साखर उद्योगासाठीचे पॅकेज म्हणजे निव्वळ धूळफेक ः मुश्रीफ

हसन मुश्रीफ
हसन मुश्रीफ

कोल्हापूर  ः केंद्र शासनाने साखर उद्योगासाठी जाहीर केलेले ८५०० कोटींचे पॅकेज हे निव्वळ धूळफेक आहे. यातील ४५०० कोटींची तरतूद इथेनॉलसाठी असली तरी एफआरपीसाठी त्याचा काडीमात्रही उपयोग होणार नसल्याची टीका जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी केली. कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये आले असून पुढील २८ दिवसांत काही मार्ग निघाला नाही तर सर्व खाती एनपीएमध्ये जाण्याची भीती त्यांनी व्यक्‍त केली.

श्री. मुश्रीफ पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, की इथेनॉलसाठी ४५०० व १३०० कोटींची तरतूद प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी केली आहे. मात्र, याचा काहीच लाभ होणार नाही. इथेनॉल प्रकल्प उभारताना पर्यावरण विभागाच्या  परवानग्या, जनसुनावणी घ्यावी लागते. ही प्रक्रिया दोन ते तीन वर्षे चालते. त्यामुळे एवढी मोठी रक्‍कम कोणासाठी व का ठेवली हा प्रश्‍न आहे. साखरेचे मूल्यांकन ३२०० रुपये पकडून साखर कारखान्यांना कर्ज दिले आहे. मात्र, हे भाव आता २५५० पर्यंत खाली आले आहेत. जवळपास ९०० रुपयांनी मूल्यांकन कमी झाले आहे. त्यामुळे कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये गेले आहेत.

कारखाने ९० दिवसांत शॉर्ट मार्जिनमधून बाहेर आले नाहीत, तर सर्व खाती एनपीएमध्ये जाणार आहेत. कारखान्यांकडे केवळ २८ दिवस राहिले आहेत. त्यामुळे पॅकेजमध्ये याचा विचार करणे आवश्‍यक होते. पॅकेजचा निर्णय घेताना साखरेचा विक्री दर २९ रुपये निश्‍चित करून काहीसे समाधान केले आहे. मात्र, यापूर्वी झालेले नुकसान भरून येणार नाही. बफर स्टॉकमुळे दर स्थिर राहण्यास मदत होणार आहे. तसेच साखरेसाठी रिलीज मेकॅनिझममुळे एकाच वेळी बाजारात साखर येण्याचे प्रमाण थांबणार असल्याने या निर्णयांचा थोडा फायदा होईल, असे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com