agriculture news in marathi, paddy crop become in trouble due to lack of rain, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यात भात पिक संकटात
टीम अॅग्रोवन
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

यंदा मी तीन एकरांवर भात लागवड केली होती. पावसाळ्यात पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे भात पिकाची वाढ खुंटली आहे. उत्पादनात ३०-४० टक्के घट येण्याची शक्यता आहे. शासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी.  
-रोहिदास लखीमले, शेतकरी, भोयरे, ता. मावळ.

पुणे  ः पुणे जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यातील भात पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहेत. या कालावधीतच पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ५० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील भात पिकाची वाढ खुंटली आहे. परिणामी भात उत्पादक शेतकरी संकटात सापडले असून उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात भाताचे सरासरी क्षेत्र ७२ हजार ९५३ हेक्टर आहे. त्यापैकी ६२ हजार १५० हेक्टर म्हणजेच सरासरी ८५ टक्के क्षेत्रावर भात लागवड झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भात लागवडीच्या क्षेत्रात आठ हजार ३८५ हेक्टरने वाढ झाली. अनेक भात उत्पादक शेतकऱ्यांनी आर्थिक परिस्थिती नसताना पीककर्ज घेऊन खते, बियाण्यांची खरेदी केली होती. जूनच्या पहिल्या आठवड्यात पुरंदर, बारामती वगळता उर्वरित भागात कुठेही पाऊस पडला नाही.

दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात पावसाचा चांगलाच खंड पडला. त्यामुळे भात लागवड वेळेवर होऊ शकली नाही. जूनच्या चौथ्या आठवड्यात पावसाने काही प्रमाणात पडण्यास सुरवात केली. त्यामुळे भात उत्पादकांना दिलासा मिळाला आणि लागवडीस सुरवात झाली होती. जुलैमध्ये या लागवडीला चांगलाच वेग आल्याचे चित्र होते.

आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात जिल्ह्याच्या मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, हवेली, खेड, जुन्नर आणि आंबेगाव या तालुक्यांत पावसाचा जोर कमी झाला. अनेक ठिकाणी भात पिके वाढीच्या, तर काही ठिकाणी पीक निसवण्याच्या अवस्थेत असून अनेक ठिकाणी करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. परंतु शेवटच्या टप्‍प्यात पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे काही ठिकाणी भात पिक पिवळे पडू लागले आहे.

सध्या पाण्याची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांकडील भात पीक बऱ्यापैकी असले तरी या पिकाच्या वाढीवर परिणाम झाला आहे. पाऊस न झाल्यास उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. भात पिकाचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

पाऊस उशिरा झाल्याने उशिराने सुमारे साडे पाच एकरांवर भात रोपांची पुनर्लागवड केली. भात पीकवाढीच्या अवस्थेत आहेत. मात्र, पावसाने उघडीप दिली असून एका पावसाची गरज आहे. पाऊस न झाल्यास भात उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे, असे डोणे येथील शेतकरी भात उत्पादक शेतकरी संतोष कारके यांनी सांगितले.

 

इतर ताज्या घडामोडी
अनेर काठावरच्या शिवारातही जाणवू लागली...जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमध्ये असलेल्या...
जळगावात १८०; धुळे, नंदुरबारात टॅंकरची...जळगाव ः खानदेशात सुमारे एक हजार गावे टंचाईच्या...
लाकडी अवजारे हद्दपार; सुतारांवर...रिसोड, जि. वाशीम ः आधुनिकतेचे वारे शेतीतही वाहू...
कसणाऱ्यांना प्रोत्साहन दिल्यास...विकसनशील देशांमध्ये कृषी उत्पादकता आणि उत्पन्नाची...
जळगाव बाजार समितीती कांदा दरात सुधारणाजळगाव ः लाल कांद्याची आवक अस्थिर असून, दरात मागील...
नाशिक जिल्ह्यात प्रशासनाकडून नवीन चार...नाशिक : दुष्काळी परिस्थितीत जनावरांची चारा...
सुला विनियार्ड्समध्ये ९ हजार टन...नाशिक : देशातील आघाडीच्या वाइन उत्पादक असलेल्या...
जत तालुक्यातील दीड हजार शेततळी कोरडीसांगली :  शासनाच्या योजनेतून जत तालुक्यात...
`उर्ध्व पेनगंगाचे पाणी सोडा`नांदेड : मालेगाव (ता. अर्धापूर) परिसरातील...
नगरमध्ये कारले २००० ते ५००० रुपये...नगर  : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज (...
बुरशी, जिवाणू, सूत्रकृमीमुळेच आले...औरंगाबाद: जिल्ह्यातील आले पिकाचे २०१५-१६ व २०१८-...
नगर जिल्ह्यातील ५०१ छावण्यांत सव्वातीन...नगर  : दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर पशुधन...
सातारा जिल्ह्यातील आले लागवड रखडलीसातारा  ः तापमानवाढीचा परिणाम आले पिकावर होऊ...
उत्तर कोरेगावमधील तळहिरा धरण कोरडेवाठार स्टेशन, जि. सातारा  ः उत्तर कोरेगाव...
अपघातग्रस्तांना विमा रक्कम देण्यासाठी...पुणे  ः शेतकरी कुटुंबातील कोणत्याही...
काँग्रेस आघाडीपुढे विधानसभेचे मोठे...मुंबई : लोकसभा निवडणुकीत धुव्वा उडाल्याने...
जळगाव बाजार समितीच्या सभापतींची उद्या...जळगाव  ः जिल्ह्यातील सर्वात मोठ्या आणि...
नियोजन खरिपाचे : ठिबक, खत व्यवस्थापन...शेतकरी ः विजय इंगळे चित्तलवाडी, ता. तेल्हारा, जि...
नियोजन खरिपाचे : लागवडीसह सिंचन, काढणी...शेतकरी - दीपक माणिक पाटील माचले, ता. चोपडा, जि....
जळगावात दीड हजारांवर शेततळ्यांची कामे...जळगाव ः जिल्ह्यात "मागेल त्याला शेततळे''...