agriculture news in marathi, ots scheme status, jalgaon, maharashtra | Agrowon

जळगाव जिल्ह्यात ओटीएस योजनेला प्रतिसाद नाहीच
टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 डिसेंबर 2017

दीड लाखावरील थकबाकीदारांचे खाते एनपीएतून लवकर बाहेर यावे म्हणून ओटीएस योजना आहे. ती प्रभावीपणे जिल्ह्यात राबवित असून, प्रतिसाद मिळू लागला आहे. सोसायट्यांमध्ये ही माहिती दिली जात आहे. 

- अशोक बागल, प्रभारी सहायक जिल्हा उपनिबंधक, जळगाव.
जळगाव  ः कर्जमाफीसाठी जिल्ह्यात एक लाख ७० हजारांपेक्षा अधिक शेतकरी पात्र आहेत. यात दीड लाखावरील कर्जदार शेतकऱ्यांसाठी वन टाइम सेटलमेंट (ओटीएस) योजना आहे, पण या योजनेला अजून फारसा प्रतिसाद मिळालेला नसल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून मिळाली आहे. 
 
वन टाइम सेटलमेंट योजनेतून दीड लाखावरील कर्जदार शेतकऱ्यांचे खाते एनपीएतून बाहेर काढायचे आहे. ओटीएसअंतर्गत दीड लाखावरील रकमेतील किमान ७० टक्के रक्कम भरायची आहे. ती रोख किंवा धनादेशाच्या स्वरूपात भरता येईल. जिह्यात थकबाकीदार शेतकऱ्यांमध्ये किंवा कर्जमाफी योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांमध्ये दीड लाखावर कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या सुमारे ७० हजार एवढी आहे. ते कर्जमाफी योजनेत समाविष्ट व्हावेत म्हणून ओटीएस योजना राबवायला या महिन्यात सुरवात झाली आहे. 

दीड लाखावरील कर्जदार शेतकऱ्यांसाठी ओटीएस योजना लागू केलेली असली तरी दीड लाखावरील ४० ते ५० हजार रुपये रक्कम भरायलाही अनेक कपाशी उत्पादक शेतकरी समर्थ नाहीत. कारण बोंड अळीमुळे कपाशीचे पीक पुरते हातचे गेले आहे. दीड लाख रुपये शासनाने देऊ केले असले, तरी उर्वरित रकमेसाठीही त्यांना मदतीची गरज असून, काही शेतकरी आप्त, नातेवाईक यांच्याकडून ही मदत मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत.

ओटीएस योजनेतून दीड लाखावर आणखी एक लाख रुपये रक्कम असेल, तर नेमकी किती रक्कम भरायची याची जाहीर माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालय, बॅंकांनी शेतकऱ्यांना द्यायला हवी. सोसायट्यांमध्ये तसे पत्र दिले जावे, पण तसे कुठलेही पत्र नसल्याने संभ्रमाचे वातावरण आहे, अशी माहिती मिळाली.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...