पुणे जिल्ह्यात सहा हजार हेक्टरवर भात रोपवाटिका

आमच्या भागात गेल्या चार ते पाच दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. रोपवाटिकेतील भात रोपे वाढीच्या अवस्थेत आहे. पुढील आठवड्यात भात लागवड सुरू करणार आहे. - रोहिदास लखिमले, भोयरे, ता. मावळ, जि. पुणे.
भात रोपवाटिका
भात रोपवाटिका

पुणे : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भात लागवडीसाठी सुमारे पाच हजार ८१६ हेक्टरवर भात रोपवाटिका तयार केल्या आहेत. चांगला पाऊस झाल्यास पुढील आठवड्यापासून भात लागवडीस सुरवात होईल.

जिल्ह्यात पश्चिमेकडील भोर, मावळ, मुळशी, वेल्हा, हवेली, खेड, जुन्नर आणि आंबेगाव हे तालुके भात लागवडीत आघाडीवर आहेत. जिल्ह्यात भाताचे ७२ हजार ९५४ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्यापैकी चालू वर्षी खरीप हंगामात ६४ हजार ८०० हेक्टरवर भात लागवड होण्याची शक्यता आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी गेल्या महिन्यापासून तयारी सुरू केली आहे.

जून महिन्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी भात रोपवाटिका तयार करण्यास सुरवात केली होती. सध्या रोपवाटिकेतील रोपे वाढीच्या अवस्थेत आहे. चांगला पाऊस झाल्यास वेळेवर भात लागवड होण्याची शक्यता आहे. यंदा जिल्ह्यात भात लागवडीसाठी ६४८० हेक्टरवर भात रोपवाटिका तयार होतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे लागवडीसाठी रोपांची अडचणी येणार नसल्याचे चित्र आहे.

त्यातच मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा तालुक्यांतील बहुतांशी शेतकरी यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवडी करणार असल्याने रोपांचीही बचत होणार आहे. सध्या जिल्ह्यातील मावळ तालुक्यात एक हजार १५० तर जुन्नर तालुक्यात एक हजार १८४ हेक्टरवर रोपवाटिका तयार झाल्या आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com