पुणे जिल्ह्यात साडेसहा हजार हेक्‍टरवर भात लागवड

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे   ः जून महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात पडलेल्या पावसाच्या खंडाचा परिणाम भात पिकाच्या पुनर्लागवडीवर झाला आहे. जिल्ह्यात भाताचे सरासरी क्षेत्र ७२ हजार ९५३ हेक्‍टर असून, त्यापैकी आतापर्यंत अवघ्या ६ हजार ७८२ हेक्‍टर म्हणजेच सरासरी नऊ टक्के क्षेत्रावर भात लागवड झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १६ हजार ३३४ हेक्‍टरवर म्हणजेच २२ टक्के क्षेत्रावर भात लागवड झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत भात लागवडीखालील क्षेत्र १३ टक्‍क्‍यांनी घटले आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

चालू वर्षी हवामान विभागाने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला होता. भात उत्पादक शेतकऱ्यांनी आर्थिक परिस्थिती नसताना पीककर्ज घेऊन खरिपाची तयारी केली होती. अनेकांनी खते, बियाणांची खरेदी केली. परंतु जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुरंदर, बारामती वगळता उर्वरित भागात कुठेही पाऊस पडला नाही. दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात पावसाचा चांगलाच खंड होता. त्यामुळे खरिपातील भात लागवड वेळेवर होऊ शकली नाही.

जून महिन्यातील चौथ्या आठवड्यात पावसाने काही प्रमाणात बरसण्यास सुरवात केली. त्यामुळे भात उत्पादकांना दिलासा मिळत लागवडीस सुरवात झाली होती.गेल्या दहा ते बारा दिवसांपासून  मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, हवेली, खेड, जुन्नर आणि आंबेगाव या तालुक्‍यांत पावसाने चांगली हजेरी लावली आहे. यामुळे भात लागवडी वेगाने सुरू झाल्या आहे.

तालुकानिहाय आतापर्यंत झालेली भात लागवड (हेक्‍टर)
तालुका लागवड क्षेत्र
हवेली  ५६४
मुळशी ७७६
भोर   १२६
मावळ    १०२०
वेल्हा  ९००
जुन्नर १५६०
खेड   १०००
आंबेगाव  ८३६ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com