जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (ज्वारी) आवक सुरू झाली असून, मागील आठवड्यात
ताज्या घडामोडी
मी गेल्या वर्षी यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड केली होती. त्याचा फायदा चांगला झाल्याने लागवडीसाठी भात लागवड यंत्र खरेदी केले. आत्तापर्यंत साडेपाच एकरांवर यंत्राद्वारे भात लागवड केली आहे.
- पुंडलिक जोरी, शेतकरी, कशाळ, जि. पुणे.
पुणे : कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यस्थापन यंत्रणेअंतर्गत (आत्मा) मावळ तालुक्यात सुमारे ९० एकर क्षेत्रांवर यंत्राद्वारे भात लागवडीची प्रात्यक्षिके राबविण्यात येत आहे. त्यासाठीच्या रोपवाटिका तयार झाल्या आहेत.
या वर्षी मावळ तालुक्यातील बधलवाडी, फळणे, बेलज, कशाळ,वडेश्वर, माऊ, वारू, येळसे, सडवली आदी गावांतील शेतकऱ्यांच्या शेतावर ही प्रात्यक्षिके राबवली जाणार आहे. याची सुरवात फळणे, कशाळ व वारू या गावांतून झाली आहे. मावळ तालुक्यातील पुंडलिक जोरी, नथुराम लष्करी व नथु घरे या शेतकऱ्यांनी स्वतः भात लागवड यंत्र खरेदी केले आहे. या यंत्राद्वारेच यावर्षी भात लागवड सुरू आहे.
आत्माअंतर्गत प्रतिएकर दोन हजार रुपये रोपवाटिका तयार करणे व यंत्राद्वारे लागवडीसाठी भाडेपट्टी असे एकूण चार हजार रुपये अनुदान या प्रात्यक्षिकांसाठी देण्यात येते. या यंत्राद्वारे दिवसाला अडीच ते तीन एकर क्षेत्रांत भात लागवड होते. तसेच यामुळे दोन ओळी व दोन रोपांतील अंतर समान राहत असल्यामुळे बियाण्याची बचत होऊन उत्पादन वाढते, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनी दिली.
आ्त्माचे प्रकल्प संचालक अनिल देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिकांचे नियोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम यशस्वी होणेसाठी आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राहुल घोगरे, कृषी विभागाचे अधिकारी एन. बी. साबळे, एस. एस. ताकवले, बी. एस. पवार, ए. के. वरवडे, एस. डी. जाधव हे मदत करत आहे.
- 1 of 348
- ››