agriculture news in Marathi, over 4 lac animals in fodder camp, Maharashtra | Agrowon

मराठवाड्यात सव्वाचार लाख जनावरे चारा छावण्यांत
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 एप्रिल 2019

औरंगाबाद : गत आठवड्याच्या तुलनेत औरंगाबाद, बीड व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांत सुरू झालेल्या चारा छावण्यांच्या संख्येत ६७ छावण्यांची भर पडली आहे. आजवर सुरू झालेल्या ६३५ चारा छावण्यांमध्ये चारा पाण्यासाठी ४ लाख २७ हजारावर जनावरे आश्रयाला आली आहेत. 

औरंगाबाद : गत आठवड्याच्या तुलनेत औरंगाबाद, बीड व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांत सुरू झालेल्या चारा छावण्यांच्या संख्येत ६७ छावण्यांची भर पडली आहे. आजवर सुरू झालेल्या ६३५ चारा छावण्यांमध्ये चारा पाण्यासाठी ४ लाख २७ हजारावर जनावरे आश्रयाला आली आहेत. 

गत आठवाड्यात औरंगाबाद, बीड व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांत मंजूर ९३१ चारा छावण्यांपैकी ५६८ चारा छावण्या सुरू झाल्या होत्या. तर या चारा छावण्यांमध्ये ३ लाख ४३ हजार ७९७ लहान मोठी जनावरे दाखल झाली होती. १५ एप्रिलअखेर औरंगाबाद, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांतील मंजूर चारा छावण्यांची संख्या ९७६ वर पोचली. तर त्यापैकी ६३५ चारा छावण्या प्रत्यक्षात सुरू झाल्या. या चारा छावण्यांमध्ये ३ लाख ९३ हजार ३० मोठी व ३४ हजार ३४३ लहान जनावरे मिळून ४ लाख २७ हजार ३७३ जनावरे दाखल झाले आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यात ४ चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली असून, त्यापैकी ३ चारा छावण्या प्रत्यक्षात सुरू झाल्या आहेत. या चारा छावण्यांमध्ये १७३३ मोठी व ३२४ लहान मिळून २०५७ जनावरे दाखल झाली आहेत. बीड जिल्ह्यात ८८६ चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ५७६ चारा छावण्या सुरू झाल्या आहेत.  या चारा छावण्यांमध्ये ३ लाख ५७ हजार १०४  मोठे, तर २९ हजार ९०५ लहान मिळून ३ लाख ८७ हजार ९ जनावरे दाखल झाली आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यात ८६ चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ५६ चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. या चारा छावण्यांमध्ये ३४ हजार १९३ मोठे व ४११४ लहान जनावरे मिळून ३८ हजार ३०७ जनावरे दाखल झाली आहेत. गत आठवाड्याच्या तुलनेत १५ एप्रिलअखेर चारा छावण्यांमध्ये चारा पाण्यासाठी दाखल झालेल्या जनावरांच्या संख्येत ८३ हजार ५७६ जनावरांची भर पडल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्रांनी दिली. 

इतर अॅग्रो विशेष
कान्हूरपठार, करंदी परिसरात वादळी वा-...टाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः पारनेर...
वर्धा : रोजगारासाठी स्थलांतरामुळे गावं...वर्धा : शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून...
गावाेगावी पाण्याच्या टॅंकरकडं नजरानगरः तलाव, धरणं कोरडी पडली. कधीच आटल्या नाहीत,...
दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची माहिती...मुंबई : दुष्काळासंदर्भात उत्तर देण्यासाठी...
सत्तर कारखान्यांना बजावली 'आरआरसी'पुणे : राज्यातील १९५ साखर कारखान्यांकडून...
सेवानिवृत्तीनंतर शिक्षकाची शेतीत सेवा...आयुष्यभर नोकरी करताना अनेक गोष्टींचा त्याग करावा...
पतआराखड्याची वाट न बघता खरिपासाठी कर्जपुणे : खरीप पीक कर्जवाटप नियोजनात मुख्य भूमिका...
गिलक्‍याने दिले अर्थकारणाला बळबाजारपेठेची गरज ओळखून कठोरा (ता. जि. जळगाव) येथील...
जरंडीत ‘एक गाव, एक वाण’ योजना फसलीनागपूर ः कापसाचे एक गाव एक वाण लावण्याचा आदर्श...
उन्हाचा चटका कायम राहणार पुणे : विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी...
आया मौसम बदली कामार्च ते मे हे तीन महिने शासकीय अधिकारी-...
आगीपासून वन वाचविण्याचा करूया निर्धारजंगलातील वाळलेला पालापाचोळा हा ज्वलनशील पदार्थ...
उद्योगाला साखर कडूचमहाराष्ट्रातील गळीत हंगामाची सांगता नुकतीच झाली...
‘एफआरपी'साठी शेतकरी संघटना पुन्हा...सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या...
विदर्भात उत्कृष्ट व्यवस्थापन असलेली २३...वर्धा जिल्ह्यात केळी पिकाला पुन्हा गतवैभव प्राप्त...
भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांची पुनर्वसन...पुणे : भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांसाठी पुनर्वसनाची...
वर्षभरात पाच हंगामात दर्जेदार कोथिंबीरपाणी व हवामान यांचा विचार करून वर्षभरात सुमारे...
राज्यात आता पीकविमा शेतकरी सहभाग अभियानपुणे: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी यंदा...
छावण्यातील जनावरांची आठवड्यातून एकदा...मुंबई ः दुष्काळी भागातील चारा छावण्यांमधील...
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला मागणीकोल्हापूर: निर्यातीच्या बाबतीत पिछाडलेल्या...