agriculture news in Marathi, Over one lack hector cotton inspection pending, Maharashtra | Agrowon

एक लाख हेक्टरवरील कपाशीचे पंचनामे बाकी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 31 जानेवारी 2018

ज्या शेतकऱ्यांनी कापूस बियाणे खरेदीच्या पावतीसोबत तक्रार अर्ज दिले, त्यांचे पंचनामे प्राधान्य केले जात आहेत. आणखी महिनाभर पंचनाम्यांची कार्यवाही चालू शकते. 
- प्रवीण आवटे, तंत्र अधिकारी, कृषी विभाग

जळगाव ः जिल्ह्यात अद्याप सुमारे साडेतीन लाख हेक्‍टरवरील कापसाचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. आणखी सुमारे एक लाख हेक्‍टरचे पंचनामे करायचे असून, काही ठिकाणी फेरपाहणी किंवा फेरपंचनाम्यांचे प्रकारही घडल्याची माहिती आहे; परंतु कुठेही फेरपंचनामे झालेले नसल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. 

जिल्ह्यात चार लाख ७५ हजार हेक्‍टरवर कापसाची लागवड झाली होती. यातील पूर्वहंगामी कापसाखालील क्षेत्र नोव्हेंबरपासूनच रिकामे व्हायला सुरवात झाली. क्षेत्र अधिक व कर्मचारी संख्या कमी, अशी स्थिती असल्याने पंचनाम्यांची कार्यवाही अपूर्ण आहे. ज्या शेतकऱ्यांनी कापूस बियाणे खरेदीचे बिल किंवा पावतीसोबत जे अर्ज कृषी विभागाकडे सादर केले आहेत, त्यांचे पंचनामे सध्या सुरू आहेत. त्यांचे पंचनामे आटोपल्यानंतर बिलांशिवाय जे अर्ज सादर केलेल्या शेतकऱ्यांच्या कापूस पिकाचे पंचनामे केले जातील, अशी माहिती मिळाली. 

कायदेशीरदृष्ट्या मजबूत कार्यवाही
भरपाई कापूस बियाणे उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून मिळवून द्यायची आहे. त्यासंदर्भात कंपन्या न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्याचे लक्षात घेता कृषी विभाग न्यायालयात आपली बाजू सक्षमपणे मांडता यावी या दृष्टीने सर्व कागदपत्रांसह पंचनाम्यांची कार्यवाही करत आहे. यामुळे पंचनाम्यांच्या प्रक्रियेला थोडा 
वेळही लागत आहे. बिले, पंचनामे, स्वाक्षऱ्या, पाहणी, काही महत्त्वाच्या ठिकाणी छायाचित्रेही घेतली जात असल्याचे सांगण्यात आले. यातूनच जामनेर व मुक्ताईनगरात कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी जाऊन पाहणी केल्याची माहिती मिळाली. 

पंचनाम्यांच्या कार्यवाहीला आणखी एक महिना कालावधी लागणार आहे. काही दिवसांनंतर ज्यांनी बिलांशिवाय सातबारा उताऱ्यावरील नोंदीसह जे अर्ज सादर केले आहेत, त्यांच्या कापसाच्या शेतात पंचनामे केले जाणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा गुणवत्ता निरीक्षक अमित पाटील यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 

धरसोडीचे प्रकार सुरूच
अनेक गावांमध्ये एका ठिकाणी बसून कृषी सहायकांनी पंचनामे केल्याच्या तक्रारी कायम आहेत. यात धरसोड झाली. थेट शेतात जाणे पंचनामा पथकांनी टाळल्याची कुरबूर सुरूच आहे. 

इतर अॅग्रो विशेष
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...
सीताफळाच्या योग्य जातींची करा लागवडमहाराष्ट्रात सीताफळाच्या झाडांचे काही नैसर्गिक...
उत्पादकांसाठी बेदाणा गोडसांगली ः यंदाच्या बेदाणा हंगामात बेदाण्याच्या...
केळी दरात किंचित सुधारणाजळगाव ः रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली...
मका चार वर्षांतील नीचांकी पातळीवरनवी दिल्ली ः बजारात मका आवक वाढल्यांतर मागणी कमी...
कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पणन संचालक...पुणे ः पणन संचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती असताना...
​​राज्य सरकार राबविणार मधुमक्षिका मित्र...पुणे : शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते...
ग्रामस्वच्छता अभियानात प्रभाग, गटातून...नगर ः ग्रामीण भागात स्वच्छतेची व्यापी...
केसर आंबा पाडाला आलाय...औरंगाबाद : आपली चव, गंध आणि रूपाने ग्राहकांना...
बदल्या समुपदेशनानेच...पुणे : राज्याच्या कृषी विभागात समुपदेशनाने बदल्या...
अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेतपुणे : ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात...
पाणलोट, मृदसंधारण घोटाळ्याचा पर्दाफाशपुणे : कृषी खात्यातील पाणलोट व मृदसंधारण...
ब्राझील, थायलंडचा यंदा इथेनॉलकडे वाढता...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वत्रच...
बारमाही भाजीपाला शेतीला नर्सरी...ब्राह्मणगाव (जि. नाशिक) येथील केवळ वाघ पूर्वी...
सुधारित तंत्राची मिळाली गुरुकिल्लीअकोला जिल्ह्याचे मुख्य उन्हाळी पीक कांद्याची...
भाराभर चिंध्या राज्यात १२७ वा पशुसंवर्धन दिन नुकताच साजरा...
मथुरेचं दूध का नासलं?राज्यात मे महिन्याचे तापमान यंदा नैसर्गिक आणि...
चिमुरड्याच्या कॅमेऱ्यात कैद आनंदी शेतकरीआपल्याकडील शेतकरी आनंदी असू शकतो का? उत्तर...
‘अ’तंत्र निकेतनपुरेसा अभ्यास आणि तयारीअभावी, यंत्रणेचा विरोध...