agriculture news in marathi, Over 70 pc turnout in Karnataka Assembly polls, re-poll in one booth | Agrowon

कर्नाटकात ७० टक्क्यांवर शांततेत मतदान
वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

बंगळूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी शनिवारी (ता. १२) सायंकाळी ५.३० पर्यंत ७० टक्के मतदान शांततेत पार पडले. २२४ विधानसभा मतदारसंघांपैकी २२२ जागांवर एकूण २६२२ उमेदवार रिंगणात आहेत. राज्यात ५ कोटींहून अधिक मतदारांनी आपला हक्क बजावला. कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात रस्सीखेच असून, संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. १५ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

बंगळूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी शनिवारी (ता. १२) सायंकाळी ५.३० पर्यंत ७० टक्के मतदान शांततेत पार पडले. २२४ विधानसभा मतदारसंघांपैकी २२२ जागांवर एकूण २६२२ उमेदवार रिंगणात आहेत. राज्यात ५ कोटींहून अधिक मतदारांनी आपला हक्क बजावला. कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात रस्सीखेच असून, संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. १५ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

२००८ च्या विधानसभेसाठी ६४.६८ टक्के, २०१३ साठी ७१.४५ टक्के, २०१४च्या लोकसभेसाठी ६७.२८ टक्के नागरिकांनी मतदान केले होते. २०१४ मध्ये कॉंग्रेस पक्ष स्पष्ट बहुमतात आला हाता. यंदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसने २२० जागा, तर भाजपने २२२ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी जनता दलाचे (सेक्युलर) १९९, तर बहुजन समाज पक्षाने १८ ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते. 

मुख्यमंत्री सिद्धरामय्या आपली दहावी आणि शेवटची निवडणूक म्हैसूर जिल्ह्यातील चामुंडेश्‍वरी मतदारसंघातून लढवत आहेत. सत्ताधारी काँग्रेस, भाजप आणि जनता दल (एस) या पक्षांकडून जिंकण्याचा दावा केला जात आहे. सिद्धरामय्या यांनी सांगितले, की कर्नाटकातील जनतेसाठी पाच वर्षे विकासकामे केली. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे, या निवडणुकीत काँग्रेस १२० पेक्षा अधिक जागांवर विजय प्राप्त करून सत्ता स्थापन करेल. भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी. एस. येडीयुरप्पा यांनी शिकरीपुरा येथे मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळेल आणि पुढील सरकार आमचे असेल, असे सांगितले.   

माजी पंतप्रधान आणि जेडीएसचे नेते देवेगौडा यांनी सांगितले, की आम्ही या निवडणुकीत ''किंगमेकर''ची भूमिका बजावून सत्ता स्थापन करू. जनता दलचे (एस) नेते कुमारस्वामी आणि त्यांच्या पत्नीने रामानागरा मतदानाचा हक्क बजावला. या वेळी कुमारस्वामी म्हणाले, आम्हाला विश्वास आहे, या निवडणुकीत जेडीएस बहुमताचा आकडा पार करून सत्ता स्थापन करेल. 
कर्नाटकचे माजी लोकायुक्त न्यायमूर्ती संतोष हेगडे यांनी बंगळुरू येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. ते म्हणाले, मागील काही वर्षांपासून गैरप्रकार वाढले आहेत. साड्यांचे वाटप, दारू, धोती आणि कुकरचे वाटप केले जाते आणि मतदारांना प्रभावित केले जाते. हे लोकशाहीचे योग्य उदारहण नाही. बंगळुरुचे पोलिस उपायुक्त रवी चन्नन्नवर यांनी सांगितले, की हा एक संवेदनशील मतदान केंद्र आहे. भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मतदान केंद्राच्या १०० मीटर अंतरावर वादाचे प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले. याबाबत आम्ही तपास सुरू केला असून, संबंधितांवर पुढील कारवाई केली जाईल.  

 बेळगाव जिल्ह्यातील १८ जागांसाठी २०३ उमेदवार रिंगणात असून, सीमाभागातील बेळगाव शहर, तालुका व खानापूर तालुक्‍यातील निवडणूक मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी पार पडलेले मतदान अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे, इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या विश्‍वासार्हतेवर विरोधी पक्ष प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत असताना राज्यामध्ये प्रथमच निवडक ठिकाणांवर तिसऱ्या पिढीतील मतदान यंत्रांचा वापर करण्यात आला. केवळ महिला अधिकाऱ्यांचे नियंत्रण असलेले "पिंक बूथ''देखील चर्चेचा विषय ठरले होते. मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ व्हावी म्हणून निवडणूक अधिकाऱ्यांनी या उपक्रमांचे आयोजन केले होते.

