agriculture news in marathi, Paddy harvest in presence of District Collector | Agrowon

भंडारा जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत धान कापणी
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018

भंडारा : निलज (ता. मोहाडी) येथील पारबता गाढवे यांच्या शेतात जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांच्या उपस्थितीत पीक कापणी प्रयोग करण्यात आला. या प्रयोगात हेक्‍टरी सरासरी ३६ क्‍विंटल धान उत्पादन झाले असून, त्याद्वारे २३ क्‍विंटल तांदळाचे उत्पादन होईल, असा अंदाज आहे.

भंडारा : निलज (ता. मोहाडी) येथील पारबता गाढवे यांच्या शेतात जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांच्या उपस्थितीत पीक कापणी प्रयोग करण्यात आला. या प्रयोगात हेक्‍टरी सरासरी ३६ क्‍विंटल धान उत्पादन झाले असून, त्याद्वारे २३ क्‍विंटल तांदळाचे उत्पादन होईल, असा अंदाज आहे.

कृषी विभागाचे उपसंचालक अरुण बलसाने, तंत्र अधिकारी मनीषा कवटे, तालुका कृषी अधिकारी रामटेके या वेळी उपस्थित होते. करडी महसूल मंडळातील निलज येथील पारबता गाढवे यांच्याकडील अर्धा एकराच्या दहा बाय दहाच्या प्लॉटवरील धान कापणी प्रयोग करण्यात आला. तनसासह धानाचे वजन पहिल्यांदा करण्यात आले. त्यानंतर धानाची कांडणी करण्यात आली. यातून मिळालेल्या धानाची मोजणी केली असता सरासरी हेक्‍टरी ३६ क्‍विंटल धान उत्पादन होईल, असा अंदाज या कापणी प्रयोगातून वर्तविण्यात आला.

कृषी विभागातर्फे प्रत्येक महसूल मंडळात १२ पीक कापणी प्रयोग करण्यात येतात. भंडारा जिल्ह्यात ३४ महसूल मंडळांत हा प्रयोग केला जात आहे. या प्रयोगातून जिल्ह्याच्या धान उत्पादनाची सरासरी काढण्यात येते. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

इतर ताज्या घडामोडी
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...
कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत...सोलापूर   ः कांद्याचे दर घसरल्याने...