकऱ्यांचा दुय्यम शेतमाल थोड्या कमी दराने का होईना; पण तो खरेदी करावा, अशी विनंती करून पणन मंत्रालयामार्फत केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती पणनमंत्री सुभाष देशमुख यांचे विशेष कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी दिली.

शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी श्री. पाटील यांनी रविवारी (ता. २६) येथील खरेदी केंद्राला भेट दिली. या वेळी आमदार आर. टी. देशमुख, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष दीपक जाधव, माजी सभापती नितीन नाईकनवरे, उपसभापती जयदत्त नरवडे, चंद्रकांत शेजूळ, श्रीमती पांडव उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले की, खरेदी केंद्रावर येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी पणन मंत्रालयामार्फत संपूर्ण मराठवाड्याचा आढावा घेण्यासाठी थेट मंत्रालयातील अधिकाऱ्यांना विविध ठिकाणी पाठविण्यात आले आहे. काही क्षुल्लक अडचणी तत्काळ सोडविण्यात येत असून काही अडचणींबाबत केंद्र सरकारला कळविण्यात येणार आहे. खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा निवडक, चांगला शेतमालच खरेदी करण्यात येत असून दुय्यम माल नाकारण्यात येत आहे.

शेतकरी जाणूनबुजून खराब माल केंद्रावर आणत नाही, निसर्गाच्या अवकृपेने तो माल खराब होतो, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. यामुळे राज्य सरकार केंद्राला प्रस्ताव पाठवून कमी दराने का होईना; पण दुय्यम माल खरेदी करण्याबाबत विनंती करणार आहे. या वेळी शेतकऱ्यांना जिल्ह्यातून येणारे चुकीचे एसएमएस, खरेदी केलेला माल ठेवण्यासाठी गोडाऊनची व्यवस्था आदी अडचणी संबंधित अधिकाऱ्यांना बोलून सोडविण्यात आल्या.

इतर ताज्या घडामोडी
खोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे   : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...
वाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...
नगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...
पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...
केळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव  ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...
बोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...
नगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर  ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...
जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली  : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...
आंब्यावरील मिजमाशी, शेंडा पोखरणाऱ्या...मिजमाशी प्रादुर्भाव कोवळ्या पालवीवर,...
फळपिके सल्लाकोणत्याही वनस्पतींच्या वाढीवर हवामानाचा कमी जास्त...
योग्य वेळी करा लसीकरणजनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न बघता...
धनगर समाजाचा उद्या औरंगाबादमध्ये धडक...औरंगाबाद : धनगर समाजाला एस.टी.(अनुसूचित जमाती)...
जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी माधवराव...मनमाड, जि. नाशिक : जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक,...
केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री अनंत...बंगळूर : केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री व दक्षिण...
ऊस दरप्रश्नी सोलापुरात ‘स्वाभिमानी’...सोलापूर  ः गेल्या गळीत हंगामातील उसाची...
दिवाळी संपूनही शासकीय कापूस खरेदीला...अकोला : या हंगामात लागवड केलेल्या बागायती तसेच...
ऊस दरासाठी सातारा जिल्ह्यात रास्ता रोकोसातारा  ः जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने...
थकीत एफआरपीच्या मागणीसाठी शिरोळ येथे...कोल्हापूर  : साखर कारखान्यांनी गेल्या...
ऊस दरप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे त्रिधारा...परभणी : मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी यंदाचे ऊस...
सांगलीत एकरकमी ‘एफआरपी’कडेगाव, जि सांगली  ः कोल्हापूर जिल्ह्याने...