गोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान खरेदी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

गोंदिया  ः शासनाच्या वतीने नाफेडच्या माध्यमातून ५७ केंद्रांवर धान खरेदी केली जात आहे. आतापर्यंत सुमारे ५२ हजार ६९१ क्‍विंटल धानाची खरेदी झाली असून, त्याची किंमत ९ कोटी २२ लाख ९ हजार रुपये असल्याचे सूत्रांनी सांगितले. खरेदी केलेल्या एकूण धानापैकी ९० लाख रुपयांचेच चुकारे शेतकऱ्यांना करण्यात आल्याने चुकाऱ्यांसाठी पुन्हा शेतकऱ्यांवर कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची वेळ येण्याची भीती वर्तविली जात आहे.

जिल्ह्यात दरवर्षी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. त्यानुसार या वर्षीच्या खरेदीसाठी ५७ केंद्रे उघडण्यात आली आहेत. दरवर्षी धान खरेदीकरिता हेक्‍टराच्या मर्यादेत किती क्‍विंटल धान खरेदी करायचे या विषयीचे धोरण निश्‍चित करण्यात येते. या वर्षी मात्र अद्यापपर्यंत हेक्‍टरी किती क्‍विंटल धान खरेदी करावी या संदर्भाने कोणतेच निर्देश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे किती क्‍विंटल माल विक्रीसाठी नेला पाहिजे, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. दरम्यान आजवर सुमारे ९ कोटी रुपयांच्या धानाची खरेदी झाली असून, त्यापोटी ९० लाख रुपयांचे चुकारे करण्यात आले आहेत. ८ कोटी ३१ लाख १० हजार रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना मिळायचे आहेत.

गत वर्षी सात लाख ८१ हजार क्‍विंटल खरेदी गेल्या हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने खरिपात एकूण ५ लाख २५ हजार १६ क्‍विंटल धान खरेदी केली होती. रब्बी हंगामात ५६ हजार क्‍विंटल धान खरेदी करण्यात आली. २१ हजार ४०० शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी नाफेडला धान विकले. खरीप आणि रब्बी हंगाम मिळून ७ लाख ८१ हजार क्‍विंटल धान खरेदी झाली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com