तिसऱ्या पिढीतील अत्याधुनिक "एम-3 ईव्हीएम' यंत्रांमध्ये कोणत्याही स्थितीमध्ये हस्तक्षेप करणे शक्‍य नसल्याचा दावा तज्ज्ञांनी केला असून तसा प्रयत्न कोणी केल्यास संबंधित यंत्र हे आपोआप बंद पडते. पहिल्या टप्प्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर बंगळूरमधील राजाराजेश्‍वरी नगर, शिवाजीनगर, शांतीननगर, गांधीनगर आणि राजाजीनगरमध्ये हा उपक्रम राबविला जाणार होता. राजाराजेश्‍वरीनगरमध्ये दहा हजारांपेक्षाही अधिक बोगस मतदार ओळखपत्रे सापडल्याने येथील निवडणूक रद्द करण्यात आली होती. या नव्या "ईव्हीएम'मध्ये काही अद्ययावत फीचर्सचा समावेश असून यातून बॅटरीची स्थिती, या यंत्राचे डिजिटल सर्टीफिकेशन पाहता येते. तसेच या यंत्राशी कोणी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला, तर संबंधित यंत्र हे स्वत:हून याची माहिती मुख्य यंत्रणेला देते.

अद्ययावत फीचर्सचा समावेश
बंगळूरमधील महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये साडेचारशे पिंक बूथ उभारण्यात आले असून त्याचे सखी असे नामकरण करण्यात आले आहे. यातून महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. म्हैसूर, चामराजनगर आणि उत्तर कन्नड जिल्ह्यामध्ये आदिवासींची संख्या मोठी असल्याने त्यांच्या जीवनशैलीशी साधर्म्य साधणारी मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.

‘‘कॉंग्रेस प्रचंड बहुमताने पुन्हा सत्तेत येईल, सरकार स्थापनेचा दावा करणारे भाजप नेते येड्डियुराप्पा यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे.’’
- सिद्धरामय्या, मुख्यमंत्री कर्नाटक 

इतर ताज्या घडामोडी
संत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल...नागपूर  ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित...
सूक्ष्म सिंचन विस्तारातील अडचणी, पर्याय...औरंगाबाद   : औरंगाबाद येथे आयोजित...
‘ई- टेंडरिंग’ रेशीम उत्पादकांच्या मुळावरपुणे  ः राज्यात पाणीटंचाईमुळे सर्वत्र...
आंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळाले ७४...पुणे  : साखर आयुक्तालयासमोर गेल्या तीन...
रोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात... नगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ...
लोणार तालुक्यात कडाक्याच्या थंडीमुळे...बुलडाणा : जिल्ह्यात द्राक्ष शेती टिकवून ठेवण्यात...
कृषी सल्ला (कोकण विभाग)भात रोप अवस्था : उन्हाळी भात रोपवाटिकेस...
थंडीच्या काळात केळी बागांची काळजीकेळीच्या पानांवर कमी तापमानाचे दुष्परिणाम २ ते ४...
पहाटे, रात्री थंडीचे प्रमाण अधिक राहीलमहाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगावर १०१४...
पाणंद रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुरू अकोला : शासनाच्या पाणंद रस्ते योजनेतून...
`साखर उद्योगातील संघटित गुन्हेगारी...मुंबई : गेल्या वर्षीच्या हंगामातील ७०-३०...
शासकीय दूध डेअरीत अमोनियाची गळतीअकोला : येथील मूर्तिजापूर मार्गावर असलेल्या...
कृषी योजनेतील विहिरींनाही दुष्काळाचा...धुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशात विहिरींनी...
नागपुरात `जलयुक्‍त`चा निधी आटलानागपूर : फडणवीस सरकारची महत्त्वाकांशी योजना...
मराठवाड्याची ७६२ कोटींची अतिरिक्‍त...औरंगाबाद ः शासनाने कळविलेल्या आर्थिक मर्यादेच्या...
नत्राच्या कार्यक्षम वापरासाठी सेन्सरचा...कृषी क्षेत्रातून होणाऱ्या नत्रांच्या प्रदूषणाची...
कृषिक प्रदर्शनातील प्रात्यक्षिके पाहून...बारामती, जि. पुणे ः कृषिक प्रदर्शनाच्या दुसऱ्या...
जाती-धर्माच्या भिंती तोडणे हीच स्व....इस्लामपूर, जि. सांगली : लोकनेते राजारामबापू पाटील...
पशुधन संख्येनुसार चारा उपलब्ध करून द्यापरभणी ः परभणी जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत पशुधन...
ज्वारी, हरभरा, करडईच्या पेरणी...परभणी ः जिल्ह्यात यंदा ज्वारी, हरभरा, करडई या तीन...