सोलापुरात टॅंकरची संख्या शंभरावर

सोलापुरात टॅंकरची संख्या शंभरावर
सोलापुरात टॅंकरची संख्या शंभरावर

सोलापूर  : उन्हाच्या वाढत्या तडाख्याने सोलापूर जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढली अाहे. जिल्ह्यात आतापर्यंत पिण्याच्या पाण्याच्या टॅंकरची संख्या ११३ वर पोचली आहे. येत्या काळात आणखी काही संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. तसे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे येऊ लागले आहेत.  

जिल्ह्यात यंदा पाऊसमान कमी झाल्याने टंचाईची झळा तीव्र झाल्या आहेत. विशेषतः सांगोला, मंगळवेढा, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, करमाळा या भागात त्याची सर्वाधिक झळ बसत आहे. शासकीय निकषांची पडताळणी केल्याशिवाय टॅंकर देऊ नयेत, अशा सूचना असल्याने टॅंकर देताना प्रशासकीय यंत्रणेकडून हात आखडता घेतला जात आहे. 

गतवर्षी राज्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने जलयुक्‍त शिवार योजनेंतर्गत झालेल्या कामांचाही फायदा टंचाई निवारणासाठी होताना दिसत नाही. 

सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या योजनाही रखडल्या असून अधिग्रहीत विहिरींमधील पाणीही खोलवर गेले अाहेत. बहुतांश विहिरी कोरड्या पडल्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर गावकऱ्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. दुसरीकडे, मात्र शासकीय निकषांमुळे टॅंकर वेळेवर मिळत नसल्याची चर्चा आहे. 

तालुकानिहाय टॅंकर  

मंगळवेढा : ४१, सांगोला : २०, करमाळा : १७ , दक्षिण सोलापूर : १० , माढा : ७ , माळशिरस : ७ , मोहोळ : ४ , अक्‍कलकोट : ३, बार्शी : २ उत्तर सोलापूर : २, एकूण : ११३  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com